Farmer Protest : या मोर्चाला कुणाचाही पाठिंबा नाही : देवेंद्र फडणवीस

महाविकास आघाडीचे दिग्गज नेते आज (सोमवारी) मुंबईतल्या शेतकरी मोर्चात सहभागी होणार आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या नेत्यांवर सडकून टीका केली आहे.

  • सुनिल ढगे, टीव्ही 9 मराठी, नागपूर
  • Published On - 11:58 AM, 25 Jan 2021
Farmer Protest : या मोर्चाला कुणाचाही पाठिंबा नाही : देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी करण्यात आलेल्या तरतुदी आणि घोषणांचा सविस्तर तपशील सादर केला.

नागपूर : महाराष्ट्रात कृषी विधेयक येऊन इतके दिवस झाले कुठलंही आंदोलन झाले नाही, काही पक्ष जाणीवपूर्वक ढोंगबाजी करत आहेत. शेतकऱ्यांना गुमराह करण्याचा प्रयत्न करत आहेत, शेतकऱ्यांना चुकीच्या गोष्टी सांगण्यात येत आहेत, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलीय. राजधानी दिल्लीत सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी रविवारी हजारोंच्या संख्येने महाराष्ट्रमधील शेतकरी मुंबईच्या आझाद मैदानात दाखल झाले आहेत. या शेतकऱ्यांना भडकविण्याचं काम काही पक्ष करत असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. (BJP Devendra fadanvis Comment on Mumbai Farmer protest)

अखिल भारतीय किसान सभेचा मोर्चा रविवारी रात्री मुंबईत दाखल झाला आहे आहे. शेकडो किलोमीटरचे अंतर कापून हे शेतकरी मुंबईत दाखल झाले आहेत. या मोर्चामध्ये हजारो शेतकरी सहभागी झाले आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, शिवसेना नेते पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे सहभागी होणार आहे.

तिन्ही पक्षांच्या दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीवरुन फडणवीसांनी टीका केली आहे. जे लोकं या मोर्चाच्या निमित्ताने मंचावर जात आहेत त्यांना माझा सवाल आहे काँग्रेस पक्षाने आपल्या 2019 च्या जाहीरनाम्यात बाजारसमित्या रद्द करु असं म्हटलं होतं. मग आता काय झालंय, आम्ही तर बाजार समित्या बरखास्त करु असं म्हटलंही नाही.. मग शेतकऱ्यांना भडकवून हे नेते काय साध्य करु पाहत आहेत, असा सवाल फडणवीसांनी उपस्थित केला.

काँग्रेसने 2006 साली कंत्राटी शेतीचा कायदा त्यांनी का मंजूर केला याचं उत्तर दिलं पाहिजे. 2020 पर्यंत तो कायदा सुरू आहे… यांना महाराष्ट्र सरकारने केलेला कायदा चालतो मग केंद्राचा का नाही, ही ढोंगबाजी का? शेतकऱ्यांचा या मोर्चाला कुणाचाही पाठिंबा नाही. उलट शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेने तर या कृषी कायद्यांचे स्वागत केले आहे, असंही फडणवीस यांनी सांगितलं.

शेतकऱ्यांचं ‘लाल वादळ’….

अखिल भारतीय किसान सभेचा मोर्चा रविवारी रात्री मुंबईत दाखल झाला आहे आहे. शेकडो किलोमीटरचे अंतर कापून हे शेतकरी मुंबईत दाखल झाले आहेत. या मोर्चामध्ये हजारो शेतकरी सहभागी झाले आहेत. आज 25 जानेवारीला हा मोर्चा राजभवनावर धडकणार आहे. केंद्र सरकारनं लागू केलेल्या नव्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या 60 दिवसांपासून दिल्लींच्या वेशींवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रात अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं हा मोर्चा काढण्यात आला आहे. राज्यभरातील विविध जिल्ह्यांमधील शेतकरी मोठ्या संख्येने या महामोर्चात सहभागी झालेले आहेत.

शेतकऱ्यांच्या मागण्या काय…?

शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करा, शेतीमालाला आधार भावाचे संरक्षण देणारा कायदा करा, वीज विधेयक मागे घ्या, कामगार संहितेमधील कामगार विरोधी बदल रद्द करा, वनजमीन तथा देवस्थान, गायरान, आकारीपड, बेनामी व वरकस जमीन कसणारांच्या नावे करा आणि महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी पुन्हा सुरू करून सर्व शेतकऱ्यांना योजनेचा लाभ द्या, या मागण्या आंदोलनात करण्यात येणार आहेत. कंत्राटी कामगार प्रथा तसेच शेतकरी कामगार विरोधी कायदे रद्द करणे, ही देखील शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे. (BJP Devendra fadanvis Comment on Mumbai Farmer protest)

हे ही वाचा :

पवार-ठाकरे मैदानात, थोरातही सोबतीला, शेतकरी आंदोलनात सर्वात मोठे चेहरे

Farmer Protest in Mumbai | मुंबईच्या आझाद मैदानात जमलेल्या शेतकऱ्यांच्या नेमक्या मागण्या काय?