छत्रपती संभाजीनगरमधून महायुतीचा उमेदवार जाहीर, खैरे विरुद्ध भुमरे असा सामना होणार

संभाजीनगरमधून महायुतीचा उमेदवार जाहीर झाल्याने आता सामना स्पष्ट झाला आहे. येथे ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे विरुद्ध शिंदे गटाचे संदिपान भुमरे असा सामना होणार आहे. दोन शिवसैनिकांमध्ये होत असलेला हा सामना रंजक ठरणार आहे.

छत्रपती संभाजीनगरमधून महायुतीचा उमेदवार जाहीर, खैरे विरुद्ध भुमरे असा सामना होणार
Follow us
| Updated on: Apr 20, 2024 | 5:55 PM

Loksabha election : छत्रपती संभाजीनगरमधून महायुतीचा उमेदवार जाहीर झाला आहे. शिवसेना शिंदे गटाकडून संदिपान भुमरे यांना उमेदवारी जाहीर झाली असून ते 25 एप्रिल रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. छत्रपती संभाजीनगरमधून आता चंद्रकांत खैरे विरुद्ध संदिपान भुमरे असा सामना पाहायला मिळणार आहे. कारण ठाकरे गटाकडून खैरे मैदानात आहेत. चंद्रकांत खैरे यांना तिकीट जाहीर झाल्यानंतर त्यांच्या विरोधात कोणाला उमेदवारी मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. युतीत हा मतदारसंघ शिवसेनेकडे राहिला आहे. त्यामुळे आताही शिवसेनेच्याच दोन नेत्यांमध्ये येथे लढत होणार आहे.

संदिपान भुमरे यांच्या नावावर आज शिक्कामोर्तब झाला आहे. खैरेंच्या विरोधात त्यांना उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा होती. आता दोन शिवसैनिकांमध्ये कांटे की टक्कर पाहायला मिळू शकते. 18 फेब्रुवारी रोजी छत्रपती संभाजीनगरच्या उमेदवारीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महत्त्वाची बैठक घेतली होती. या बैठकीत संदिपान भुमरे यांच्या नावाची चर्चा होती.

वंचितने ही दिलाय उमेदवार

संदिपान भुमरे यांच्यापुढे वंचित वंचित बहुजन आघाडीचं ही आव्हान असणार आहे. वंचितमुळे महाविकासआघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांना फटका बसण्याची शक्यता आहे.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत येथे चौरंगी लढत झाली होती. ज्यामध्ये एमआयएमचे इम्तियाज जलील यांनी बाजी मारली होती. मागच्या निवडणुकीत खैरे दुसऱ्या क्रमांकावर होते. औरंगाबादमधील खैरे त्याआधी चार टर्म खासदार राहिले आहेत. या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने वर्चस्व राहिले आहे.

२०२९ चा निकाल

इम्तियाज जलील पक्षः एमआयएम- वंचित बहुजन आघाडी मतंः 388373

चंद्रकांत खैरे पक्षः शिवसेना मतंः 383186

हर्षवर्धन जाधव पक्षः शिव स्वराज्य बहुजन पक्ष मतंः 282547

सुभाष झांबड पक्षः कॉंग्रेस मतंः 91401

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे चंद्रकांत खैरे विजयी झाले होते. त्यांनी काँग्रेसने माजी आमदार नितीन पाटील यांचा पराभव केला. त्यांनी पाटील यांचा १ लाख ६२ हजार मतांनी पराभव केला होता.

Non Stop LIVE Update
बीड मतदारसंघात घडलंय काय? बूथ कॅप्चरचा कुणाचा आरोप? व्हिडीओ आला समोर
बीड मतदारसंघात घडलंय काय? बूथ कॅप्चरचा कुणाचा आरोप? व्हिडीओ आला समोर.
हे तुम्ही त्यांनाच जाऊन विचारा, दादांवरील प्रश्नावर पवारांचं थेट उत्तर
हे तुम्ही त्यांनाच जाऊन विचारा, दादांवरील प्रश्नावर पवारांचं थेट उत्तर.
विशाल अग्रवालला 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी, कोर्टान नोंदवला हा गुन्हा
विशाल अग्रवालला 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी, कोर्टान नोंदवला हा गुन्हा.
जीवंत माणसं चिरडली जाताय, कुठय तुमच...रोहित पवार आक्रमक थेट केला सवाल
जीवंत माणसं चिरडली जाताय, कुठय तुमच...रोहित पवार आक्रमक थेट केला सवाल.
मग अमित ठाकरे का नाही? नितेश राणे नेमकं काय म्हणाले?
मग अमित ठाकरे का नाही? नितेश राणे नेमकं काय म्हणाले?.
महायुतीत आहोत याची जाणीव ठेवा; अडसूळांनी भाजप नेत्याला फटकारलं
महायुतीत आहोत याची जाणीव ठेवा; अडसूळांनी भाजप नेत्याला फटकारलं.
लोकसभेच्या निकालानंतर महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजलं बिगूल
लोकसभेच्या निकालानंतर महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजलं बिगूल.
अपघातवेळी ड्रायव्हिंग सीटवर कोण होत? पोलीस आयुक्तांचा मोठा खुलासा काय?
अपघातवेळी ड्रायव्हिंग सीटवर कोण होत? पोलीस आयुक्तांचा मोठा खुलासा काय?.
पुणे हिट अँड रन केसमध्ये दबाव की दिरंगाई? पोलीस आयुक्तांनी सांगितलं...
पुणे हिट अँड रन केसमध्ये दबाव की दिरंगाई? पोलीस आयुक्तांनी सांगितलं....
दैव बलवत्तर म्हणून थोडक्यात बचावले, केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर भरकटलं अन
दैव बलवत्तर म्हणून थोडक्यात बचावले, केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर भरकटलं अन.