माजी सैनिकासाठी पडळकर, खोत थेट प्रांताधिकाऱ्याच्या केबिनमध्ये

माजी सैनिकासाठी पडळकर, खोत थेट प्रांताधिकाऱ्याच्या केबिनमध्ये

पडळकर आणि खोत यांनी थेट प्रांताधिकारी यांची केबिन गाठत याबाबतचा प्रश्न उपस्थित केला. (Sangli EX Armyman on hunger strike)

Namrata Patil

|

Jan 27, 2021 | 6:42 PM

सांगली : गेल्या दोन दिवसांपासून माजी सैनिक इस्लामपूर तहसील आणि प्रांत कार्यालयाबाहेर उपोषणाला बसले आहेत. या सैनिकांनी पैसे भरुन जागा मंजूर केली होती. मात्र अचानक त्यांना ती जागा नाकरण्यात आली आहे. त्यामुळे या सैनिकांनी उपोषण केलं आहे. माजी सैनिकांसाठी आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत आक्रमक झाले आहेत. पडळकर आणि खोत यांनी थेट प्रांताधिकारी यांची केबिन गाठत याबाबतचा प्रश्न उपस्थित केला. (Sangli EX Armyman on hunger strike Gopichand Padalkar and Sadabhau Khot Visit)

नेमकं प्रकरण काय?

सांगलीतील साखराळे गावातील 4 माजी सैनिक हे आपल्या सर्व कुटुंबियांसोबत इस्लामपूर तहसील आणि प्रांत कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत. माजी सैनिकांना देण्यात येणाऱ्या प्लॉटचे पैसे भरून त्यांना जागा मजूर केली होती. मात्र अचानक त्यांना ती जागा नाकारण्यात आली. त्यामुळे उपोषण सुरू केलं.

इस्लामपूर येथील प्रांत ऑफिससमोर साखरळे येथील चार माजी सैनिक बसले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून सचिन पवार, गणेश मोकरे, सुभाष शिंदे, महेश उथळे या चार माजी सैनिकांनी आंदोलन सुरू केलं. या चार माजी सैनिकांनी साखराळे गावात राहण्यासाठी घर मिळावी अशी मागणी केली. विशेष म्हणजे 2016 – 17 मध्ये या चार माजी सैनिकांकडून प्रांत कार्यालयाने पैसे भरून घेतले. त्यानंतर सरकारने प्लॉट देण्याचे मान्य केले. मात्र काही दिवसांनंतर गावठाणातील जमीन देता येणार नाही विस्तारित भागात जमीन देऊ, असे पत्र आले.

यानंतर साखराळे गावातील 4 माजी सैनिकांनी कुटुंबियांसोबत इस्लामपूर तहसील आणि प्रांत कार्यालयासमोर उपोषणास सुरुवात केली.

गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत आक्रमक

आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी उपोषणाच्या ठिकाणी भेट दिली. तेव्हा गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत आक्रमक झाले. त्यानंतर हे दोघेही प्रांताधिकारी यांच्या केबीनमध्ये माजी सैनिकासहित पोहचले. प्रांताधिकारी येऊन ठोस आश्वासन देईपर्यंत येथून जाणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली.

इतर माजी सैनिकांना जमीन दिली आहे. मग या चार माजी सैनिकांना जमीन का दिली जात नाही. इस्लामपूरचे प्रांताधिकारी राजकीय दबावाखाली काम करत आहेत. हे प्लॉट माजी सैनिकांकडून घेऊन राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना देण्याचा डाव आहे का? असा सवाल पडळकरांनी विचारला.

“मंत्री जयंत पाटील हे यात्रा घेऊन राज्यभर जात आहेत. राज्याचे राहू द्या तुमच्या गावचं बघा, तुम्ही ज्या गावात स्वत: मतदान करता, त्या गावातील माजी सैनिक कुटुंबासह उपोषण करत आहेत. त्यांच्याकडे लक्ष द्या,” असा आरोप भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. (Sangli EX Armyman on hunger strike Gopichand Padalkar and Sadabhau Khot Visit)

संबंधित बातम्या : 

राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मावळमध्ये शेतकऱ्यांवर गोळ्या घातल्या, दिल्लीतही तसंच वातावरण तयार केलं : सुधीर मुनगंटीवार

लातूरच्या सृष्टीची आशिया बुकमध्ये नोंद, सलग 24 तास लावणी नृत्याचा विक्रम

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें