“नागपूर जिल्ह्यात 73 ग्रामपंचायतीत यश, पूर्व विदर्भात भाजप सर्वात मोठा पक्ष”, भाजप आमदार समीर मेघेंचा दावा

“नागपूर जिल्ह्यात 73 ग्रामपंचायतीत यश, पूर्व विदर्भात भाजप सर्वात मोठा पक्ष”, भाजप आमदार समीर मेघेंचा दावा

नागपूर जिल्ह्यात 73 ग्रामपंचायतीमध्ये भाजपला विजय मिळाल्याचा दावा भाजप नेते आमदार समीर मेघे यांनी केलाय. शिवाय पूर्व विदर्भातही सर्वाधिक ग्रामपंचायत भाजपच्या ताब्यात आल्याचं समीर मेघे यांनी सांगितलंय.

प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Jan 18, 2021 | 6:29 PM

नागपूर : नागपूर जिल्ह्यात 73 ग्रामपंचायतीमध्ये भाजपला विजय मिळाल्याचा दावा भाजप नेते आमदार समीर मेघे यांनी केलाय. शिवाय पूर्व विदर्भातही सर्वाधिक ग्रामपंचायत भाजपच्या ताब्यात आल्याचं समीर मेघे यांनी सांगितलंय. “पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया आणि वर्धा जिल्ह्यात भाजपला मोठं यश मिळालंय. गेल्या वर्षभरात महाविकास आघाडी सरकारच्या धोरणाला ग्रामीण भागातील जनता कंटाळलीय. त्यामुळेच जनतेने हा कौल दिलाय. पूर्व विदर्भात भाजपचे सर्वाधिक सरपंच होतील,” असा दावा समीर मेघे यांनी केलाय (BJP MLA Sameer Meghe claims on Vidarbha Gram Panchayat Election results).

वर्धा जिल्ह्यात भाजपची जबरदस्त मुसंडी

आतापर्यंत 50 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. यात भारतीय जनता पार्टीने मुसंडी मारल्याचे दिसून येत आहे. 50 पैकी 29 ग्राम पंचायतींमध्ये भाजपची एकहाती सत्ता आलीय. काँग्रेसच्या हाती असलेल्या अनेक ग्रामपंचायतींवर यावेळी मतदारांनी भाजपला कैाल दिलाय. सेलू तालुक्यातील सर्वात मोठ्या हिंगणी ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत भाजपचे 8 तर राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित निघडे गटाचे 7 उमेदवार विजयी झालेत. येळाकेळी ग्रामपंचायतीवर भाजपचे 12 उमेदवार निवडून आलेत.

हिंगणघाट तालुक्यातील शिरूड ग्रामपंचायतमध्ये भाजपने 9 पैकी 6 जागा जिंकल्या, तर 3 जागांवर काँग्रेस विजयी झाली. आष्टी तालुक्यात पोरगव्हाण ग्रामपंचायतीत 6 जागांवर भाजप, तर काँग्रेस 3 जागांवर विजयी झाली.

भंडारा जिल्ह्यात भाजपची एकहाती सत्ता, महाविकास आघाडीचा धुव्वा

भंडारा जिल्ह्यातील 148 पैकी 95 ग्राम पंचायतींमध्ये भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालंय. महविकास आघाडीला केवळ 53 जागा मिळाल्या.

गोंदिया जिल्ह्यात महाविकास आघाडीला खिंडार, भाजपाचं एकहाती वर्चस्व

एकूण 181 ग्रामपंचायतींपैकी भाजपला 95 जागांवर स्पष्ट बहुमत मिळालंय. महाविकास आघाडीला 78 जागा आणि 8 जागांवर इतर उमेदवार विजयी झालेत.

हेही वाचा :

Gram Panchayat Election Results 2021 Maharashtra LIVE | 1949 पासून गाव बिनविरोध, पहिल्यांच निवडणूक, भाजपचा 7 पैकी 7 जागांवर विजय

Maharashtra Gram Panchayat Election 2021 : काँग्रेसच्या दोन दिग्गज माजी मुख्यमंत्र्यांच्या गावात शत प्रतिशत भाजप

गाव कारभाऱ्यांनो, जय-परायज विसरुन संधीचं सोनं करा; अजितदादांचं आवाहन

व्हिडीओ पाहा :

BJP MLA Sameer Meghe claims on Vidarbha Gram Panchayat Election results

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें