AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काँग्रेसला पुन्हा मोठं खिंडार, धडधडणारी तोफ शिंदे गटात; काँग्रेसच्या बड्या नेत्याने पक्ष सोडला

congress raju waghmare: काँग्रेसला आणखी झटका बसला आहे. पक्षाची भूमिका माध्यमांकडे मांडणाऱ्या व्यक्तीनेच हा धक्का दिला आहे. काँग्रेस पक्षाचे प्रवक्त राजू वाघमारे यांनी काँग्रेसची साथ सोडत शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी काँग्रेसवर घणाघाती हल्ला त्यांनी केला.

काँग्रेसला पुन्हा मोठं खिंडार, धडधडणारी तोफ शिंदे गटात; काँग्रेसच्या बड्या नेत्याने पक्ष सोडला
राजू वाघमारे, एकनाथ शिंदे
| Updated on: Apr 09, 2024 | 11:30 AM
Share

काँग्रेसमधून एकामागे एक नेते बाहेर पडत आहेत. मुंबईतील बडे राजकीय व्यक्तीमत्व मिलिंद देवरा यांनी काही दिवसांपूर्वी पक्ष सोडला. त्यानंतर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पक्षाला रामराम केला. मग बाबा सिद्दिकी यांनी काँग्रेसची साथ सोडली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला पुन्हा एक धक्का बसला आहे. आता पक्षाची भूमिका माध्यमांकडे मांडणाऱ्या व्यक्तीनेच हा धक्का दिला आहे. काँग्रेस पक्षाची धडधडणारी तोफ शिवसेनेत गेली आहे. काँग्रेस पक्षाचे प्रवक्त राजू वाघमारे यांनी काँग्रेस पक्षाची  साथ सोडत शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी काँग्रेसवर घणाघाती हल्ला त्यांनी केला.

काय म्हणाले राजू वाघमारे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजू वाघमारे यांचे शिवसेनेत स्वागत केले. त्यानी वाघमारे यांना शिवसेनेचा भगवा ध्वज दिला. यावेळी बोलताना राजू वाघमारे म्हणाले की, काही नेत्यांच्या गलिच्छ राजकारणामुळे पक्षाची अवस्था वाईट झाली आहे. काँग्रेस पक्ष आता उद्धव ठाकरे यांच्या हाताखाली दबलेला पक्ष झाला आहे. सांगली आणि भिवंडी येथील जागेबाबत असाच निर्णय झाला. सांगलीची जागा शिवसेनेने जाहीर केली.

भिवंडीची जागा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने घेतली. या सर्व प्रकाराचा परिणाम माझ्यावर झाला आहे. यामुळे मी कॉमन मॅन मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश घेत आहे. भविष्य काय आहे, हे भविष्य दाखविण्यासाठी आज चांगलं दिवस आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विकास काय आहे, हे दाखवून दिले आहे. त्यांनी कमी वेळेत राज्याचा मोठा विकास केला आहे. आतापर्यंत कोणत्याच मुख्यमंत्री यांनी असे काम केले नाही. हे विरोधकांना देखील मान्य करावे लागेल.

तो सर्व्हे सांगितला

राज वाघमारे यांनी सांगितले की, मी काँग्रेसमध्ये असताना एक सर्व्ह आला होता. त्या सर्व्हमध्ये लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, असे मी ऑन रिकोर्डवर संगितले होते. लाखो कार्यकर्ते त्यांच्या मागे आहेत. ते एअर कंडिशनमध्ये बसणारे नेते नाहीत. सामान्य मुख्यमंत्री आहेत.

शिवसेनेत प्रवेश करताना प्रसंगी बोलताना राजू वाघमारे

अनेक प्रकल्प थांबले होते

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला केला. राज्यात काँग्रेसचा ना झेंडा, ना अजेंडा राहिला आहे. 35 वर्षे प्रामाणिकपणे राजू वाघमारे यांनी पक्षाचे काम केले. त्यांच्यासारख्या कार्यकर्त्यांची पक्षात घुसमट होत होती. यामुळे त्यांनी चांगला निर्णय घेतला आहे. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये अनेक प्रकल्प थांबले होते. आता जोरदार काम सुरु आहे.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.