AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवसेनेला जागा सोडली, सांगलीत काँग्रेसमध्ये पडद्यामागे मोठ्या हालचाली, विशाल पाटलांचा निर्णय पक्का

sangli lok sabha constituency: सांगलीतील काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. त्यांनी सोशल मीडियावरुन नाराजी व्यक्त करणे सुरु केले आहे. विशाल पाटील प्रेमी कार्यकर्ते आक्रमक झालेले दिसत आहेत. 'आमचे काय चुकले, आता लढायचं, जनतेच्या कोर्टात', अशी पोस्ट कार्यकर्ते सोशल मीडियावर टाकत आहेत.

शिवसेनेला जागा सोडली, सांगलीत काँग्रेसमध्ये पडद्यामागे मोठ्या हालचाली, विशाल पाटलांचा निर्णय पक्का
काँग्रेस कार्यकर्त्यांनी विशाल पाटील यांची व्हायरल केलेली पोस्ट
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Apr 09, 2024 | 1:35 PM
Share

महाविकास आघाडीचे जागा वाटप अखेर गुढी पाडव्याचा मुहूर्तावर मंगळवारी झाले. या जागा वाटपात सर्वाधिक चर्चेत आलेली सांगलीची जागा शिवसेनेला मिळाली. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी हा निर्णय जाहीर करताच सांगली काँग्रेसमध्ये मोठ्या हालचाली सुरु झाल्या. पक्षाचे नेते विश्वजित कदम आणि इच्छूक उमेदवार विशाल पाटील नॉट रिचेबल झाले. त्याचवेळी महाविकास आघाडीच्या निर्णयावर सांगली जिल्ह्यातल्या काँग्रेस नेत्यांनी उद्या बुधवारी तातडीची बैठक बोलवली. विशाल पाटील यांचे कार्यकर्त्यांनी विशाल पाटील अपक्ष निवडणूक लढवणार असल्याची पोस्ट व्हायरल केली.

महाविकास आघाडीच्या निर्णयानंतर सांगलीत खदखद

महाविकास आघाडीने सांगलीची जागा काँग्रेस ऐवजी शिवसेना ठाकरे गटाला देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयावर सांगलीत चांगलीच नाराजी दिसत आहे. विश्वजीत कदम, विशाल पाटील, विक्रम सावंत, जयश्री पाटील आणि पृथ्वीराज पाटील प्रमुख नेत्यांनी उद्या तातडीने बैठक बोलवली आहे. या बैठकीत मोठा निर्णय घेतला जाणार आहे. कार्यकर्ते आणि नेत्यांच्या चर्चेनंतर पुढचा निर्णय घेतला जाईल, असे सांगली शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी सांगितले. मात्र अंतीम निर्णय विशाल पाटील घेणार आहेत. उद्या बुधवारी सकाळी 11 वाजता बैठक होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कार्यकर्ते आक्रमक

सांगलीतील काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. त्यांनी सोशल मीडियावरुन नाराजी व्यक्त करणे सुरु केले आहे. विशाल पाटील प्रेमी कार्यकर्ते आक्रमक झालेले दिसत आहेत. ‘आमचे काय चुकले, आता लढायचं, जनतेच्या कोर्टात’, अशी पोस्ट कार्यकर्ते सोशल मीडियावर टाकत आहेत.

दिल्लीवारी व्यर्थ

सांगलीची जागा शिवसेनेकडे जाऊ नये, यासाठी विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांनी बरेच प्रयत्न केले. दोन दिवसांपूर्वी ते दिल्लीत गेले होते. त्यांनी पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि इतर नेत्यांसोबत चर्चा केली. ही जागा काँग्रेसची आहे आणि काँग्रेसला मिळावी, अशी भूमिका विश्वजित कदम यांनी मांडली होती. परंतु त्यानंतर ही जागा शिवसेनेकडे गेली. यामुळे आता विशाल पाटील अपक्ष निवडणूक लढण्याची शक्यता आहे.

Follow Us
मुंबईतील 300 हून अधिक SRA प्रकल्पांत घोटाळा? 30 हजार कोटीचा नुकसान...
Sanjay Raut : मुंबईतील 300 हून अधिक SRA प्रकल्पांत घोटाळा? 30 हजार कोटीचा नुकसान, राऊतांच्या दाव्याने खळबळ
अमित शहांच्या स्वागतासाठी पुण्यात शिंदेसेनेची जोरदार बॅनरबाजी; भाजप...
अमित शहांच्या स्वागतासाठी पुण्यात शिंदेसेनेची जोरदार बॅनरबाजी; भाजपलाही टाकलं मागे!
आता कोकण मुंबईपासून आणखी जवळ! चिपी ते नवी मुंबई थेट विमानसेवा सुरू
आता कोकण मुंबईपासून आणखी जवळ! चिपी ते नवी मुंबई थेट विमानसेवा सुरू
मफलर मॅनचा चेहरा आज येणार समोर? रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेकडे...
मफलर मॅनचा चेहरा आज येणार समोर? रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेकडे महाराष्ट्राचे लक्ष!
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चां
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून धक्कादायक
Solapur : आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून श्रद्धांजलीच्या पोस्ट
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना...
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा; संजय राऊतांचा इशारा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा खुलासा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा मोठा खुलासा, म्हणाले...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्सवरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपटावरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी अखेर मौन सोडलं, थेट केलं मोठं विधान...
अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी..
IND vs NZ: अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी सामना जिंकला