.
AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

त्रिशाने विजय यांच्या मुलांना जन्म दिला नाही..; पोस्ट पाहून भडकली अभिनेत्री; ट्रोलर्सना म्हणाली..

थलपती विजय यांच्या शपथविधी सोहळ्यात उपस्थित राहिल्यानंतर अभिनेत्री त्रिशा कृष्णनला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केलं जातंय. अशातच एका प्रसिद्ध अभिनेत्रीने त्रिशा ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे.

त्रिशाने विजय यांच्या मुलांना जन्म दिला नाही..; पोस्ट पाहून भडकली अभिनेत्री; ट्रोलर्सना म्हणाली..
थलपती विजय, त्रिशा कृष्णनImage Credit source: Instagram
| Updated on: May 13, 2026 | 1:25 PM
Share

अभिनेत्री त्रिशा कृष्णनने थलपती विजय यांच्या शपथविधी सोहळ्याला हजेरी लावल्यापासून सोशल मीडियावर तिच्यावर प्रचंड टीका होत आहे. त्रिशाने किमान विजय यांच्या पत्नी आणि मुलांचा तरी विचार करायला पाहिजे होता, अशा प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत. गेल्या काही काळापासून त्रिशा आणि विजय यांच्या नातेसंबंधाच्या जोरदार चर्चा आहेत. या चर्चांदरम्यान विजय यांच्या शपथविधी सोहळ्यातील त्रिशाच्या उपस्थितीने सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. अशातच एका प्रसिद्ध अभिनेत्रीने त्रिशाची बाजू घेत तिच्या ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिलं आहे. ही अभिनेत्री दुसरी-तिसरी कोणी नसून कुनिका सदानंद आहे. एक महिलाच दुसऱ्या महिलेची शत्रू असते आणि ही गोष्ट आज पुन्हा एकदा सिद्ध झाल्याचं कुनिकाने म्हटलं आहे.

सोशल मीडियावर एका युजरने त्रिशाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करत एक व्हिडीओ पोस्ट केला. हा व्हिडीओ पाहून कुनिकाचा संताप अनावर झाला आणि तिने ट्रोलर्सना सुनावलं. थलपती विजय यांच्या शपथविधी सोहळ्यात त्रिशाच्या भावूक होण्याचा हा व्हिडीओ होता. या व्हिडीओवर संबंधित युजरने लिहिलं, ‘त्रिशा कृष्णनचं अभिनयकौशल्य अप्रतिम आहे. विजय यांच्या कठीण काळात तिने संघर्ष केला नाही. त्यांच्या मुलांना तिने जन्म दिला नाही. मुलांचं पालनपोषणसुद्धा तिने केलं नाही. ती फक्त त्यांच्या कुटुंबाची मेहनत आणि प्रसिद्धीचा आनंद घ्यायला आली होती.’ या व्हिडीओवर आणि पोस्टवर कुनिकाने उत्तर दिलं आहे.

त्रिशाला लक्ष्य करणाऱ्या नेटकऱ्यांविरोधात तीव्र संताप व्यक्त करत कुनिकाने लिहिलं, ‘पुन्हा तेच! पुन्हा एकदा एका महिलेवरच निशाणा साधला जातोय आणि तिच्यावरच प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पण लग्नाच्या शपथा घेणारी ती नव्हतीच मुळी! एखादी स्त्री हीच दुसऱ्या स्त्रीची सर्वांत मोठी शत्रू असते, असं लोक जे म्हणतात ते अगदीच खरं आहे आणि तू तेच सिद्ध करून दाखवलं आहेस.’ कुनिकाच्या या उत्तराने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. विशेष म्हणजे कुनिकासुद्धा एकेकाळी विवाहित गायक कुमार सानू यांच्यासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहिली होती. कुनिका आणि गायक कुमार सानू यांच्या नात्याने एकेकाळी सर्वांचं लक्ष वेधलं होतं. हे दोघं जवळपास पाच वर्षे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते.

Follow Us
टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; दादा भुसे यांची मोठी घोषणा
Dada Bhuse On Paper Leak | टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; शिक्षणमंत्री दादा भुसे यांची विधानसभेत मोठी घोषणा
मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर....
Nashik | मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर, नेमकं घडलं काय?
नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
CM Devendra Fadnavis | चिमुकलीला अखेर न्याय! नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी
Mallikarjun Kharge | मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी; संसदेकडून अधिकृत बुलेटिन जारी
पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या
Pune Protest | पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या भिंतीवर चढल्या, मागणी काय?
सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा सोहळा
Sindhudurg Vatpurnima Celebration | ऐकावं ते नवलच! सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा अनोखा सोहळा
नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त
Uddhav Thackeray | नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त; उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर घणाघात
ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा समाचार
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा घेतला समाचार
एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार
Chhatrapati Sambhajinagar | एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार; आरोपी 12 तासांत गजाआड
TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
मोठी बातमी! TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर