Sanjay Raut : गृहखातं अजगरासारखं निपचित… महिला डॉक्टरच्या मृत्यूवरून संजय राऊत बरसले

फलटणमधील डॉक्टरची आत्महत्या आणि मुंबईतील तरुणीच्या हत्येनंतर संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. गृहखात्याचे लक्ष विरोधी पक्षांवर असून कायदा-सुव्यवस्था आणि महिला सुरक्षा दुर्लक्षित आहे, असे ते म्हणाले. पोलीस यंत्रणेचा राजकीय वापर होत असल्याने राज्यात गुन्हेगारी वाढली असून महिला असुरक्षित असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली.

Sanjay Raut : गृहखातं अजगरासारखं निपचित... महिला डॉक्टरच्या मृत्यूवरून संजय राऊत बरसले
संजय राऊतांचे टीकास्त्र
Image Credit source: TV9 Marathi
| Updated on: Oct 25, 2025 | 10:47 AM

फलटणमध्ये महिला डॉक्टरची आत्महत्या, मुंबईत तरूणीवर वार करून झालेली हत्या या घटनांच्या पार्श्वभूमीवर कायदा-सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्व ऐरणीवर आला आहे. याच मुद्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकारवर, गृहखात्यावर टीकास्त्र सोडलं आहे. फडणवीसांचं गृहखात्याकडे लक्ष राहिलेलं नाही, राज्यात पोलिस आणि कायद्याचं भय नाही . सरकारची प्रशासनावर पकड नाही , गृहखातं हे अजगरासारखं निपचित पडलं आहे अशा शब्दात राऊत यांनी घणाघाती हल्ला चढवला.

फडणवीसांच गृहखात्याकडे लक्षच नाही

देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहखातं आल्यापासून त्यांचं लक्ष गृहाखतं, कायदा-सुव्यवस्था, महिला सुरक्षा याकडे नसून विरोधी पक्षाविरोधात काय कारवाई करता येईल आणि त्यासाठी पोलीस यंत्रणेचा कसा वापर याकडे आहे. त्यातच त्यांनी संपूर्ण पोलीस खातं अडकवून ठेवलं आहे. फलटणमध्ये एका सरकारी रुग्णायलयातील महिला डॉक्टरने आत्महत्या केली , तिला आत्महत्या करावी लागली, त्यासाठी प्रवृत्त करणारे गुन्हेगार हे पोलीस खात्यातील आहेत. दुसरी घटना मुंबईच्या रस्त्यावरची आहे, एका मुलीवर भररस्त्यात सपासप वार करून तिची हत्या करण्यात आली. नंतर त्या हल्लेखोरानेही आत्महत्या केली. पण मुंबईच्या रस्त्यांवर निर्घृण वार करून मुलीचा जीव घेतला. अशा घटना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सातत्याने घडताना दिसत आहेत.

गृहखातं हे अजगरासारखं निपचित पडलंय 

गृहखात्याचा कारभार अत्यंत असंवेदनशीलपणे सुरू आहे. गृहखातं फक्त विरोधकांवर पाळत ठेवणं,त्यांचे फोन टॅप करणं, पोलिसांना विरोधकांच्या मागे लावणं हेच सुरू आहे. पोलीस हे पक्षाचे चाकर प्रमाणे वागवले जात आह, राबवलं जात असेल तर फलटण आणि मुंबईसारख्या दुर्दैवी घटना सतत घडत राहतील.राज्याच्या पोलिस महासंचालक महिला आहेत, तरी महिला सुरक्षित नाही. आता त्या सर्व महान नेत्या कुठे गेल्यातर कोणाचं सरकार असतं तर महिलांवरील हल्ले, अत्याचार, खून याविरोधात या महिला आमदांरानी रस्त्यावर तांडव केलं असतं, मग आता त्या गप्प का आहेत ,  असा सवाल राऊत यांनी विचारला.

महाराष्ट्राचं चित्र अत्यंत गंभीर आहे. राज्यातल सरकार हे सरकारसारखं काम करत नाहीये. सरकारची प्रशासनावर पकड नाही , गृहखातं हे अजगरासारखं निपचित पडलं आहे अशा शब्दात राऊत यांनी घणाघाती टीका त्यांनी केली.