मराठा वकिलांची फौज आंदोलनात हवीच, सरकारला जाब विचारा, कोल्हापुरात संभाजीराजे आक्रमक

मराठा आरक्षणाच्या लढाईत समाजाच्या वकिलांची फौज असली पाहिजे, आरक्षणाची लढाई न्यायालयीन आहे. न्यायिक परिषदेची चळवळ संपूर्ण महाराष्ट्रात जावी, अशी आशा संभाजीराजेंनी व्यक्त केली. (Sambhajiraje appeal to advocates participate in maratha reservation case )

मराठा वकिलांची फौज आंदोलनात हवीच, सरकारला जाब विचारा, कोल्हापुरात संभाजीराजे आक्रमक
Follow us
| Updated on: Oct 04, 2020 | 5:12 PM

कोल्हापूर- मराठा आरक्षणाच्या लढ्यात ठराविक वकिलांवर भर देण्यात येऊ नये, मराठा वकिलांची फौज या लढ्यात असली पाहिजे, वकिलांनी यामध्ये  पुढाकार घ्यावा,असे आवाहन संभाजीराजे कोल्हापूरमध्ये आयोजित न्यायिक परिषदेत बोलताना केले. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजाला EWS मधून आरक्षण नको या भूमिकेचा पुनरुच्चार केला. EWS आरक्षणाचे समर्थन करणारे पुढे काही धोका झाल्यास जबाबदारी घेणार का?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. (Sambhajiraje appeal to advocates participate in maratha reservation case)

राज्य सरकारवर आंदोलनाच्या माध्यमातून वर दबाव टाकलाच पाहिजे. मराठा आरक्षणासाठी न्यायालयीन लढाई देखील महत्वाची आहे. न्यायिक परिषदेची चळवळ संपूर्ण राज्यात जावी, अशी आशा संभाजीराजेंनी व्यक्त केली.

मराठा आरक्षणासाठी आता आंदोलनाचा तिसरा टप्पा सुरू झाला आहे. मागे काय झालं ते पाहायचं नाही, आता पुढे काय होणार ते पाहिलं पाहिजे. कायदेशीर लढाई लढणाऱ्यांना पाठिंबा कसा देता येईल ते पाहिले पाहिजे, असे संभाजीराजे म्हणाले आहेत. स्थगितीवर आज काही बोलणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

EWS स्वीकारून मराठा आरक्षणासाठी 42 जणांनी दिलेले बलिदान व्यर्थ घालावायच का? असा सवाल देखील संभाजीराजेंनी विचारला. EWS घेतल्यावर धोका होणार नाही, याची जबाबदारी समर्थन करणाऱ्यांनी घ्यावी. EWS मधून आरक्षण घेण्याची भूमिका असणाऱ्यांनी SEBC ला धोका होणार नाही, असे लिहून द्यावे, असे आव्हान संभाजीराजेंनी दिले.

2014 नंतर ESBC आरक्षण आणि त्यानंतर SEBC आरक्षणांतर्गत अनेकांना नियुक्तीच्या ऑर्डर मिळाल्या मात्र, त्यांना कामावर घेतले जात नाही. राज्य सरकारच्या हातात हा विषय आहे, त्यावर सरकार निर्णय का घेत नाही, असा सवाल संभाजीराजेंनी केला.

सारथी, आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, राजर्षी शाहू शिष्यवृत्ती, मराठा समाजासाठी वसतिगृहे याबाबत सरकार काम का करत नाही. वकिलांनी याबाबत सरकारला जाब विचारावा. यासंदर्भात आवाज उठवला पाहिजे. कोल्हापूरकरांनी यासाठी पुढाकार घेऊन न्यायालयात याचिका दाखल करावी, असे आवाहन संभाजीराजेंनी केले. बीए केलं, एमबीए केलं वकील झालो असतो तर बर झालं असतं, असेही संभाजीराजे यांनी न्यायिक परिषदेत म्हटले.

संबंधित बातम्या:

राज्यात जातीय विषमता वाढली, ‘शिवशाहू यात्रा’ काढणार; संभाजीराजेंची घोषणा

ना उदयनराजे, ना संभाजीराजे, मेटेंच्या मराठा विचार मंथन बैठकीला प्रमुख नेत्यांची दांडी

(Sambhajiraje appeal to advocates participate in maratha reservation case)

Non Stop LIVE Update
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा.
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन.