Sanjay Raut : कमिश्नरचा हवालदार केलाच ना? फडणवीस यांच्या हातात काहीच नाही, तेच शिक्षण मंत्री होणार; संजय राऊत यांचा पुनरुच्चार
नीट पेपरफुटी प्रकरणानंतर शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यावर संजय राऊत यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. गेल्या १० वर्षांत शिक्षण पद्धतीचे वाटोळे झाले, असा आरोप करत त्यांनी नव्या शिक्षणमंत्र्यांबद्दल भाष्य केले. फडणवीस हेच शिक्षणमंत्री होतील, असा दावा करत राऊतांनी त्यांना 'कमिशनरचा हवालदार' झाल्याचा टोला लगावला. फडणवीसांच्या हातात काहीच नसल्याचेही ते म्हणाले.

नीट पेपरफुटी प्रकरणात देशभरात विद्यार्थ्यांचे आंदोलन झाले, अखेर शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा दिला. परीक्षा यंत्रणांमध्ये अधिक सुधारणा करण्यासाठी सरकारने कठोर पाऊलच उचललं असून पेपरफुटी रोखण्यासाठी आणइ परीक्षा तांत्रिकृष्ट्या सक्षम करण्यासाठी उपाय सुचवण्याकरता नंदन निकेलणी यांच्या नेतृत्वाखाली उच्चस्तरीय टास्कफोर्स स्थापन करण्याची घोषणा पंतप्रधान मोदींनी रविवारी केली. यावर शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. मुळात, नेहरुंच्या काळापासूव शिक्षण पद्धती आधुनिकच आहे, त्या शिक्षण पद्धतीचं वाटोळ काम करण्याचं काम गेल्या 10 वर्षांत झालं.गेल्या दहा वर्षात आधुनिक शिक्षण पद्धती मारली अशा शब्दांत राऊतांनी टीका केली. तसेच नवे शिक्षणमंत्र्यांवरूनही राऊत स्पष्ट बोलले. संघाचे शिक्षण मंत्री करण्या ऐवजी निलेकणी यांना करा ना शिक्षणमंत्री . गेला बाजार फडणवीसांना शिक्षणमंत्री करा ना, त्यांनाच केलं जाईल, हे मी ठामपणे सांगतो, असं राऊत म्हणाले. मी मुंबईत आहे, महाराष्ट्राच आहे,कुठेही जाणार नाही असं फडणवीस शनिवारी म्हणाले होते. त्यावरूनही राऊतांनी सुनावलं. ‘कुठं राहणं हे फडणवीस हे त्यांच्या हातात नाही. उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणं त्यांच्या हातात नव्हतं. कमिश्नरचा हवालदार केला ना’ असं म्हणत राऊतांनी टोला लगावला.
काय म्हणाले संजय राऊत ?
देशातील सर्व कुलगुरू सरकारने नेमले नाही, संघाने नेमले. त्यातून शिक्षणातून किती झळाळी येणार हे मोदींनी सांगावं. मोदी सरकारच्या मंत्र्यांची मुलं, भाजपच्या नेत्यांची मुलं परदेशात शिकत आहे. तुम्हाला इथलं शिक्षण नाही. आमच्या मुलांना किंवा गरीबाच्या मुलांना शिक्षण घेण्याची संघाच्या दृष्टीकोणातून जी शिक्षण पद्धती केली आहे, ती तुमच्या मुलांनाही लागू करा. आमची मुलं गेल्या दहा वर्षात निर्माण झालेल्या बोगस शिक्षण पद्धतीचं शिक्षण घेत आहे. संघाने ही शिक्षण पद्धती तयार केली आहे, असं राऊतांनी नमूद केलं.
त्याबद्दल माफी मागितली पाहिजे
नेहरूंनी आधुनिक शिक्षण पद्धती आणली. गेल्या दहा वर्षात आधुनिक शिक्षण पद्धती मारली. तुम्ही पुराण आणि महाभारत काळातील शिक्षण पद्धती आणली त्याबद्दल तुम्ही माफी मागितली पाहिजे, अशी मागमई राऊतांनी केली. नेहरू, मनमोहना सिंगापर्यंत देशात तंत्रज्ञान आलं. आयआयटी, आयआयएम स्थापन केल्या. तुम्ही काय केलं. गोशाला? तुम्ही मुलांना पकोडे तळायला सांगता, तुम्ही शेण गोळा करायला सांगता. गोमूत्र गोळा करायला सांगतील. निलेकणी काय करणार आहेत? तोपर्यंत मोदी सत्तेवर राहतील का? मोदी सत्तेवर राहणार नाहीत. नरसिंहराव यांनी मनमोहन सिंग यांना अर्थमंत्री नेमलं. संघाचे शिक्षण मंत्री करण्या ऐवजी निलेकणी यांना करा ना शिक्षणमंत्री करा. गेला बाजार फडणवीसांना करा. मी ठामपणे सांगतो तेच शिक्षण मंत्री होईतल, असं म्हणत राऊतांनी फडणवीसांच्या नावाचा पुनरुच्चार केला.
फडणवस कितीही म्हणाले की मी मुंबईती, महाराष्टार्तच राहणारे, तरी कुठं राहणं हे फडणवीस यांच्या हातात नाही. उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणं त्यांच्या हातात नव्हतं . कमिश्नरचा हवालदार केला ना. मोदी आणि शहांनीच, त्यांचा हवालदार केला, तसे आदेश दिले ना ! हे फडणवीस यांच्या हातात नाही. भाजपमध्ये स्वाभिमान किंवा मेरीट आहे कुठे ? पण मेरिटवर या देशाचा शिक्षण मंत्री करायचा असेल तर फडणवीस यांचंच नाव मोदींच्या मनात आहे, आम्ही मनकवडे आहोत असं राऊत म्हणाले.