AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खरोखरच मराठी प्रेम असेल तर मंत्रि‍पदाचा राजीनामा द्या आणि.. संजय राऊत यांचे मोठे चॅलेंज..

मराठी सक्तीच्या मुद्द्यावर सरकारला टार्गेट करताना संजय राऊत दिसले. खरोखरच संबंधित मंत्र्यांना जर मराठी प्रेम असेल तर त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला हवा आणि मराठीसाठी लढावे, असे संजय राऊत यांनी म्हटले.

खरोखरच मराठी प्रेम असेल तर मंत्रि‍पदाचा राजीनामा द्या आणि.. संजय राऊत यांचे मोठे चॅलेंज..
Sanjay Raut
| Updated on: Apr 28, 2026 | 10:43 AM
Share

मराठी सक्तीच्या मुद्द्यात काल मंत्रालयात बैठक झाली. ज्यानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना 1 मे पासून मराठी सक्तीसाठी वेळ वाढून देण्यावर भाष्य केले. यावरूनच आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे. संजय राऊत यांनी जोरदार टीका केली. संजय राऊत यांनी म्हटले, आपण या शहरात येऊन रोजी रोटी कमवत आहात. रिक्षात बसणारे बहुसंख्य लोक मराठी असतात. आपल्याला मराठी येत नसल्याने गैरसमज निर्माण होतात. मारामाऱ्या होतात वाद होतात. त्यामुळे तुमच्या सोयीसाठी मराठी शिकायला पाहिजे. पण सरकारला आव्हान देणारी भाषा यात केली जाते. मराठीच्या मुद्द्यात. सरकारला आव्हान म्हणजे महाराष्ट्राला आव्हान… सरकार कोणाचेही असूद्या, असे आम्ही मानतो. काय झाले देवेंद्र फडणवीस यांनी मध्यल्या काळात जी घोषणा होती. महाराष्ट्रात सक्ती फक्त मराठीची. ही त्यांची गर्जना होती. त्या गर्जनेचे काय झाले.. त्या गर्जनेचे म्यांव का झालं?

पुढे संजय राऊत यांनी म्हटले की, कशाकरिता तुम्हाला मागे हटायचे आहे? शिकतील ना मराठी… तुम्ही कायदा करा.. 1 मे पासून नियम बनवा. नियम बनवल्यावर त्यांना 6 महिन्यांची मुदत द्या. ज्यांना येत नाही, त्यांनी शिकावे. मराठी अत्यंत सोपी, सरळ आणि रसाळ भाषा आहे, ती अवघड नाही. मराठीच्या प्रश्नावर जर सरकार मागे हटत असेल तर ज्या मंत्र्यांनी हा विषय सुरू केला त्यांनी मराठीच्या मुद्द्यावरून राजीनामा दिला पाहिजे.

जसा चिंताराम देशमुखांनी दिला होता केंद्रात. जर मराठीच्या मुद्द्यावर मराठी महाराष्ट्राची राजभाषा असताना मराठीच्या मुद्यावर सरकार मागे हटत असेल तर जर ते मंत्री स्वाभिमानी असतील तर आणि खरोखर मराठी प्रेमी असतील तर त्यांनी ताबडतोब राजीनामा दिला पाहिजे. दूर व्हायला पाहिजे आणि मराठीसाठी लढायला पाहिजे.

पुढे संजय राऊत यांनी म्हटले की, ते मंत्री असे करणार आहेत का? की ते देखील मुदतवाढीच्या गुंत्यामध्ये अडकून पडणार आहेत. केईएम रूग्णालय काय लोढाने बांधले नाही.. ते आरएसएसचा अजेंडा पुढे घेऊन जात आहेत. या मुद्द्यावरून संजय राऊत लोढा यांच्यावर जोरदार टीका करताना दिसले.

Follow Us
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन
जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी....
Manoj Jarange | जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी मिळणार की ब्रेक लागणार?
छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत
CM Devendra Fadnavis | छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका कोणाला टोला?
सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा सदावर्तेंवर पुन्हा घणाघात
Ambadas Danve vs Gunaratna Sadavarte | सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा गुणरत्न सदावर्तेंवर पुन्हा घणाघात; पुढे म्हणाले...
आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता...
Atul Bhatkhalkar On Aaditya | आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता संतापलाच