AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘संजय राठोडांना बंजारा समाजाचा पाठिंबा नाही, आपल्या गटाच्या काही लोकांकडून ते हवं ते वदवून घेतायत’

संजय राठोड यांच्यावर ज्या प्रकराचे आरोप झाले आहेत, तसे आरोप कोणीही उठसूट करत नाही. | Sanjay Rathod

'संजय राठोडांना बंजारा समाजाचा पाठिंबा नाही, आपल्या गटाच्या काही लोकांकडून ते हवं ते वदवून घेतायत'
संजय राठोड यांच्यावर ज्या प्रकराचे आरोप झाले आहेत, तसे आरोप कोणीही उठसूट करत नाही.
| Updated on: Feb 16, 2021 | 8:29 AM
Share

मुंबई: पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणानंतर बंजारा समाज संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्या पाठिशी उभे असल्याचे चित्र निर्माण केले जात आहे. संजय राठोड यांच्या गटातील काही लोक आपल्या स्वार्थापोटी त्यांचे समर्थन करत आहेत. मात्र, बंजारा समाजाला ही गोष्ट रुचलेली नाही, असे मत भाजपचे नेते गिरीश व्यास यांनी व्यक्त केले. (BJP leader Girish Vyas slams Sanjay Rathod)

पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणाच्या पार्श्वभूमीवर गिरीश व्यास यांनी मंगळवारी ‘टीव्ही 9 मराठी’शी संवाद साधला. यावेळी त्यांनी बंजारा समाज संजय राठोड यांच्या पाठिशी असल्याचे अमान्य केले. संजय राठोड यांच्यावर ज्या प्रकराचे आरोप झाले आहेत, तसे आरोप कोणीही उठसूट करत नाही. कोणताही समाज अशा व्यक्तींच्या पाठिशी उभा राहूच शकत नाही. केवळ काही स्वार्थी लोकांच्या माध्यमातून संपूर्ण बंजारा समाज राठोड यांच्या पाठिशी उभे असल्याचे चित्र निर्माण केले जात आहे, असे गिरीश व्यास यांनी सांगितले.

‘निर्दोष असाल तर राजीनामा देऊन चौकशीला सामोरे जा’

संजय राठोड हे निर्दोष असतील तर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन चौकशीला सामोरे जावे. आपल्या चारित्र्यावर कोणी अशाप्रकारे बोट ठेवले तर राजीनामा देणे, ही लोकप्रतिनिधीची जबाबदारी आहे. राजकारणात नैतिकता ही जिवंत राहायला पाहिजे. संजय राठोड यांना न्यायव्यवस्था आणि कायद्यावर विश्वास असेल त्यांनी चौकशीला सामोरे जावे, असे मत गिरीश व्यास यांनी व्यक्त केले.

मुंडेंच्या तीन बायका, तरी पवारांनी वाचवलं, आता राठोडांना ठाकरे वाचवतात, सोमय्या आक्रमक

राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या तीन बायका आहेत, तरी शरद पवारांनी त्यांना वाचवलं, आता संजय राठोडांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वाचवत आहेत. राठोडांना अटक करायला हवी होती, अशी आक्रमक मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली.

उद्धव ठाकरे सरकार चालवतात की माफियांची टोळी, हा प्रश्न आहे. वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा नाही, तर त्यांची हकालपट्टी व्हायला हवी होती. राठोडांना ताबडतोब अटक करायला हवी होती. धनंजय मुंडेंना तीन-तीन बायका, त्यांना शरद पवार वाचवतात. संजय राठोड यांनी 22 वर्षांच्या तरुणीच्या आयुष्याचा सत्यानाश केला आहे, त्यांना उद्धव ठाकरे वाचवतात, असा घणाघाती आरोप किरीट सोमय्या यांनी केला.

संबंधित बातम्या:

बहुजन समाजाच्या नेत्याला संपवण्याचे षडयंत्र; संजय राठोडांना गोवलं जातंय, बंजारा धर्मगुरुंची विनंती

(BJP leader Girish Vyas slams Sanjay Rathod)

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.