AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाकरे सरकारच्या अहंकारी वृत्तीचा देशभरात धिक्कार होतोय, उद्धव ठाकरेंना किंमत मोजावी लागेल: दरेकर

सरकारने सुडाच्या भावनेने कट रचून अर्णव गोस्वामी यांना अटक केली | Pravin Darekar

ठाकरे सरकारच्या अहंकारी वृत्तीचा देशभरात धिक्कार होतोय, उद्धव ठाकरेंना किंमत मोजावी लागेल: दरेकर
| Updated on: Nov 04, 2020 | 3:26 PM
Share

अलिबाग: ठाकरे सरकारने पत्रकार अर्णव गोस्वामी यांना अहंकारी भावनेने अटक केली आहे. त्यांच्या या वृत्तीचा देशपातळीवर धिक्कार होत असल्याची टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली. आम्ही ठाकरे सरकारची ही दडपशाही खपवून घेणार नाही. यापूर्वी देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती तेव्हा देशातील जनतेने ती सत्ता उलथवून टाकली. त्यामुळे भविष्यात सोनिया गांधी, राहुल गांधी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या सगळ्याची किंमत मोजावी लागेल, असा इशारा प्रवीण दरेकर यांनी दिला. (BJP Leader Pravin Darekar take a dig at Thackeray govt)

रिपब्लिक वृत्तवाहिनीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना अटक केल्यानंतर अलिबाग येथील न्यायालयात हजर करण्यात आले. ही बातमी समजल्यानंतर आमदार राहुल नार्वेकर, रवी पाटील, प्रवीण दरेकर, किरीट सोमय्या हे प्रमुख नेते अलिबागमध्ये दाखल झाले आहेत. याठिकाणी प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रवीण दरेकर यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली. अन्वय नाईक यांच्या परिवाराला न्याय जरुर मिळाला पाहिजे. पण अर्णव गोस्वामी यांनी राज्य सरकारवर टीका केल्यामुळे सरकार दुखावले गेले होते. त्यामुळे सरकारने सुडाच्या भावनेने कट रचून अर्णव गोस्वामी यांना अटक केली, असा आरोप प्रवीण दरेकर यांनी केला.

अर्णव गोस्वामी हे केवळ निमित्तमात्र आहे. भाजप हा त्यांच्या बाजूने नव्हे तर प्रसारमाध्यमांच्या बाजूने उभा आहे. उद्या कोणत्याही पत्रकारावर अशाप्रकारे कारवाई झाली तर भाजप पक्ष इतक्याच ठामपणे उभा राहील. त्यामुळे अर्णव गोस्वामी यांच्या निमित्ताने भाजपवर पोटशूळ काढण्याचे काही कारण नाही. राज्य सरकारकडून सोयीचं राजकारण आणि कायदा सोयीने वापरला जातोय. मात्र, भाजप राज्य सरकारला लोकशाहीतीली स्वातंत्र्याचा गळा घोटून देणार नाही, असे प्रवीण दरेकर यांनी ठणकावून सांगितले.

‘भाजपचा पोपट पिंजऱ्यात अडकला’, शिवसेनेचा टोला!

अर्णव गोस्वामी यांच्या अटेकवर ‘भाजपचा पोपट पिंजऱ्यात अडकला’ अशी खोचक टीका परिवहन मंत्री आणि शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी केली आहे. तर अर्णव गोस्वामी आमचा पोपट नाही, आम्ही पोपट पाळत नाहीत. पोपट तेच पाळतात असा प्रत्यारोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. संबंधित बातम्या:

‘भाजपचा पोपट पिंजऱ्यात अडकला’, शिवसेनेचा टोला!, तर ‘पोपट आम्ही नाही, शिवसेनाच पाळते’, भाजपचं प्रत्युत्तर

अर्णव आमचा पोपट नाही, आम्ही पोपट वगैरे पाळत नाही, पोपट तेच पाळतात : चंद्रकांत पाटील

Arnab Goswami Arrest : हिसाब होगा, इंटरेस्ट लगाके, नितेश राणेंचा ठाकरे सरकारला अप्रत्यक्ष इशारा

(BJP Leader Pravin Darekar take a dig at Thackeray govt)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.