AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतीय युवक मंद झालाय… जय श्रीराम ! संजय राऊतांच्या त्या पोस्टवर संताप; भाजपने घेरलं

संजय राऊत यांनी भारतीय युवकांबद्दल केलेल्या विधानाने एकच मोठी खळबळ उडाली. त्यांनी थेट भारतीय युवकांना मंद म्हटले. आता भाजपाने संजय राऊत यांचा जोरदार समाचार घेतला. पोस्ट शेअर करत जोरदार निशाणा साधला आहे.

भारतीय युवक मंद झालाय... जय श्रीराम ! संजय राऊतांच्या त्या पोस्टवर संताप; भाजपने घेरलं
Sanjay Raut
| Updated on: May 15, 2026 | 1:23 PM
Share

शिवसेना नेते संजय राऊत यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टने मोठी खळबळ उडाली. संजय राऊत यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सध्या भारतीय युवक भरकटलेला आणि मंद झाल्याचे म्हटले. त्यांनी केलेल्या या पोस्टनंतर जोरदार टीका केली जात आहे. राऊतांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, सर्व भारतीयांसाठी.. जर तुम्हाला एखादे राष्ट्र नष्ट करायचे असेल, तर त्या देशातील युवकांची विचार करण्याची क्षमता नष्ट करा…व्लादिमीर लेनिन पुढे त्यांनी कंसामध्ये लिहिले की, सध्या भारतीय युवक असाच भरकटलेला आणि मंद झालाय, जय श्रीराम.. संजय राऊत यांच्या या सोशल मीडिया पोस्टनंतर भाजपाने जोरदार टीका केली. या पोस्टने नवीन वादाला तोंड फुटल्याचे बघायला मिळतंय. राऊतांनी थेट भारतीय युवकांना मंद म्हटले.

भारतीय युवकांना मंद संजय राऊत यांनी म्हटल्यानंतर भाजपाच्या नवनाथ बन यांनी संजय राऊत यांना जोरदार टोला लगावला. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत नवनाथ बन यांनी म्हटले की, भारतीय युवकांना मंद म्हणणाऱ्यांनी आधी वास्तव पाहावं. लेनिनचे कोट सांगणाऱ्यांनी भारतीय युवकांचे कर्तृत्वही पाहावे. युवक भरकटलेले नाहीत; नैराश्याच्या राजकारणाला त्यांनी नाकारलं आहे.

जनाब संजय राऊतजी, लेनिनचे कोट शोधताना तुम्ही इतके गुंग झालात की भारतीय युवक काय करत आहेत हेच विसरलात. ज्यांना तुम्ही मंद म्हणता तेच युवक आज स्टार्टअप उभारतायत, चंद्रावर मोहिमा पाठवतायत,देश चालवतात, सीमेवर उभे राहतात आणि मतदानातून तुमच्यासारख्या लोकांना वास्तवही दाखवतायत. खरं तर युवकांची विचार करण्याची क्षमता संपलेली नाही, फक्त दररोज सकाळी उठून नैराश्य विकणाऱ्या राजकारणाकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली आहे.

आणि हो…जय श्रीराम लिहिल्यामुळे युवक भरकटले असे म्हणत असाल, तर भारतात रामाचा जयघोष हजारो वर्षांपासून आहे. तुम्ही मात्र अद्याप भरकटलेले आहात कारण तुम्हाला अजूनही मॉस्कोच्या सावलीत भारत दिसतो. संजय राऊत यांच्या पोस्टनंतर राऊतांवर नवनाथ बन यांनी जोरदार टीका केली. राज्यातील नेतेही यावर प्रतिक्रिया देऊ शकतात.

Follow Us
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला वेगळं वळण; रोहित पवारांनी केले गंभीर
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला वेगळं वळण; रोहित पवारांनी केले गंभीर आरोप
कोरोना काळात भारताने स्वत:सोबत जगालाही वाचवलं -पंतप्रधान नरेंद्र मोदी
कोरोना काळात भारताने स्वत:सोबत जगालाही वाचवलं -पंतप्रधान नरेंद्र मोदी
महत्त्वाकांक्षेसाठी नाही, मिशनसाठी जगतो’; 25 वर्षांच्या सत्तेतील...
महत्त्वाकांक्षेसाठी नाही, मिशनसाठी जगतो’; 25 वर्षांच्या सत्तेतील प्रवासावर मोदींचं मनोगत
25 वर्षांचा राजकीय प्रवास; मोदींच्या कार्याचा विशेष गौरव
25 वर्षे जनसेवेची! PM मोदींच्या सत्तेतील प्रवासाचे नीतिन नबीन यांच्याकडून कौतुक
इंडिया आघाडीच्या मोर्चावर पोलिसी कारवाई; संजय राऊतांचा संताप,
इंडिया आघाडीच्या मोर्चावर पोलिसी कारवाई; संजय राऊतांचा संताप, म्हणाले...
पंतप्रधान मोदींनी सलग 25 वर्षे अखंड सेवेचा टप्पा गाठला
PM Modi : मुख्यमंत्री ते पंतप्रधान; नरेंद्र मोदींच्या राजकीय प्रवासाला 25 वर्षे पूर्ण
रेपो रेट वाढणार? आज RBI च्या निर्णयाकडे देशाचे लक्ष; EMI बाबत मोठी...
रेपो रेट वाढणार? आज RBI च्या निर्णयाकडे देशाचे लक्ष; EMI बाबत मोठी अपडेट समोर
मोदींच्या राजकीय प्रवासाला 25 वर्षे पूर्ण; शिंदेंकडून ‘सामना’ वगळता...
मोदींच्या राजकीय प्रवासाला 25 वर्षे पूर्ण; शिंदेंकडून ‘सामना’ वगळता सर्व वृत्तपत्रांमध्ये जाहिरात
मग ते येडे होतात अन्... इंदूरीकर महाराजांचं आणखी एक विधान चर्चेत...
मग ते येडे होतात अन्... इंदूरीकर महाराजांचं विधान तुफान चर्चेत, पुढाऱ्यांबद्दल थेटच सांगितलं
आयुक्त ज्ञानेश कुमारांबद्दल मोठी अपडेट समोर! छत्तीसगड दौरा रद्द, कारण.
आयुक्त ज्ञानेश कुमारांबद्दल मोठी अपडेट समोर! छत्तीसगड दौरा रद्द, कारण...