AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Monsoon Update : राज्यात अतिवृष्टीचा इशारा, हे 5 दिवस धोक्याचे, या जिल्ह्यांना हाय अलर्ट, डख यांचा मोठा इशारा

राज्यात आता पावसाला जोरदार सुरुवात झाली आहे, त्यामुळे चिंता मिटली आहे. महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मात्र आता राज्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांचा नवा अंदाज समोर आला आहे.

Monsoon Update : राज्यात अतिवृष्टीचा इशारा, हे 5 दिवस धोक्याचे, या जिल्ह्यांना हाय अलर्ट, डख यांचा मोठा इशारा
पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 29, 2026 | 8:40 PM
Share

जून महिना संपत आला तरी देखील राज्यात पावसाने हजेरी न लावल्यामुळे सर्वांचीच चिंता वाढली होती. सर्वांचे डोळे पावसाकडे लागले होते. परंतु आता राज्यात पावसाचं दमदार आगमन झालं आहे. महाराष्ट्रातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची चिंता मिटली आहे. दरम्यान भारतीय हवामान विभागानं (IMD) ने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील काही दिवस राज्यात आता पावसाचा जोर आणखी वाढणार आहे. नागपूर वेधशाळेनं वर्तवलेल्या अंदाजानुसार विदर्भात येत्या 3 जुलै ते 7 जुलैदरम्यान मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर पुढील दोन ते तीन दिवस हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भाप्रमाणेच इतरही भागांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर आता हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज समोर आला आहे.

काय आहे नवा हवामान अंदाज 

हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी वर्तवलेल्या नव्या अंदाजानुसार राज्यात येत्या 3 जुलैपासून  ते 7 जुलैपर्यंत अतिवृष्टीची शक्यता आहे.  पुणे, मुंबई, अकोला, अहिल्यानगर, नांदेड, नाशिक, नंदूबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये या काळात धुव्वाधार पाऊस होणार असून, नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहान डख यांनी केलं आहे. येत्या तीन जुलैपर्यंत राज्यातील काही भागांमध्ये हलका ते काही भागांमध्ये मध्यम स्वरुपाचा पाऊस पडले असा अंदाज देखील त्यांनी वर्तवला आहे. मात्र तीन जुलैपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार असून, अतिमुसळधार पाऊस पडले असं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान परतीचा पाऊस महाराष्ट्रात जोरदार कोसळेल असा अंदाज देखील पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे.

जूनमध्ये पावसाची तूट 

गेल्या वर्षी जून महिन्यात या वर्षीच्या तुलनेत चांगला पाऊस झाला होता, मात्र यावर्षी जून महिन्यात पावसाने दडी मारल्यामुळे पावसामध्ये मोठी तूट निर्माण झाली आहे. एकट्या विदर्भात जवळपास 50 टक्के तूट झाली आहे. ही तूट लवकर भरून निघण्याची शक्यता कमी आहे, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा