AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वाल्मिक कराडसाठी महिला आक्रमक, आंदोलन सुरू असतानाच अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न, परळीत नेमकं काय घडलं?

वाल्मिक कराड याच्या समर्थनासाठी आता कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. परळीमध्ये जोरदार आंदोलन सुरू आहे. 

वाल्मिक कराडसाठी महिला आक्रमक, आंदोलन सुरू असतानाच अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न, परळीत नेमकं काय घडलं?
| Updated on: Jan 14, 2025 | 3:26 PM
Share

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. या घटनेला आता एक महिला उलटून गेला आहे. या घटनेनं राज्यात खळबळ उडाली असून, वातावरण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणात वाल्मिक कराड याच्यावर देखील आरोप झाले. या प्रकरणात आरोपींना शिक्षा व्हावी या मागणीसाठी राज्यभरात आंदोलन सुरू आहे, राज्यभरात आंदोलन सुरू असताना दुसरीकडे परळीत मात्र वेगळंच चित्र पहायला मिळत आहे. वाल्मिक कराड याच्या समर्थनासाठी आता कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. परळीमध्ये जोरदार आंदोलन सुरू आहे.

महिला आक्रमक 

वाल्मिक कराड याच्या समर्थनार्थ परळीमध्ये आंदोलन सुरू झालं आहे. कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. महिला चांगल्याच आक्रमक झाल्या असून अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आला आहे. दरम्यान वाल्मिक कराडच्या काही समर्थकांनी पाण्याच्या टाकीवर चढून देखील आंदोलन केलं आहे. याचदरम्यान एका आंदोलकाला भोवळ आल्याची देखील घटना घडली आहे.

वाल्मिक कराडवर मकोका 

दरम्यान संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात आतापर्यंत आठ आरोपींवर मकोका लावण्यात आला होता. या प्रकरणात वाल्मिक कराडवर देखील आरोप करण्यात आले होते. मात्र त्याच्यावर मकोका कयद्यांतर्गत कारवाई करण्यात आली नव्हती. वाल्मिक कराड याच्यावर देखील मकोका लावण्यात यावा अशी मागणी संतोष देशमुख यांच्या कुटुंबाकडून करण्यात आली होती. मस्साजोगचे ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झाले होते. सोमवारी मस्साजोगमध्ये पाण्याच्या टाकीवर चाढून आंदोलन करण्यात आलं. त्यानंतर आत्मदहनाचा इशारा देखील देण्यात आला होता. अखेर आज  वाल्मिक कराडवर मोकाका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

वाल्मिक कराडवर मोकोका अंतर्गंत कारवाई करण्यात आल्यानं आता परळीमधील त्याचे समर्थक चांगलेच आक्रमक झाले असून, परळी बंदची हाक देण्यात आली आहे. परळीमध्ये सर्व दुकानं बंद करण्यात आले आहेत, सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळत आहे. आंदोलक चांगलेच आक्रमक झाले आहेत. मकोका कारवाईनंतर आता या प्रकरणात वातावरण चांगलंच तापण्याची शक्यता आहे.

2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....