AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘पडदा गिर चुका है, तालिया फिर भी गुंज रहीं…’, पंकजा मुंडे भर मंचावर अमित शाह यांच्यासमोर काय म्हणाल्या?

"अमित शाह यांना कमीत कमी त्रास झाला पाहिजे, असं काम सर्वांनी केलं पाहिजे. एवढी शक्ती अमित शाह यांच्या विचारांनी महाराष्ट्रात ओतली आहे तर महाराष्ट्रापेक्षा दुसऱ्या राज्यात त्यांनी जास्त लक्ष द्यावं. आम्ही महाराष्ट्रातून जास्तीत जास्त खासदार निवडून देऊ", असं पंकजा मुंडे आपल्या भाषणात म्हणाल्या.

'पडदा गिर चुका है, तालिया फिर भी गुंज रहीं...', पंकजा मुंडे भर मंचावर अमित शाह यांच्यासमोर काय म्हणाल्या?
| Updated on: Mar 05, 2024 | 8:31 PM
Share

छत्रपती संभाजीनगर | 5 मार्च 2024 : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यांची आज छत्रपती संभाजीनगर येथे सभा पार पडली. यावेळी भाजपचे महाराष्ट्रातील सर्व दिग्गज नेते उपस्थित होते. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी यावेळी भाषण केलं. “महाराष्ट्रात ज्यांच्या त्यागाने आणि स्वाभिमानी बाणाने पावन, ज्यंच्या नावाने हे माझं नगर अत्यंत स्वाभिमानाने नाव घेतं त्या छत्रपती संभाजीनगरमध्ये, ज्यांनी हे नाव देण्यामध्ये आणि देशाला स्वाभिमान देण्यामध्ये मोठं योगदान दिलं, असे कलम 370 रद्द करणारे अशक्य गोष्ट शक्य करुन दाखवणारे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दिव्य स्वप्न बघून ते पूर्ण करण्यामागे अपार कष्ट करुन स्थिरता देणारे नेते अमित शाह यांचं मी छत्रपती संभाजीनगरमध्ये स्वागत करते”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

‘पडदा गिर चुका है, तालिया फिर भी गुंज रहीं…’

“अमित शाह यांचं आज इथे येणं हे भविष्यामध्ये अजून ताकदीने या मैदानात उतरण्याचं द्योतक आहे, असं म्हणायला हरकत नाही. मी फार वेळ घेणार नाही. पण जिंदगी के रंगमच पर कुछ इस तर निभाया अपना किरदार, पडदा गिर चुका है, तालिया फिर भी गुंज रहीं हैं, असं ज्यांनी काम केलं त्या माझ्या पित्याच्या चरणी नतमस्तक होऊन एवढंच सांगते की, या देशाला जेव्हा सर्वात जास्त गरज होती की, गरिबांच्या स्वप्नांना ठिगळ लावण्याची, एका गरिबाला खुल्या आसमानातून स्वत:च्या पक्क्या घरामध्ये पोहोचवण्याची, माता-बहिणीच्या डोळ्यातलं पाणी नळामध्ये आणण्याचं तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी या देशाला लाभले आहेत”, असा दावा पंकजा मुंडे यांनी केला.

‘अनेक वर्ष ज्या फाटक्या टेंटमध्ये…’

“अनेक वर्ष ज्या फाटक्या टेंटमध्ये प्रभू श्रीरामांचं वास्तव्य होतं त्यांना मंदिरात नेण्यामध्ये यश आलं आहे तर त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या, विश्वास ठेवून रामराज्याकडे डोळ्यामध्ये आशा लावून प्रतिक्षा पाहणाऱ्या देशाच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक माणसाला असं वाटलं पाहिजे की, रामराज्य आलं पाहिजे हे दायित्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वीकारलं आहे. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वजण कामाला लागले आहेत. एक मोठा यज्ञ सुरु झाला आहे. या यज्ञामध्ये सर्वांनी आपल्या प्रयत्नांची आहुती द्यायची आहे”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

‘छोटासा चिमुटभर वाटा मी माझ्यापरिने उचलायला सज्ज’

“अमित शाह यांच्या समवेत मम म्हणून सुरुवात करायची आहे. तीन इंजिनचं आपल सरकार आहे. एका इंजिन असेल तर जोरात ट्रेन धावेल, दोन असेल तर आणखी जोरात ट्रेन धावेल आणि तीन असेल तर त्याहून जोरात धावेल. त्यामुळे महाराष्ट्रातून अमित शाह यांना कमीत कमी त्रास झाला पाहिजे, असं काम सर्वांनी केलं पाहिजे. एवढी शक्ती अमित शाह यांच्या विचारांनी महाराष्ट्रात ओतली आहे तर महाराष्ट्रापेक्षा दुसऱ्या राज्यात त्यांनी जास्त लक्ष द्यावं. आम्ही महाराष्ट्रातून जास्तीत जास्त खासदार निवडून देऊ, असं वचन मंचावरील विराजमान सर्वांनी देण्याची आवश्यकता आहे. त्यामध्ये छोटासा चिमुटभर वाटा मी माझ्यापरिने उचलायला सज्ज आहे”, अशी भूमिका पंकजा मुंडे यांनी मांडली.

शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.