पूजा चव्हाण आत्महत्या ते संजय राठोडांचा राजीनामा, संपूर्ण प्रकरण 5 मुद्द्यात समजून घ्या

खरंतर सध्या आत्महत्येच्या अनेक घटना समोर येत असतात. पण हे प्रकरण वेगळं होतं. पूजा ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय होती. तिला टिकटॉक स्टार म्हणूनही ओळखले जात होते. त्यामुळे बंजारा समाजाच्या तरुणांमध्ये तिचे मोठे फॅन फॉलोइंग होती. | Sanjay Rathod Pooja Chavan suicide case

पूजा चव्हाण आत्महत्या ते संजय राठोडांचा राजीनामा, संपूर्ण प्रकरण 5 मुद्द्यात समजून घ्या
पूजा चव्हाण

मुंबई: पूजा चव्हाण या नावाने अख्या महाराष्ट्रातलं राजकारण ढवळून निघालंय. काही दिवसांपूर्वी पूजा (Pooja Chavan suicide case) बीडवरुन पुण्याला आली. इंग्लिश स्पिकिंगचे क्लासेस करण्यासाठी आलेली पूजा तिच्या भावांसोबत राहत होती. पुण्यात येऊन दोन आठवडे होत नाहीत तोवर असं काही घडलं आणि पुजाने स्वत: चं जीवन संपवलं. पूजा चव्हाण वानवडी येथील एका सोसायटीत राहत होती. तिच्यासोबत तिचा चुलत भाऊही राहत होता. 7 फेब्रुवारीला पूजा चव्हाणने आत्महत्या केली. (Timeline of Pooja Chavan suicide case)

खरंतर सध्या आत्महत्येच्या अनेक घटना समोर येत असतात. पण हे प्रकरण वेगळं होतं. पूजा ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय होती. तिला टिकटॉक स्टार म्हणूनही ओळखले जात होते. त्यामुळे बंजारा समाजाच्या तरुणांमध्ये तिचे मोठे फॅन फॉलोइंग होती.

ऑडिओ क्लिपनंतर एकच खळबळ

पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरण हे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लीप्समुळे खूपच गाजले. कथित मंत्री आणि त्याच्या कार्यकर्त्यामधील मोबाईल संभाषणाच्या या क्लीप होत्या. या क्लीपमधील कथित मंत्री संजय राठोड तर कार्यकर्ता अरुण राठोड असल्याचे सांगितले जाते. या 11 क्लीप समोर आल्यानंतर विरोधकांच्या हाती आयते कोलीत मिळाले होते. या क्लीप्सच्या आधारे चौकशी व्हावी यासाठी भाजप नेत्या चित्रा वाघ, चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडवणीस हे आक्रमक झाले होते.

पूजासाठी भाजप नेते रिंगणात

पूजा मुळची बीडची त्यामुळे या आत्महत्येनंतर पंकजा मुंडेंकडून तिच्या चौकशी मागणी झाली. पूजा चव्हाण ही माझ्या मतदारसंघातील तरुणी आहे. तिच्या मृत्यूची बातमी ऐकून मला धक्काच बसला. तिच्या मृत्यूची सखोल चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी पंकजा मुंडेंनी केली. तर ही आत्महत्या नसून हत्याच आहे असा दावा भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केलाय. अन् एक एक करत भाजप नेत्यांनी संजय राठोडांवर निशाणा साधयला सुरुवात केली.

तर आघाडीच्या नेत्यांची सावध प्रतिक्रिया

पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरण तापल्यानंतर महाविकासआघाडीतील प्रत्येक पक्षाचा नेता सावधपणे प्रतिक्रिया देत होता. या प्रकरणाची सखोल चौकशी झाली नसल्याने मंत्रीमहोदयांचं थेट नाव घेण्याची गरज नाही, असे राष्ट्रवादीच्या जयंत पाटील यांनी म्हटले. तर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी याबाबत काहीही बोलण्यास नकार दिला. आदित्य ठाकरे यांनीही या प्रकरणावर माहिती घेऊन बोलेन, असे सांगत काढता पाय घेतला होता. तर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाव मलिक यांनी या प्रकरणात भाजप खालच्या दर्जाचं राजकारण करत असल्याची टीका केली होती.

 राठोड नॉट रिचेबल

7 फेब्रुवारीनंतर अगदी दोन दिवसांतच महाराष्ट्रात या प्रकरणाची जोरदार चर्चा झाली यानंतर मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलंय. संजय राठोड यांनी या प्रकरणात आपली बाजू मांडण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या भेटीची वेळ मागितली होती. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता उद्धव ठाकरे यांनी संजय राठोड यांना अजूनपर्यंत आपला निर्णय कळवलेला नाही. तसेच अद्याप संजय राठोड आणि उद्धव ठाकरे यांच्यात फोनवरही सविस्तर चर्चा झाली नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. तर संजय राठोड हे प्रकरण समोर आल्यापासून नॉट रिचेबल आहेत.

वडील म्हणाले, चौकशी करा

पूजाच्या आत्महत्येमुळे तिच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तिचे कुटुंब मानसिक धक्क्यात असून कुटुंब काही बोलायला तयार नाही. परळी शहरात पूजाचं घर आहे, या घरात तिचे आई-वडील राहतात पूजाच्या मृत्यूने कुटुंबावर शोककळा पसरली आहे. माझ्या मुलीच्या आत्महत्येची चौकशी करा एवढीच मागणी पूजाच्या वडिलांनी केली.

या सगळ्यात पूजा चव्हाणचा अंत झाला. इंग्रजी शिकण्यासाठी बीडवरून पुण्याची वाट धरली, ती पुण्यात आली आणि… जे घडलं ते तुमच्या समोरच आहे.. तिच्या आत्महत्येपासून ते आतापर्यंत घडणाऱ्या या घटनेतून तिला न्याय मिळेल का? हा प्रश्न अनुत्तरीतच आहे.

अखेर संजय राठोडांनी मातोश्रीवर राजीनामा पाठवला

पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी मंगळवारी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, संजय राठोड यांनी मंगळवारी सकाळी मातोश्रीवर आपला राजीनामा पाठवला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा राजीनामा स्वीकारल्याचे सांगितले जात आहे. आता मुख्यमंत्री हा राजीनामा राज्यपालांकडे पाठवतील, असे समजते.

संबंधित बातम्या:

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण : अरुण राठोडनेच स्थानिकांपर्यंत ऑडिओ क्लिप पोहोचवल्या

मोठी बातमी: संजय राठोड राजीनामा देण्याची दाट शक्यता; शिवसेनेत दोन गट

‘संजय राठोडांना बंजारा समाजाचा पाठिंबा नाही, आपल्या गटाच्या काही लोकांकडून ते हवं ते वदवून घेतायत’

(Timeline of Pooja Chavan suicide case)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI