Sangli Gram Panchayat Election Results 2021 | सांगलीत काँग्रेसची मुसंडी, सर्वाधिक जागांसह अव्वल स्थान पटकावलं

त्यामुळे सांगलीत सर्वाधिक जागांसह काँग्रेसने अव्वल स्थान पटकावलं आहे.  (Sangli Gram Panchayat Election Results 2021)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 18:23 PM, 18 Jan 2021
Sangli Gram Panchayat Election Results 2021 | सांगलीत काँग्रेसची मुसंडी, सर्वाधिक जागांसह अव्वल स्थान पटकावलं

सांगली : महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत. राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये 12 हजार 711 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. या सर्व ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची मतमोजणी सुरु आहे. सांगली जिल्ह्यातल्या 152 ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या. यात काँग्रेसच्या मुसंडी पाहायला मिळत आहे. (Sangli Gram Panchayat Election Results 2021)

सांगली जिल्ह्यात एकूण 152 ग्रामपंचायतची निवडणूक होती. सांगली जिल्ह्यात आजचे निकाल आणि अगोदर बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायत अशा एकूण निकाल जाहीर करण्यात आले. यात काँग्रेसच्या पॅनलने सर्वाधिक विजय मिळवला आहे. त्यामुळे सांगलीत सर्वाधिक जागांसह काँग्रेसने अव्वल स्थान पटकावलं आहे.

सांगली जिल्ह्यात काँग्रेस पहिल्या क्रमांकावर आहे. यात काँग्रेस – 49, राष्ट्रवादी 34, स्थानिक आघाडी 34, भाजपा 20, शिवसेनेनं 15 ग्रामपंचायतींवर विजय मिळवला आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यात काँग्रेसचे वर्चस्व पाहायला मिळत आहे.

सांगली ग्रामपंचायत निकाल

  • काँग्रेस पॅनल – 49
  • राष्ट्रवादी पॅनल – 34
  • स्थानिक आघाडी – 34
  • भाजपा पॅनल – 20
  • शिवसेना पॅनल – 15

दरम्यान सांगली जिल्ह्यात लक्षवेधी ठरलेल्या म्हैसाळ ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना दणका बसला आहे.मंत्री पाटील यांचे मेहुणे असणाऱ्या मनोज शिंदे-म्हैसाळकर यांच्या पॅनलचा दारुण पराभव झाला आहे. या ठिकाणी भाजपा गटाने याठिकाणी एक हाती सत्ता मिळवली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका नेते मनोज शिंदे-म्हैसाळकर यांच्या पॅनलची गेल्या दहा वर्षापासून सत्ता आहे. गेल्या पाच वर्षांपासून या ठिकाणी मंत्री जयंत पाटील यांची मेहुणी असणाऱ्या मनोरमादेवी शिंदे या सरपंच म्हणून काम पाहत होत्या. या निवडणुकीमध्ये पुन्हा मनोरमा शिंदे यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील 6 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. ज्यामध्ये सरपंच मनोरमादेवी शिंदे यांची मुलगी, दीर आणि अन्य कुटुंबातील सदस्य मैदानात होते. (Sangli Gram Panchayat Election Results 2021)

संबंधित बातम्या : 

“नागपूर जिल्ह्यात 73 ग्रामपंचायतीत यश, पूर्व विदर्भात भाजप सर्वात मोठा पक्ष”, भाजप आमदार समिर मेघेंचा दावा

राज ठाकरेंच्या मनसेने मुंबईचं दार ठोठावलं, BMC पासून हाकेच्या अंतरावरील ग्रामपंचायत जिंकली