AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पश्चिम बंगालच्या निकालावरून संजय राऊत यांचा हल्लाबोल, म्हणाले, केरळमध्येही महिला आहेत, मग…

भाजप केवळ निवडणुका जिंकण्यासाठी सत्तेचा आणि पैशाचा वापर करत असल्याचा गंभीर आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. त्यांनी पश्चिम बंगालच्या निकालावर प्रतिक्रिया देत भाजपला सुनावले आहे.

पश्चिम बंगालच्या निकालावरून संजय राऊत यांचा हल्लाबोल, म्हणाले, केरळमध्येही महिला आहेत, मग...
संजय राऊतImage Credit source: Tv9 Network
| Updated on: May 05, 2026 | 11:19 AM
Share

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी या निकालावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षावर कडाडून टीका केली आहे. भाजप केवळ निवडणुका जिंकण्यासाठी सत्तेचा आणि पैशाचा गैरवापर करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी मुंबईत माध्यमांशी बोलताना केला.

लोकशाही नव्हे, रशिया-पाकिस्तानसारख्या निवडणुका

संजय राऊत म्हणाले की, भाजप ३६५ दिवस केवळ निवडणुका कशा जिंकायच्या याच सराव करत असतो. देशाचे गृहमंत्री २०-२० दिवस बंगालमध्ये राहतात. येथे सत्तेचा आणि पैशाचा वारेमाप वापर केला जातो. खऱ्या अर्थाने याला लोकशाहीतील निवडणूक म्हणता येणार नाही. विरोधी पक्षाने निवडणुकाच लढवू नयेत, अशी भाजपची धारणा आहे. पुढे संजय राऊतांनी, ज्या प्रकारे पाकिस्तान आणि रशियामध्ये निवडणुका होतात, जिथे निकालाची घोषणा एक दिवस आधीच झालेली असते, तशाच प्रकारच्या निवडणुका आता भारतात होऊ लागल्या आहेत, असा टोला त्यांनी लगावला.

पंतप्रधानांनी भान ठेवून बोलावं

पंतप्रधानांनी महिला मतदारांच्या पाठिंब्याबाबत केलेल्या विधानावर राऊत यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, पंतप्रधानांनी बोलताना भान ठेवून बोलावे. महिला विधेयक कधीच मंजूर झाले आहे, पण त्याची अंमलबजावणी कुठे आहे? जर महिलांच्या पाठिंब्यामुळे तुम्ही जिंकत असाल, तर केरळमध्ये सर्वाधिक महिला साक्षर आहेत, तिथे तुम्हाला अपयश का आले? केरळमध्ये भाजपला का स्वीकारले गेले नाही? असा सवाल त्यांनी केला.

दिवा विझताना जास्त फडफडतो

भाजपच्या हिंदुत्वाचा दाखला देत राऊत यांनी भविष्यातील बदलाचे संकेत दिले. भाजप हा स्वतःला हिंदुत्ववादी पक्ष म्हणवतो, तर त्यांच्याच भाषेत सांगायचे झाले तर दिवा विझताना अधिक फडफडतो, तशीच स्थिती आता भाजपची झाली आहे. इंदिरा गांधींचाही एकेकाळी सर्व राज्यांत प्रभाव होता, पण त्यांचाही पराभव झाला. सत्तेचा माज उतरल्याशिवाय राहत नाही, असेही ते म्हणाले.

“मोदी-शहांचा विजय”

शेअर मार्केट आणि रुपयाच्या घसरणीवरूनही त्यांनी केंद्र सरकारला धारेवर धरले. राऊत यांच्या मते, भाजपची सत्ता आल्यावर रुपया आणि शेअर मार्केट सुद्धा कोसळले आहे. हा लोकशाहीचा विजय नसून मोदी-शहांचा विजय आहे. अनेक मतदारांची नावे मतदार यादीतून कापली गेली आहेत. हा निकाल म्हणजे देशात मोदींच्या पतनाची सुरुवात आहे.

Follow Us
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं