AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut On ED: आता रेल्वेत होणारा पाकिटमारीचा तपास तेवढा ईडी, सीबीआयकडून व्हायचा बाकी; राऊतांचा हल्लाबोल

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole) यांचे वकील सतीश उके (satish uke) यांना ईडीने ताब्यात घेतलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Sanjay Raut On ED: आता रेल्वेत होणारा पाकिटमारीचा तपास तेवढा ईडी, सीबीआयकडून व्हायचा बाकी; राऊतांचा हल्लाबोल
आता रेल्वेत होणारा पाकिटमारीचा तपास तेवढा ईडी, सीबीआयकडून व्हायचा बाकी; राऊतांचा हल्लाबोलImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Apr 01, 2022 | 11:08 AM
Share

मुंबई: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole) यांचे वकील सतीश उके (satish uke) यांना ईडीने ताब्यात घेतलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ईडीच्या या कारवाईवर शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी जोरदार हल्ला चढवला आहे. ज्या प्रकारे काश्मीरमध्ये अचानक अतिरेकी घुसतात. बॉम्ब हल्ले करतात आणि निघून जातात. त्याच प्रकारे या केंद्राच्या अतिरेकी कारवाया आहेत. तपास यंत्रणांना राज्यात घुसवलं जातं आणि ते अटक करून निघून जातात. जर यातून संघर्ष निर्माण झाला तर केंद्र आणि राज्य हा संघर्ष फार मोठ्या प्रमाणात होऊ शकेल. म्हणून ममता बॅनर्जी यांनी गैरभाजप शासित राज्यातील मुख्यमंत्र्यांना पत्रं पाठवलं आहे. त्यांचं पत्रं हे याच भूमिकेतून लिहिलं आहे. सर्वांनी एकत्र येण्याची त्यांची भूमिका त्याच गोष्टीसाठी आहे, असं सांगतानाच केंद्रीय तपास यंत्रणांची प्रतिमा धुळीस मिळाली आहे. आता रेल्वेत होणाऱ्या पाकिटमारींचा तपास सीबीआय आणि ईडीकडून करण्याचीच तेवढी गरज आहे, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना हा टोला लगावला. नागपूरचे वकील सतीश उके आणि त्यांच्या कुटुंबावर कारवाई करण्यात आली आहे. त्यांचे काही अपराध असतील. त्यांनी जमिनीचे व्यवहार चुकीच्या पद्धतीने केले असतील, त्यांनी जमीन लुटली असेल, त्यांनी जमीन बळकावली असेल, त्यांनी कुणाला धमकी दिली असेल तर महाराष्ट्राचे पोलीस तपास करतील. ईडीने खास येऊन तपास करावा आणि धाडी घालाव्यात असा हा गुन्हा नाहीये. कोणत्याही राज्याचे पोलीस अशा प्रकारच्या गुन्ह्यांचा तपास करतात. हा राज्यांतील पोलिसांचा सरळ सरळ अतिक्रमण आहे. मी म्हणतो ना उकेनी गुन्हा केला असेल तर भादंविनुसार त्यांच्यावर कारवाई व्हावी, असं संजय राऊत म्हणाले.

ईडी, सीबीआयने येण्याची गरज नाही

उके यांच्या कुटुंबाने लोकांना धमक्या दिल्या असतील असं म्हणतात. त्याच्या लोकांनी फडणवीस आणि गडकरींवर खोट्या तक्रारी दाखल केल्या असं ते म्हणतात. त्यासाठी महाराष्ट्राचे पोलीस तपास करतील. पश्चिम बंगाल पोलीस तपास करतील, झारखंडचे पोलीस अशा गुन्ह्यांचे तपास करतील. त्यासाठी ईडी आणि सीबीआयने येण्याची गरज नाहीये. पण त्यांना आणलं जात आहे दहशत निर्माण करण्यासाठी. सतीश उकेंनी बेकायदेशीर कृत्य केलं असेल पण ते ओढून ताणून. त्या मनी लॉन्ड्रिंग केसेस पीएमएलच्या केसेस जोडून आम्ही तुमच्यावर दहशत करून तुम्हाला तुरुंगात टाकू या प्रकारचं कृत्य निषेधार्य आहे. त्यांच्या विरोधकांनी महाराष्ट्र पोलीसात तक्रार केली पाहिजे. पण हा कालचा प्रकार धक्कादायक आहे, असंही ते म्हणाले.

संबंधित बातम्या:

ED हे भाजपचं घाबरविण्याचं तंत्र; Nana Patole यांचा सतीश उके अटक प्रकरणी घणाघात

ED Raid : फडणवीसांच्या विरोधात बोलल्यामुळेच ईडीची रेड, सुनेलाही धक्काबुक्की, सतीश उकेंच्या वडिलांचे गंभीर आरोप

Video Gadchiroli accident | गडचिरोलीत ट्रकची स्कूल व्हॅनला धडक, दहापैकी चार विद्यार्थी गंभीर जखमी

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार