शरद पवार यांची सर्वात मोठी खेळी, सदाभाऊ खोत यांना दिला जोराचा धक्का, पडद्यामागे काय घडतंय?
शरद पवार यांनी सदाभाऊ खोत यांना मोठा धक्का दिला आहे. सदाभाऊ खोत यांच्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनीच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे सदाभाऊ खोत यांना मोठा धक्का बसला आहे. सदाभाऊ खोत आता प्रदेशाध्यक्षपदी कुणाची वर्णी लावणार? ते पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार हे चांगलेच ॲक्शन मोडवर आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्याकडून पक्षवाढीसाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. शरद पवार यासाठी राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जावून पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. शरद पवार यांच्याकडून काही विधानसभा मतदारसंघांमध्ये उमेदवारही निश्चित झाले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अनेक आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा पवार गटाकडून केला जातोय. विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर त्याबाबतचे राजकीय फटाकडे तेव्हा फुटण्याची चिन्हं आहेत. पण तत्पूर्वी शरद पवार यांच्याकडून रयत क्रांती पक्षाचे प्रमुख सदाभाऊ खोत यांना मोठा राजकीय धक्का देण्यात आला आहे. सदाभाऊ खोत यांच्या पक्षाचा प्रदेशाध्यक्षानेच शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे रयत क्रांती पक्षात हा मोठा भूकंप असल्याचं मानलं जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी आमदार सदाभाऊ खोत यांना मोठा धक्का दिला आहे. सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास शिंदे यांनी आज शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे सदाभाऊ खोत यांना विधानसभा निवडणुकीच्या आधी शरद पवारांनी मोठा धक्का दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. शरद पवार यांच्या पुण्यातील मोदीबाग निवासस्थानी भानुदास शिंदे यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. शरद पवार यांच्या उपस्थितित हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. भानुदास शिंदे हे 25 वर्षांपासून शेतकरी चळवळीत कार्यरत आहेत. त्यांनी अनेक आंदोलनात काम केलं आहे. त्यामुळे शरद पवार यांच्या पक्षाला त्यांच्या अनुभवाचा मोठा फायदा होणार आहे.
राष्ट्रवादीच्या याचिकेवर 27 ऑगस्टला
दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या आधी सुप्रीम कोर्टात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या संबंधित दाखल याचिकांवर सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्टाला विधानसभा निवडणुकीच्या आधी संबंधित प्रकरणांवर निकाल देणं अनिवार्य आहे. त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सुप्रीम कोर्ट कुणाला दिलासा देणार? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाव आणि पक्ष चिन्हं याबाबतच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात 27 ऑगस्टला सुनावणी होणार आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात शरद पवार यांच्या गटामार्फत दाखल याचिकेवर 27 ऑगस्टला सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष असणार आहे.
