AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली 17 हजार कोटी वाटले, ही निवडणूकच रद्द करा; संजय राऊत यांची सर्वात मोठी मागणी

अपात्र मतदारांना पैसे वाटले आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाने ही निवडणूकच रद्द केली पाहिजे, अशी मोठी मागणी त्यांनी केली. तसेच विधानसभा निवडणूक पुन्हा घ्यावी, असं संजय राऊत म्हणाले.

लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली 17 हजार कोटी वाटले, ही निवडणूकच रद्द करा; संजय राऊत यांची सर्वात मोठी मागणी
SANJAY RAUTImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 02, 2026 | 9:00 PM
Share

Sanjay Raut On Ladki Bahin Yojana : राज्यात लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या योजनेतील लाभार्थी महिलांनी जर ई-केवायसी केलेली नसेल तर आता त्यांना भविष्यात कोणताही लाभ मिळणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. तसेच भविष्यात आम्ही महिलांसाठी ई-केवायसी करण्यासाठी नवी विंडो उपलब्ध करून देऊ शकतो, असेही सूचक विधान फडणवीस यांनी केलंय. दरम्यान, या योजनेचा लाभ घेणाऱ्या तब्बल 80 लाख महिलांचे नाव लाभार्थी यादीतून हटवण्यात आले आहे. याच कारणामुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. सत्ताधाऱ्यांनी निवडणूक जिंकण्यासाठी या योजनेचा उपयोग केला, असा आरोपी विरोधक करत आहेत. दरम्यान, आता याच योजनेवर बोलताना खासदार संजय राऊत हेदेखील आक्रमक झाले आहेत. त्यांनी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.

निवडणुका जिंकण्यासाठी त्यांनी १७ हजार कोटी वाटले

८० लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या आहेत. सगळ्या लाडक्या बहिणी, मीच त्यांचा भाऊ असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगतात. दुसऱ्या बाजुला फडणवीस म्हणतात मीच लाडका भाऊ आहे. अजित पवार अर्थमंत्री होते ते बोलले होते मीच या योजनेवर मी सही केली होती. निवडणुका जिंकण्यासाठी त्यांनी १७ हजार कोटी वाटले, असा गंभीर आरोप राऊत यांनी केला.

निवडणुका पुन्हा घ्या

तसेच, अपात्र मतदारांना पैसे वाटले आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाने ही निवडणूकच रद्द केली पाहिजे, अशी मोठी मागणी त्यांनी केली. तसेच विधानसभा निवडणूक पुन्हा घ्यावी, असंही ते म्हणाले.

एकही पात्र महिला वंचित राहू नये

दरम्या, खासदार सुप्रिया सुळे यांनीदेखील लाडकी बहीण योजनेवरून सरकारला धारेवर धरलं आहे. कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रातील प्रत्येक भगिनीला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ नियमितपणे मिळालाच पाहिजे, अशी आमची स्पष्ट भूमिका आहे. यासाठी विशिष्ट मुदतीत e-KYC करण्याची अट महिलांसाठी अन्यायकारक ठरू नये. राज्यातील एकही पात्र महिला केवळ तांत्रिक कारणांमुळे या योजनेपासून वंचित राहू नये, याची जबाबदारी सरकारने प्रामाणिकपणे पार पाडली पाहिजे, अशी मागणी सुळे यांनी केली आहे. त्यामुळे आता भविष्यात काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
Vishakha Raut | विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात
पोलिसांनी अडवलं तर बाजूला सारून पुढे जा; हल्ला केला तर...
Manoj Jarange | पोलिसांनी अडवलं तर बाजूला सारून पुढे जा; हल्ला केला तर... जरांगेंनी सांगितली आंदोलनाची रणनीती!
विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली मोठी बैठक; कुणबी प्रमाणपत्रासाठी...
Kunbi Certificate Update | विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली मोठी बैठक; कुणबी प्रमाणपत्रासाठी महत्त्वाचे निर्णय, जरांगेंच्या डेडलाइनपूर्वी सरकारची तयारी
मागण्या तात्काळ मान्य करा, नाहीतर...अंबादास दानवेंचा सरकारला थेट इशारा
Ambadas Danve | मागण्या तात्काळ मान्य करा, नाहीतर... जरांगे पाटलांच्या खालावलेल्या प्रकृतीवर अंबादास दानवेंचा सरकारला थेट इशारा