AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भरधाव स्कॉर्पिओने गोल-गोल फिरत ठोकरले 4 वाहनांना; छत्रपती संभाजीनगरमध्ये पेट्रोलपंपाजवळ घडला भयंकर अपघात

Chhatrapati Sambhajinagar Scorpio Car Accident : पुण्याच्या पार्श कार अपघाताचे प्रकरण देशभरात गाजत असतानाच छत्रपती संभाजीनगरमधील एका विचित्र अपघाताने सर्वांच्या काळजाचा थरकाप उडाला. चार वाहनांना भरधाव स्कॉर्पिओने ठोकरले आहे...

भरधाव स्कॉर्पिओने गोल-गोल फिरत ठोकरले 4 वाहनांना; छत्रपती संभाजीनगरमध्ये पेट्रोलपंपाजवळ घडला भयंकर अपघात
स्कॉर्पिओने उडवली खळबळ
| Edited By: | Updated on: May 29, 2024 | 9:55 AM
Share

पुण्यातील पोर्श कार अपघाताचे प्रकरण सध्या देशभरात तापलेले आहे. त्यातच छत्रपती संभाजनगरमधील या विचित्र अपघाताने अनेकांच्या काळजाचा थरकाप उडाला. भरधाव स्कॉर्पिओ कारने चार वाहनांना ठोकरले. भरधाव कारवरील नियंत्रण सुटल्यावर ती गोल गोल फिरली. त्यानंतर तिने चार वाहनांना धडक दिली. त्यानंतर ती पेट्रोल पंपावरील एका खांबाला धडकली. पेट्रोल टँकला धडकणारच तो एका लोखंडी जाळीमुळे पुढील मोठा अनर्थ टळला.

चार जण झाले जखमी

ड्रायव्हरचे नियंत्रण सुटल्याने भरधाव स्कॉर्पिओ जीपने मुख्य रस्त्यावरील वाहनांना उडवत पेट्रोल पंपावर धडकली. यात तीन चारचाकी आणि एका दुचाकीस्वाराला उडवले. या विचित्र अपघातात चार जण गंभीर जखमी झाले आहेत. ही थरारक घटना छत्रपती संभाजीनगर-जळगाव रोडवरील माणिकनगर येथील काळे पेट्रोल पंपासमोर घडली.

असा घडला अपघात

भरधाव स्कॉर्पिओ जीपने मुख्य रस्त्यावरील वाहनांना उडवले. यात तीन चारचाकी आणि एका दुचाकीस्वाराला उडवले. ही धडक इतकी जोरात होती की, या कारच्या एअर बॅग्ज उघडल्या. त्यानंतर सिल्लोडकडून येणाऱ्या कारला (एमएच ०३ सीव्ही २०७०) धडक देऊन पुन्हा वळण घेऊन छत्रपती संभाजीनगरहून येणाऱ्या मोटारसायकलला (एमएच १५ बीव्ही ४३८३) या कारने जोराची धडक दिली.  त्यानंतर ही जीप चक्क काळे पेट्रोल पंपात घुसली.

पेट्रोल पंपावरील कर्मचारी बचावले

कारचा वेग इतका होता की,  पेट्रोल पंपाजवळील खांबाच्या भिंतीला लागून असलेले लोखंडी साइड गार्ड स्कॉर्पिओने तोडले. त्यामुळे पेट्रोल पंपावर एकच गदारोळ माजला. पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या लोकांचा जीव टांगणीला लागला. काहींनी सुरक्षित ठिकाणी धाव घेतली. आता ही स्कॉर्पिओ पेट्रोल टँकला धडकेल आणि मोठा अनर्थ घडेल असे वाटत असतानाच पेट्रोल टँकला लागून असलेल्या लोखंडी जाळीच्या गार्डमध्ये अडकल्याने दुर्घटनाग्रस्त स्कॉर्पियो जागेवरच थांबली. त्यामुळे पंपासमोर असलेले जवळपास तीस जण बचावले. या घटनेनंतर स्कॉर्पिओचालक पळून गेला. कार थांबल्यानंतर पेट्रोल पंपावरील उपस्थित सर्वांनीच सूटकेचा निःश्वास सोडला.

मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.