Sanjay Shirsat News : धनंजय मुंडे दोषी आढळले तर त्यांच्यावर कारवाई होईल; शिरसाट स्पष्टच बोलले
Sanjay Shirsat On Dhananjay Deshmukh Resign : संतोष देशमुख हत्या प्रकरणात समोर आलेल्या क्रूर फोटो आणि व्हिडिओनंतर धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आहे. त्यावर बोलताना शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी मुंडे दोषी आढळले तर त्यांच्यावर कारवाई होईल अशी प्रतिक्रिया दिली आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्येचा सर्वांनीच निषेध केला आहे. या प्रकरणात आता धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आहे. त्यांच नाव या प्रकरणात वारंवार घेतलं जात होतं. मिडियामध्ये देखील धनंजय मुंडे हेच आरोपी असल्याचं चित्र रंगवलं जात होतं. त्यांच्या राजीनाम्यानंतर आता यावर पडदा पडला आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी दिली आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, या संपूर्ण प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल आणि न्यायालयाकडून दिलेली शिक्षा त्यांना मिळेल. धनंजय मुंडे हे यात आका आहेत. त्यांचा या प्रकरणात हात आहे असं बोललं जात आहे. त्यावर आता चौकशी करून जे काही समोर येईल त्यात ते दोषी आढळले तर त्यांना देखील शिक्षा होईल, असंही संजय शिरसाट यांनी म्हंटलं आहे.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर

