कडक निर्बंध असताना सलून उघडलं, पोलिसांनी इतकं मारलं की जीव गेला, औरंगाबादेतील धक्कादायक घटना

कडक निर्बंध असताना सलून उघडलं, पोलिसांनी इतकं मारलं की जीव गेला, औरंगाबादेतील धक्कादायक घटना

सलून चालकाच्या मृत्यूनंतर त्याचे नातेवाईक आक्रमक झाले. ते सलून चालकाचा मृतदेह घेऊन उस्मानापूर पोलीस ठाण्याबाहेर दाखल झाले (Salon businessman death during police beating in Aurangabad)

चेतन पाटील

|

Apr 14, 2021 | 7:15 PM

औरंगाबाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने संपूर्ण राज्यात पुढच्या 15 दिवसांसाठी संचारबंदीची घोषणा केली आहे. याशिवाय आधीच कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या निर्बंधांनुसार फक्त जीवनाश्यक वस्तूंचे दुकान उघडण्यास मुभा आहे. मात्र, या नियमांच्या विरुद्ध जाऊन औरंगाबादेत एका सलून व्यवसायिकाने सलून उघडलं. त्यामुळे पोलिसांनी त्याला बेदम मारहाण केली. या मारहाणीत सलून व्यावसायिकाचा मृत्यू झाल्याचा आरोप मृतकाच्या कुटुंबियांनी केला आहे (Salon businessman death during police beating in Aurangabad).

नेमकं प्रकरण काय?

औरंगाबाद शहरातील उस्मानपुरा पोलीस ठाण्यात संबंधित घटना घडली. मृतक फिरोज खान याने आज सकाळी सलून उघडले होते. मात्र, महाराष्ट्रातील कडक निर्बंधांनुसार सर्व सलून बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. उस्मानापुरातील सलून व्यवसायिकाने सलून उघडल्याची पोलिसांना माहिती मिळाली. दोन पोलीस कर्मचारी सलूनवर पोहोचले. त्यांनी सलून चालकाला प्रचंड मारहाण केली. या मारहाणीत त्याचा दुर्देवी मृत्यू झाला, असा आरोप उस्मानापुरा परिसरातील नागरीक आणि मृतकाच्या कुटुंबियांनी केला आहे.

पोलीस ठाण्याबाहेर मृतकांच्या नातेवाईकांचा ठिय्या

सलून चालकाच्या मृत्यूनंतर त्याचे नातेवाईक आक्रमक झाले. ते सलून चालकाचा मृतदेह घेऊन उस्मानापूर पोलीस ठाण्याबाहेर दाखल झाले. तिथे त्यांनी प्रचंड गोंधळ घातला. सलून व्यवसायिकाची हत्या करणाऱ्यांवर तातडीने कारवाई करा, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी मृतकाच्या नातेवाईकांनी आणि उस्मानापूर परिसरातील नागरिकांनी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन केलं.

पोलीस आयुक्तांचे जामावाला कारवाई करण्याचे आश्वासन

अखेर पोलीस आयुक्तांनी या प्रकरणात मध्यस्थी केली. या प्रकरणातील संबंधित दोन पोलीस कर्मचारी आणि पोलीस निरीक्षकांना याबाबत कडक सूचना देण्यात आल्या. तसेच मृतकाच्या मृतदेहाचा पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करु, असं आश्वासन आयुक्तांनी जमावाला दिला. त्यानंतर मृतदेह रुग्णालयात नेण्यात आला (Salon businessman death during police beating in Aurangabad).

हेही वाचा : लाठीचा वापर करण्याची वेळ आणू नका; पोलीस महासंचालकांचं नागरिकांना आवाहन

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें