AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिंदेंनी भुमरेंना उमेदवारी दिली तर चांगलं होईल कारण…; अंबादास दानवेंच्या विधानाने भुवया उंचावल्या

Ambadas Danve on Loksabha Election 2024 : अंबादास दानवे यांच्या विधानाने छत्रपती संभाजीनगरच्या राजकारणात चर्चांना उधाण; लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंबादास दानवे नेमकं काय म्हणाले? भाजप नेते आशिष शेलार यांच्यावरही त्यांनी टीकास्त्र डागलं आहे. वाचा सविस्तर...

शिंदेंनी भुमरेंना उमेदवारी दिली तर चांगलं होईल कारण...; अंबादास दानवेंच्या विधानाने भुवया उंचावल्या
| Updated on: Apr 08, 2024 | 12:03 PM
Share

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध घडामोडी घडत आहेत. अशात छत्रपती संभाजीनगरमध्ये घडामोडींना वेग आला आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे मतदारसंघात दौरा करत आहेत. यावेळी शिंदे गटाच्या उमेदवारीवर त्यांनी भाष्य केलं आहे. शिवसेना शिंदे गटाकडून संदिपान भुमरे यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. यावर दानवेंनी भाष्य केलं. संदिपान भुमरे यांचं नाव अद्याप निश्चित झालेलं नाही. आमचा उमेदवार निश्चित होऊन 15 दिवस झालेले आहेत. भुमरे यांचं नाव निश्चित झाल्यास चांगलं आहे. कारण ते आमच्या लोकसभा मतदारसंघातले नाहीत. पुढे कसं करायचं त्यांचं ते आम्ही ठरवू, असं अंबादास दानवे म्हणाले.

निवडणुकीवर भाष्य

सकाळी 7 पासून मी प्रचाराला सुरुवात केली आहे. आतापर्यंत मी पाच ते 7 ठिकाणी गेलो. आज 18 ठिकाणी भेटी देणार आहे. लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. एकनाथ शिंदे शिवसेना चांगल्या पद्धतीने वाचवत आहेत… उमेदवार बदला म्हणायची हिंमत पूर्वी कुणाची नव्हती. आता उमेदवार ठरवायला दिल्लीला जावं लागायतंय. मागच्या वेळी किरीट सोमय्या यांची उमेदवारी शिवसेनेने बदलायला लावली होती. आता शिवसेनेची काय अवस्था आहे, आपल्याला माहिती आहे, असं दानवे यांनी म्हटलं.

शिंदे गटावर निशाणा

तुमच्यासाठी गद्दारी करणाऱ्यांना तुम्ही उमेदवारी देऊ शकत नाही. तुम्ही काय शिवसेना वाचवणार तुम्ही स्वतःला वाचवण्यासाठी गेलेला आहेत. भारतीय जनता पार्टी कसं एकेकाचे ऑपरेशन करते हे तुम्हाला लवकर कळेल. गोवा बिहार इथे भाजप कशी वागली आहे. तुम्हाला मुख्यमंत्रिपदाचे सुख भाजप उपभोगू देणार नाहीतुम्ही इतके दिवस काम केलं ते काय घरगडी म्हणून काम केलं का? मग याच घरगाड्याला मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी नगरविकास खातं दिलं कसं? उध्दव ठाकरे इतरांना सहकारी समजतात. तरीही तुम्ही हे बोलत असाल तर ही नमक हरामी आहे, असं विधान अंबादास दानवे यांनी केलं आहे.

आशिष शेलारांना प्रत्युत्तर

आशिष शेलार यांनी आज सकाळी ट्विट करत उद्धव ठाकरेंवर टीका केली. त्यावर अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आशिष शेलार यांना उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करावी लागते नाहीतर त्यांना कुत्रा विचारणार नाही. ठाकरेंवर टीका करण्यासाठी आशिष शेलार यांचं काहीतरी ठरलं असणार आहे. चांगलं काम करतात हे तीन नेते, महाराष्ट्राच्या तिजोरी ची लूट हे तिन्ही नेते करत आहेत. 15 टक्क्यांशिवाय काम करत नाहीत, भूखंड लाटत असतात, हे काम उध्दव ठाकरे यांना करता येत नाही. सलमान खान कलाकार आहे भेटणं काही विशेष नाही, असं अंबादास दानवे म्हणालेत.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.