AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सरकार पोरांना घाबरलंय, 56 इंच वाल्यांची हातभर… संजय राऊत यांनी केंद्र सरकारला डिवचलं; ट्विटमध्ये ईडीचा उल्लेख

शिवसेना नेते,खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत सरकारवर टीका केली आहे. सरकार पोरांना घाबरलंय असं म्हणत राऊतांनी सरकारला डिवचलं आहे.

सरकार पोरांना घाबरलंय, 56 इंच वाल्यांची हातभर... संजय राऊत यांनी केंद्र सरकारला डिवचलं; ट्विटमध्ये ईडीचा उल्लेख
संजय राऊतांनी सरकारला डिवचलं
| Updated on: Jul 20, 2026 | 11:07 AM
Share

संसदेचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. आणि आजच्याच दिवशी कॉकरोच जनता पार्टीतर्फे संसदेवर शांतीपूर्ण मोर्चाही काढण्यात येणार आहे. नीट (NEET Exam) परीक्षेतील कथित गैरव्यवहारांच्या मुद्द्यावरून दिल्लीच्या जंतरमंतर (Jantar Mantar)येथे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक हे उपोषण करत होते, मात्र शनिवारी सकाळी त्यांना तेथून हटवून जबरदस्तीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र यामुळे सीजेपी समर्थक, कार्यतकर्त्यांवी हार न मानता आंदोलन कायम ठेवलं असून सीजपेची संस्थापक अभिजीत दिपके हे उपोषणास बसले. आज सीजेपीतर्फे विविध मागण्यांसाठी संसदेवर मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे, शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. मात्र या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झालं आहे.  सुरक्षा यंत्रणांमुळे संपूर्ण परिसराला छावणीचे स्वरूप मिळालं आहे. आज सकाळपासूनच दिल्लीतील जंतरमंतर परिसरात दिल्ली पोलीस तसेच रॅपिड ॲक्शन फोर्स आणि निमलष्करी दलांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून अतिशय गोंधळाचं वातावरण आहे.

याच पार्श्वभूमीवर आता सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका होत असून शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनीही सरकारवर टीकास्त्र चढवलं आहे. राऊत यांनी एक ट्विट केलं असून सरकारवर हल्लाबोल चढवला. सरकार पोरांना घाबरलेय! शुद्ध मराठीत सांगायचे तर ५६ इंच वाल्यांची हातभार फाटलीय! अशा शब्दांत राऊत कडाडले.

काय आहे संय राऊत यांचं ट्विट ?

सरकार पोरांना घाबरलेय! शुद्ध मराठीत सांगायचे तर ५६ इंच वाल्यांची हातभार फाटलीय! डरो मत! संसदेवरील मार्चला परवानगी नाकारली; शक्य असते तर जंतर मंतर वरील लाखो लोकांना ED लावली असती ; पण ते कठीण आहे! मोर्चा चा मार्ग ED च्या दिशेने वळवायला हवा! Ed,सुप्रीम कोर्ट या सारख्या संस्था मोदी शहांच्या गुलाम झाल्या आहेत!

असं राऊतांनी आपल्या ट्विटमध्ये लिहीलं आहे.

यापूर्वी सकाळी माध्यमांशी संवाद साधतानाही राऊतांनी याच मुद्यावरून सरकारवर टीका केली होती. हे सरकार मुलांना पूर्णपणे घाबरलं आहे. सरकारला वाटल ह्यांना किड्या, मुंग्यासारख चिरडणार. पण हे झुरळ फार खंबीर आहे अनेक ठिकाणी त्यांना समर्थन मिळतंय, असं राऊत म्हणाले होते. एवढंच नव्हे तर सर्व कोर्ट हे, प्रधानमंत्री आणि गुहमंत्री ह्यांचं गुलाम आहे. प्रत्येक पार्टीला भाजपाने खरेदी केलं आहे. 50-50 लाखाला खरेदी केलं आहे, असा घणाघाती आरोपही राऊत यांनी केलाय.

Follow Us
सुप्रिया सुळे 8 खासदारांसह मोदींच्या भेटीला; त्या 15 मिनिटांत काय झालं
tv9 Marathi Special Report | सुप्रिया सुळे 8 खासदारांसह मोदींच्या भेटीला; त्या 15 मिनिटांत काय झालं? संपूर्ण व्हिडिओ बघाच
शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा पेच सुटणार? सुप्रीम कोर्टात आज मोठी सुनावणी
मोठी बातमी! शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा पेच सुटणार? सुप्रीम कोर्टात आज मोठी सुनावणी; कपिल सिब्बलांच्या युक्तिवादानंतर पुढे काय होणार?
वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला,
Sachin ahir Worli | वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला, 'त्या' विधानाची सर्वत्र चर्चा
तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
Devendra Fadanvis | तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला, थेट मुख्यमंत्र्यावर आरोप, 16 एकर जागा...
वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात...
ST Bus | वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात, सुदैवाने जीवितहानी टळली
दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई! 15 जणांची तातडीने धरपकड, NCP...
दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई! 15 जणांची तातडीने धरपकड, NCP नेत्याच्या कुटुंबियाचाही समावेश
राष्ट्रवादीत पुन्हा खळबळ! तटकरेंच्या विरोधात थेट निवडणूक आयोगात तक्रार
Sunil Tatkare | राष्ट्रवादीत पुन्हा खळबळ! सुनील तटकरे यांच्या विरोधात थेट निवडणूक आयोगात तक्रार; नियुक्तीवरच सवाल
ठाकरे गटातील नगरसेविकेचं तळ्यात मळ्यात? राजुल पाटील शिंदे गटाच्या...
ठाकरे गटातील नगरसेविकेचं तळ्यात मळ्यात? राजुल पाटील शिंदे गटाच्या कार्यक्रमाला, ठाकरे गटाकडून थेट...
रेवती सुळेंच्या लग्नानंतर आता दिल्ली रिसेप्शनची चर्चा
रेवती सुळेंच्या लग्नानंतर आता दिल्ली रिसेप्शनची चर्चा; बड्या नेत्यांची उपस्थिती?