Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंकडून फडणवीसांचा लाव रे तो व्हिडीओ; धाराशिवच्या संवाद बैठकीत तुफान बॅटिंग, एकदम खणखणीत भाषण

Uddhav Thackeray on Devendra Fadnavis : उद्धव ठाकरे यांनी धाराशिवच्या दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा तो व्हिडिओ बाहेर काढला. शेतकरी कर्जमाफी आणि अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईच्या दिरंगाईवरून त्यांनी महायुती सरकारला सोलपटून काढले.

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंकडून फडणवीसांचा लाव रे तो व्हिडीओ; धाराशिवच्या संवाद बैठकीत तुफान बॅटिंग, एकदम खणखणीत भाषण
उद्धव ठाकरेंची तुफान फटकेबाजी
| Updated on: Nov 06, 2025 | 12:15 PM

Uddhav Thackeray in Dharashiv : उद्धव ठाकरे सध्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत. त्यांचा दगाबाज रे ही मोहीम सध्या चर्चेत आहे. आज उद्धव ठाकरे हे धाराशिव जिल्ह्यात आहेत. त्यांनी करजखेडा येथे शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी भाषनावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणाची क्लिप ऐकवली. निवडणुकीपूर्वी देवेंद्र फडणवीस म्हणाले शेतकऱ्यांचा सातबारा करा. तो त्यांनी उपस्थितांना ऐकवला आणि ‘कोरा कोरा कोरा, मग आता कुठे गेला चोरा चोरा चोरा’,असा टोला त्यांनी लगावला. मतचोरी करुन सत्तेत आलेला आता कुठे गेलात असा सवाल त्यांनी केला आणि जोरदार फटकेबाजी केली.

शेतकऱ्यांशी संवाद, सरकारवर निशाणा

यावेळी उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यावेळी महायुती सरकारवर त्यांनी निशाणा साधला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादांची ऑडिओ क्लीप लावून त्यांनी विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांना काय आश्वासनं दिली होती. याची आठवण त्यांनी शेतकऱ्यांना दिली. तर आता जोपर्यंत कर्जमाफी होत नाही. तोपर्यंत महायुतीला मतदान न करण्याचे आवाहन त्यांनी केले.

मी तुम्हाला हिम्मत द्यायला आलोय.तुमच्या आशीर्वादाने मी कर्जमाफी केली होती.सगळीकडचे शेतकरी म्हणतात ते मदत मिळाली नाही मग पैसा गेला कुठे ? ऊन पाऊस वाऱ्यात थंडीत शेतकरी मर मर मरतोय, शेतकरी भीक मागत नाहीये. प्रतिकूल परिस्थितीत सोन पिकवायचं
आणि एका रात्रीत सर्व माती मोल होत अशी शेतकऱ्यांची व्यथा त्यांनी मांडली. त्याचवेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची कर्जमाफी करणार असल्याची ऑडिओ क्लिप ऐकवली आणि त्यावरून निशाणा साधला.

आधी म्हणाले सातबारा करणार कोरा कोरा कुठे गेला रे चोरा…मतचोरा, कर्जमाफी करा हा काय टोमणा आहे का? मुख्यमंत्री म्हणतात उद्धव ठाकरे टोमणा मारतात. लाडक्या बहिणींना म्हणायचे मिळाले की नाही? मिळाले की नाही पैसे मिळाले की नाही? मग आता काय झालं, असा सवाल त्यांनी केला. शेतकरी मेला तरी चालेल विकास झाला पाहिजे. कॉन्ट्रॅक्टर जगला पाहिजे अशी टीका त्यांनी केली.

शेतकरी तुमच्यावर का चिडला?

मला म्हणतात उद्धव ठाकरेंनी आता घर सोडले यांनी स्वतःच्या घराकडे लक्ष द्यावे.दिल्लीत यांना मुजरा करावा लागतो. होय मी घरी बसून माझा महाराष्ट्र वाचवला. मी घरी बसून कर्जमुक्ती केली. तुम्ही फिरून सुद्धा शेतकरी तुमच्याविरुद्ध चिडला आहे. तुम्हाला का शिव्या घालत आहे, असा सवाल त्यांनी केला. हे बाजार बुणगे तुम्हाला सुख देणार नाही. आनंदाचा शिधा, शिव भोजन बंद आणि यांची दुकान चालू आहे. जे मी बोललो ते करून दाखवतो असा टोला त्यांनी फडणवीस आणि अजितादादांना लगावला.

ही खोटी, निर्दयी माणसं

यावेळी उद्धव ठाकरे यांनी अजित दादांची क्लिप ऐकवली. 31 तारखेच्या आत मध्ये पीक कर्जाचे पैसे भरा अजित पवारांची क्लिप ऐकवली. ही खोटी निर्दयी माणसं यांना पाझर फुटणार नाही. आता जूनचा मुहूर्त काढला आहे. जोपर्यंत कर्ज माफ होत नाही तोपर्यंत महायुतीला मत नाहीय हेक्टरी 50 हजार पिक विमा मिळत नाही तोपर्यंत महायुती ला मत नाही असा निर्धार करा, असे आवाहन उद्धव ठाकरेंनी यावेळी शेतकऱ्यांना केले.

तुम्ही शेतकऱ्यांमध्ये येऊन दाखवा

मुख्यमंत्री मला म्हणतात की मी पहिल्यांदा जनतेत पोहचला आहे. आनंद आहे. मी तर जनतेत आलो आहे. शेतकऱ्यांमध्ये आलो आहे. तुम्ही शेतकऱ्यांमध्ये येऊन संवाद साधून दाखवा, असा टोला त्यांनी लगावला. तर शेतकऱ्यांनी सरकारचा भ्रमाचा भोपळा आणि टरबूज फोडले आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांना सांगतो जात पात धर्म सोडून तुम्ही एकजूट राहा. आम्ही अधिवेशनात त्यांना धारेवर धरू, पण तुम्ही काय करणार असा सवाल उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना केला.तुम्ही सांगायचं जोपर्यंत कर्जमाफी, पीकविमा रक्कम, हेक्टरी 50 हजार मिळत नाही तोपर्यंत आम्ही महायुतीला मतदान करणार नाही असे आवाहन त्यांनी केले. तर उपमुख्यमंत्रीपद संविधानिक नसल्याचे सांगत एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला.