माणुसकीला काळिमा! अवघ्या 13 दिवसांच्या बाळाची हत्या, मृतदेह पाण्याच्या टाकीत सापडला

या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे.

माणुसकीला काळिमा! अवघ्या 13 दिवसांच्या बाळाची हत्या, मृतदेह पाण्याच्या टाकीत सापडला

सांगली : राज्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. एका बालकाच्या हत्येनं संपूर्ण सांगली शहर हादरलं आहे. सांगलीतल्या भिलवडीतील पाटील मळा इथं अवघ्या 13 दिवसाच्या बालकाचा निर्दयीपणे खून करण्यात आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे. (Sangli Murder of 13 day old baby dead body found in water tank in)

मिळालेल्या माहितीनुसार, पाण्याच्या टाकीत 13 दिवसाच्या चिमुरड्याचा मृतदेह आढळला. स्थानिकांच्या ही बाब लक्षात येताच तात्काळ पोलिसांना पाचारण करण्यात आलं. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.

पोलिसांनी घटनास्थळी शोध सुरू केला असता सिंटेक्स पाण्याच्या टाकीत टाकूनच 13 दिवसाच्या बाळाची हत्या करण्यात आली असावी असा संयश व्यक्त करण्यात येत आहे. अपर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले यांच्यासह पोलीस घटनास्थळी अधिक तपास करत असून अद्याप खुनाचं कारण समजू शकलेलं नाही.

बाळाविषयी आणि त्याच्या कुटुंबाविषयी अधिक माहिती गोळा करण्यात काम पोलीस सध्या करत आहे. पोलिसांच्या पथकाने टाकीतून बाळाचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. बाळाचा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच नेमका मृत्यू झाला कसा याचा खुलासा होईल. यामुळे पुढील तपास करण्यास मदत होईल अशी चर्चा आहे.

दरम्यान, घडलेल्या प्रकाराविषयी पोलीस स्थानिक आणि प्रत्यक्षदर्शींची चौकशी करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. तर अधिक माहितीसाठी गावातील सीसीटीव्हीदेखील तपासण्यात येणार असल्याची प्राथमिक माहिती आहे.

इतर बातम्या – 

ठाकरे सरकारच्या अहंकारी वृत्तीचा देशभरात धिक्कार होतोय, उद्धव ठाकरेंना किंमत मोजावी लागेल: दरेकर

US Election 2020 : ‘विजेत्याची घोषणा करणं मतदारांचं काम’, निकालापूर्वीच बायडन-ट्रम्पमध्ये ट्विटर वॉर

(Sangli Murder of 13 day old baby dead body found in water tank in)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI