र ला र आणि ट ला ट जोडून आठवलेंचे कवितांचे स्टंट, रुपाली चाकणकरांचा टोला

र ला र आणि ट ला ट जोडून कविता करुन स्टंट करणाऱ्यांना शेतकरी आंदोलन स्टंटच वाटणारच, असा टोला रुपाली चाकणकर यांनी लगावला. (Rupali Chakankar slams Ramdas Athawale )

  • योगेश बोरसे, टीव्ही 9 मराठी, पुणे
  • Published On - 13:00 PM, 25 Jan 2021
र ला र आणि ट ला ट जोडून आठवलेंचे कवितांचे स्टंट, रुपाली चाकणकरांचा टोला
राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर आणि रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले

मुंबई : र ला र आणि ट ला ट जोडून चार ओळी कविता करुन स्टंट करणाऱ्यांना शेतकरी आंदोलन स्टंटच वाटणार, असा टोला राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी रिपाइं अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना लगावला. हा लढा असाच चालू राहील, असं चाकणकर म्हणाल्या. किसान सभेचं आंदोलन म्हणजे प्रसिद्धीचा प्रयत्न असल्याची टीका आठवलेंनी केली होती. (Rupali Chakankar slams Ramdas Athawale for criticizing Farmer Protest)

“हजारो शेतकरी आंदोलकांचा जाणीवपूर्वक अपमान”

“रामदास आठवले यांनी आज शेतकरी आंदोलनाबद्दल जे वक्तव्य केलं, ते मोर्चात सहभागी 25 ते 30 हजार शेतकरी आंदोलकांचा जाणीवपूर्वक केलेला अपमान आहे. दिवसभर कविता करण्यात व्यस्त असलेल्यांनी शेती कशी करावी, याचीही माहिती घ्यावी. र ला र आणि ट ला ट जोडून कविता करुन स्टंट करणाऱ्यांना शेतकरी आंदोलन स्टंटच वाटणारच” असा टोला रुपाली चाकणकर यांनी लगावला.

आठवलेंनी आझाद मैदानात जावं, चाकणकरांचा सल्ला

“केंद्र सरकारच्या चुकीच्या निर्णयांची पाठराखण करणाऱ्या रामदास आठवलेंनी हिंमत असेल, तर आझाद मैदानात जाऊन आंदोलक शेतकऱ्यांचं समाधान करावं. आठवले पाठिंबा देत असलेल्या कायद्याला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे, हे त्यांना सांगू इच्छिते” असंही चाकणकर म्हणाल्या.

रामदास आठवले काय म्हणाले होते?

“मुंबईतील शेतकऱ्यांचा मोर्चा हा फक्त पब्लिस्टिटी स्टंट आहे. किसान सभेने मुंबईत आंदोलन करण्याची काहीच गरज नाही” असं वक्तव्य रामदास आठवले यांनी केलं होतं. (Rupali Chakankar slams Ramdas Athawale for criticizing Farmer Protest)

राजभवनावर शेतकरी मोर्चाला परवानगी नाही

राजधानी दिल्लीत सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी महाराष्ट्रातील शेतकरी काल हजारोंच्या संख्येने मुंबईच्या आझाद मैदानात दाखल झाले आहेत (Farmer protest). शेतकऱ्यांचं ‘लाल वादळ’ राजभवनावर धडक देणार आहे. मात्र या मोर्चाला आम्ही परवानगी दिलेली नाही. दक्षिण मुंबईत मोर्चाला परवानगी देता येत‌ नाही, असा माननीय न्यायालयाचा आदेश असल्याचं मुंबईचे सहपोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील (Vishwas Nangare patil ) यांनी स्पष्ट केलं आहे.

संबंधित बातम्या 

 या मोर्चाला कुणाचाही पाठिंबा नाही : देवेंद्र फडणवीस

शेतकऱ्यांच्या मोर्चाला परवानगी नाही, राजभवनावर जायचा प्रयत्न केल्यास आम्ही त्यांना रोखू : विश्वास नांगरे पाटील

(Rupali Chakankar slams Ramdas Athawale for criticizing Farmer Protest)