“जयदीप आपटेची बोटं छाटून आणणाऱ्याचा सत्कार करू”, बदलापुरात सकल मराठा समाजाची घोषणा
शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेचा आज बदलापूरमध्ये सकल मराठा समाजाने निषेध केला. यावेळी शिवरायांचा पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सकल मराठा समाजाने केली.

“छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना होण्यास कारणीभूत असलेला शिल्पकार जयदीप आपटे याची बोटं छाटून आणणाऱ्याचा जाहीर सत्कार करू”, अशी घोषणा बदलापूरमधील सकल मराठा समाजाने केली आहे. शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेचा आज बदलापूरमध्ये सकल मराठा समाजाने निषेध केला. यावेळी शिवरायांचा पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सकल मराठा समाजाने केली.
मालवणच्या राजकोट किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याने मोठा वाद निर्माण झालाय. या घटनेनंतर राज्यभरातील शिवप्रेमींकडून संताप व्यक्त केला जातोय. याप्रकरणी पोलिसांनी शिल्पकार आणि इंजिनियर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांची कारवाई एकीकडे सुरु आहे, तर दुसरीकडे बदलापुरात सकल मराठा समाज संघटनेकडून या पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटे याची बोटं छाटणाऱ्याचा जाहीर सत्कार करु, असं जाहीर करण्यात आलं आङे.
सकल मराठा समाजाने काय म्हटलंय?
छत्रपती शिवाजी महाराजांचा कमकुवत पुतळा तयार करून तो पाडण्यास कारणीभूत ठरलेल्या शिल्पकार जयदीप आपटे याची बोटं जो कोणी छाटून आणेल, त्याचा बदलापूरमध्ये जाहीर सत्कार करू, अशी घोषणा बदलापूरमधील सकल मराठा समाजाचे अविनाश देशमुख यांनी केली आहे. याप्रकरणी त्यांनी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना निवेदनही दिलं असून संबंधितांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.
जयदीप आपटे याचा शोध सुरु
जयदीप आपटे हा सध्या फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पोलिसांनी जयदीपवर गुन्हा दाखल केला आहे. जयदीपच्या शोधासाठी पोलिसांचे वेगवेगळी पथकं काम करत आहेत. जयदीप आपटे याच्या शोधासाठी काल सिंधुदुर्ग गुन्हे शाखेचं पथक त्याच्या कल्याणच्या घरी दाखल झालं होतं. या पथकाकडून जयदीप आपटे याची पत्नी आणि नातेवाईकांची चौकशी करण्यात आली. सुरुवातीला शहापूर येथे त्यांची चौकशी झाली. नंतर संध्याकाळी ते शहापूर येथून कल्याणला राहत्या घरी दाखल झाले तेव्हा सुद्धा त्यांची चौकशी करण्यात आली. पोलिसांकडून जयदीप आपटे याची चौकशी सुरु असताना त्याच्या घराजवळ मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील लावण्यात आला होता.
