AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘…मग गोवाहटीचा इतिहास बदलायचा का?’ कुणाल कामरा प्रकरणात राऊतांचा पुन्हा खोचक टोला

स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराच्या व्हिडीओवरून नवा वाद निर्माण झाला आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांना खोचक टोला लगावला आहे.

'...मग गोवाहटीचा इतिहास बदलायचा का?' कुणाल कामरा प्रकरणात राऊतांचा पुन्हा खोचक टोला
Image Credit source: tv9 Marathi
| Updated on: Mar 24, 2025 | 5:20 PM
Share

स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराच्या व्हिडीओवरून नवा वाद निर्माण झाला आहे. त्याने उपमुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक टिका केली होती, त्यानंतर आता शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले आहेत. साठ ते सत्तर शिवसैनिकांकडून कुणाल कामराच्या सेटची तोडफोड करण्यात आली. या प्रकरणात आकरा शिवसैनिकांना पोलिसांनी अटक केलं, त्यानंतर त्यांना जामीन देखील मंजूर झाला आहे. दरम्यान यावर प्रतिक्रिया देताना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केला आहे. ते नाशिकमध्ये बोलत होते.

नेमकं काय म्हणाले संजय राऊत? 

अभिव्यक्ती स्वातंत्र्याची व्याख्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी समजून घ्यायला पाहिजे, त्यासाठी संविधान वाचायला पाहिजे, संविधान समजून घ्यायला पाहिजे. अभिव्यक्ती स्वतंत्र्यासाठी देवेंद्र फडणवीस यांचे आधीचे नेते तुरुंगात गेले होते. इंदिरा गांधी अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करत आहेत, यासाठी तुमचे नेते तुरुंगात गेले होते. गद्दाराला गद्दार नाही म्हणायचं तर काय म्हणायचं? बेईमानांना बेईमान म्हणायचं नाही का?  रिक्षावाल्यांना रिक्षावाला म्हणायचं नाही का? जे गद्दार गोवाहटीला गेले मग तो इतिहास बदलायचा का? एखाद्या कलाकाराने जर कलेच्या माध्यमातून हे मांडलं असेल तर चिंता वाटण्याचं काही कारण नाही, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला आहे.

दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल केलेल्या विडंबनात्मक टीकेनंतर आता कुणाल कामराच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधान परिषदेमध्ये मोठी घोषणा केली आहे. कुणाल कामराचा सीडीआर तपासला जाणार आहे. त्याचे सर्व कॉल देखील तपासले जाणार आहे. कुणाल कामरा कोणाच्या सांगण्यावरून बोलला, त्याचा बोलवता धनी कोण आहे? हे शोधून काढलं जाईल असं योगेश कदम यांनी म्हटलं आहे. शिवसैनिक देखील चांगलेच आक्रमक झाले आहेत. कुणाल कामराने माफी मागावी, अन्यथा त्याला रस्त्याने फिरू देणार नाही असा इशारा शिवसैनिकांकडून देण्यात आला आहे.

मात्र दुसरीकडे कुणाल कामराने लोकभावना मांडल्या, त्यामुळे आपण त्याच्या पाठिशी उभे आहोत असं वक्तव्य या प्रकरणावर बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

मोदी अन् EVM असल्यानं माज करताहेत, एकत्र या... राज ठाकरेंचा कानमंत्र
मोदी अन् EVM असल्यानं माज करताहेत, एकत्र या... राज ठाकरेंचा कानमंत्र.
ठाकरेंच्या शिवसेनेकडून 102 जणांना AB फॉर्मचे वाटप, कोणाला उमेदवारी?
ठाकरेंच्या शिवसेनेकडून 102 जणांना AB फॉर्मचे वाटप, कोणाला उमेदवारी?.
ठाकरे यांच्या शिवसेनेची 40 उमेदवारांची पहिली यादी जाहीर
ठाकरे यांच्या शिवसेनेची 40 उमेदवारांची पहिली यादी जाहीर.
BMC निवडणुकीत भाजपचे युवा चेहरे, 'या' नव्या चेहऱ्यांना पक्षाकडून संधी
BMC निवडणुकीत भाजपचे युवा चेहरे, 'या' नव्या चेहऱ्यांना पक्षाकडून संधी.
मुंबईत पालिकेसाठी भाजपची पहिली यादी जाहीर, एकूण 66 उमेदवारांची नावं
मुंबईत पालिकेसाठी भाजपची पहिली यादी जाहीर, एकूण 66 उमेदवारांची नावं.
राज्यात सर्वत्र गुंडांना राजकीय सुगीचे दिवस, सामनातून महायुतीवर टीका
राज्यात सर्वत्र गुंडांना राजकीय सुगीचे दिवस, सामनातून महायुतीवर टीका.
निष्ठावंत राहिले बाजूला, उपरेच लागले रडायला; पक्षांतराचा भावनिक खेळ
निष्ठावंत राहिले बाजूला, उपरेच लागले रडायला; पक्षांतराचा भावनिक खेळ.
पुणे मनपा निवडणुकीवरून महायुतीत खडाजंगी, धंगेकरांचा भाजपवर थेट इशारा
पुणे मनपा निवडणुकीवरून महायुतीत खडाजंगी, धंगेकरांचा भाजपवर थेट इशारा.
खासदार पुत्राची 24 तासात माघार, पक्षाच्या आदेशानंतर उमेदवारी अर्ज मागे
खासदार पुत्राची 24 तासात माघार, पक्षाच्या आदेशानंतर उमेदवारी अर्ज मागे.
निवडणुकीसाठी मुंबईतलं युती अन् आघाड्यांचे चित्र स्पष्ट! कोण कोणासोबत?
निवडणुकीसाठी मुंबईतलं युती अन् आघाड्यांचे चित्र स्पष्ट! कोण कोणासोबत?.