Jalgaon train accident : आगीच्या अफवेनं घेतला अनेकांचा बळी; जळगावमध्ये भीषण रेल्वे दुर्घटना, नेमकं काय घडलं?
जळगावच्या परधाडे रेल्वे स्थानकाच्या जवळ मोठी रेल्वे दुर्घटना घडली आहे. पुष्पक एक्स्प्रेसला आग लागल्याची अफवा पसरली, त्यानंतर अनेकांनी धावत्या एक्स्प्रेसमधून उड्या मारल्या, याचदरम्यान ही दुर्घटना घडली आहे.

मोठी बातमी समोर येत आहे. जळगावच्या परधाडे रेल्वे स्थानकाच्या जवळ मोठी रेल्वे दुर्घटना घडली आहे. पुष्पक एक्स्प्रेसला आग लागल्याची अफवा पसरली, त्यानंतर अनेकांनी एक्स्प्रेसमधून उड्या मारल्या, आग लागल्याची अफवा पसरताच 30 ते 35 जणांनी ट्रेनमधून उड्या मारल्या. त्यातच समोरून बंगळुरू एक्स्प्रेस येत होती. या एक्स्प्रेसनं पुष्पक एक्स्प्रेसमधून उड्या मारलेल्या प्रवाशांना चिरडल्याची घटना घडली आहे. यात अनेक जण जखमी झाले असून, काही जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे.
घटनास्थळी नेमकं काय घडलं?
पुष्पक एक्स्प्रेस मुंबईकडे येत असताना हा अपघात घडला आहे. चालकानं अचानक ट्रेनचं ब्रेक दाबलं त्यामुळे चाकामधून ठिणग्या उडाल्या, ठिणग्या पाहून प्रवासी घाबरले, आग लागल्याची अफवा पसरली. आग लागल्याची अफवा पसरल्यानंतर 30 ते 35 जणांनी रेल्वेमधून उड्या मारल्या, मात्र याचवेळी समोरून बंगळूरू एक्स्प्रेस येत होती. पुष्कक एक्स्प्रेसमधून उड्या मारलेल्या लोकांना या एक्स्प्रेसनं चिरडलं आहे. या घटनेत अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर या घटनेत साह ते सात जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे. मात्र मृतांचा अधिकृत आकडा अद्याप समोर आलेला नाहीये.
प्रवाशानं काय सांगितलं?
या रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशानं अपघाताबाबत माहिती देताना म्हटलं की, ही घटना दुपारी साडेतीन ते चारच्या दरम्यान घडली. आग लागल्याची अफवा पसरली, त्यानंतर काही जणांनी ट्रेनमधून उड्या मारल्या. त्याचदरम्यान समोरून बंगळूरू एक्स्प्रेस येत होती. या एक्स्प्रेसने 30 ते 35 जणांना चिरडल्याची घटना घडली. यात अनेक जण जखमी झाले आहेत. तर काही जणांचा मृत्यू देखील झाला आहे.
दरम्यान समोरून येणाऱ्या बंगळूरू एक्स्प्रेसने हॉर्न देखील दिला नाही असा दावा देखील काही प्रत्यक्षदर्शींकडून करण्यात आला आहे. हॉर्न दिला असता तर कादाचित प्रवाशी सावध झाले असते, असंही म्हटलं जात आहे, सध्या पुष्पक एक्स्प्रेसला पाचोरा रेल्वे स्थानकात आणण्यात आलं आहे.