AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘आम्ही काय करायचं आणि काय नाही हे तुम्ही आम्हाला शिकवू नका’, शरद पवार-सुनेत्रा पवार यांच्या NCP आमदारांमध्ये जुंपली

Sandeep Kshirsagar : अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शरद पवार यांची भेट घेतली. प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आपण भेटलो असं सुनील तटकरे सांगत आहेत. याबद्दल संदीप क्षीरसागर असं बोलले.

'आम्ही काय करायचं आणि काय नाही हे तुम्ही आम्हाला शिकवू नका', शरद पवार-सुनेत्रा पवार यांच्या NCP आमदारांमध्ये जुंपली
Sandeep Kshirsagar
| Updated on: May 13, 2026 | 1:29 PM
Share

बीड जिल्ह्यातील दोन आमदार पंडित आणि क्षीरसागर यांच्यामध्ये संघर्ष निर्माण झाला आहे. आमदार विजयसिंह पंडित यांनी घेतलेल्या बैठकीनंतर आमदार संदीप क्षीरसागर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलं. आपल्या मतदारसंघातील कामासंदर्भात होत असलेल्या बैठकीचे मला निमंत्रण नाही याबद्दल मी हक्क भंग दाखल करू शकतो असं नमूद केलं. यावरून आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. “आमदार विजयसिंह पंडित यांचं बीडवरती खूप प्रेम उतु चाललं आहे असं दाखवतात. मात्र बीड मधले उद्योग गेवराईला नेत आहेत. बीड MIDC, रेशीम उद्योग हे गेवराईला नेत आहेत” असा आरोप संदीप क्षीरसागर यांनी केला.

अजितदादा असताना विमानतळासाठी मांजरसुंब्याचा पण सर्वे करा असं मी म्हणालो होतो. बॅक वॉटर योजनेसाठी आम्ही सर्वच स्तरावर पाठपुरावा केला. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत अजित दादांना दोनदा सभा घ्याव्या लागल्या. नगरपालिका निवडणुकीत जे काय केलं आहे ते अजित दादांनी केलं आहे. विकास काम असो की भावनेचा विषय. आम्ही अर्ध्या रस्त्यातून, चौकातून पळून जात नाही” असं संदीप क्षीरसागर म्हणाले.

आम्ही दररोज रस्त्यावर फिरून काम करतोय

“बीड वरती प्रेम दाखवतात आणि सगळं गेवराईला घेऊन जातात. आम्ही काय करायचं आणि काय नाही हे तुम्ही आम्हाला शिकवू नका, या मतदारसंघाने आम्हाला दोनदा आमदार केले आहे. आम्ही दररोज रस्त्यावर फिरून काम करत आहोत” असं संदीप क्षीरसागर म्हणाले.

योग्य तो निर्णय मोठे साहेब करतील

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शरद पवार यांची भेट घेतली. प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आपण भेटलो असं सुनील तटकरे सांगत आहेत. याबद्दल संदीप क्षीरसागर यांना विचारलं असता ते म्हणाले की, “त्या बाबतीत मला काही माहित नाही. मात्र अजित दादा होते शेवटची भेट झाली तेव्हा, ते मला म्हणाले होते आपण एकत्र येणार आहोत. पण त्यावर एवढं काही राजकारण सुरू आहे, त्यामुळे मी त्यावर काहीच बोललो नाही.योग्य तो निर्णय मोठे साहेब आणि त्यांचा परिवार ते करतील सगळे”

Follow Us
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?.
शिरसाटांचा मोठा दावा- निदा खानला कोणी लपवलं? थेट त्या नेत्याचं नावच...
शिरसाटांचा मोठा दावा- निदा खानला कोणी लपवलं? थेट त्या नेत्याचं नावच....
सरकार गुंडागर्दी करून घर पाडू शकते, पुन्हा घर बांधण्याची ताकद.....
सरकार गुंडागर्दी करून घर पाडू शकते, पुन्हा घर बांधण्याची ताकद......
अवघ्या 38 व्या वर्षी अखिलेश यादव यांच्या लहान भावाचं दुःखद निधन...
अवघ्या 38 व्या वर्षी अखिलेश यादव यांच्या लहान भावाचं दुःखद निधन....
मोठी बातमी! सोनिया गांधी यांची प्रकृती पुन्हा बिघडली, मेदांता हॉस्पिटल
मोठी बातमी! सोनिया गांधी यांची प्रकृती पुन्हा बिघडली, मेदांता हॉस्पिटल.
पाकिस्तानी गँगस्टरशी कनेक्शन? पहाटेपासून ATS ची रेड, मुंबईसह.......
पाकिस्तानी गँगस्टरशी कनेक्शन? पहाटेपासून ATS ची रेड, मुंबईसह........
NEET पेपरफुटी प्रकरणी नाशिक ठाण्यानंतर आणखी एका नामांकित शहराचं नाव सम
NEET पेपरफुटी प्रकरणी नाशिक ठाण्यानंतर आणखी एका नामांकित शहराचं नाव सम.
मोदी सरकारचा मोठा दणका! सोन्यावर आयात शुल्क थेट 15% ; भाव गगनाला भिडले
मोदी सरकारचा मोठा दणका! सोन्यावर आयात शुल्क थेट 15% ; भाव गगनाला भिडले.
मोठी बातमी! ज्या परिसरात अजितदादांचं विमान अपघात झाला, तिथंच विमान....
मोठी बातमी! ज्या परिसरात अजितदादांचं विमान अपघात झाला, तिथंच विमान.....
मोदींच्या आवाहनावरून विरोधक आक्रमक; आव्हाड घोड्यावर, पुण्यात.....
मोदींच्या आवाहनावरून विरोधक आक्रमक; आव्हाड घोड्यावर, पुण्यात......