‘सारथी’साठी 23.66 कोटी मंजूर, 21.5 कोटी अन्यत्र खर्च, अनियमिततेच्या अहवालात धक्कादायक माहिती

सारथी संस्थेसाठी मार्च 2019 पर्यंत 23.66 कोटी रुपये देण्यात आले होते, मात्र तब्बल 21.50 कोटी रुपये अन्य कामांसाठीच खर्च करण्यात आल्याची धक्कादायक माहिती अहवालात आहे

‘सारथी’साठी 23.66 कोटी मंजूर, 21.5 कोटी अन्यत्र खर्च, अनियमिततेच्या अहवालात धक्कादायक माहिती

मुंबई : ‘सारथी’ संस्थेसाठी 23.66 कोटी रुपये देण्यात आले, मात्र केवळ 2 कोटी 75 लाख रुपयेच योग्य ठिकाणी खर्च झाले असून 21.50 कोटींची रक्कम अन्य कामांवर खर्च झाल्याची माहिती समोर आली आहे. सचिव किशोर निंबाळकर यांनी प्राथमिक चौकशी करुन शासनाकडे सोपवलेल्या अहवालाची प्रत ‘टीव्ही9 मराठी’च्या हाती (Sarathi Irrugelurities Report) आली आहे.

मराठा, कुणबी मराठा प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने ‘सारथी’ संस्था स्थापन करण्यात आली होती. निंबाळकरांच्या अहवालानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आर्थिक गैरव्यवहारांची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश बुधवारी दिले आहेत.

सारथी संस्थेसाठी मार्च 2019 पर्यंत 23.66 कोटी रुपये देण्यात आले होते, मात्र तब्बल 21.50 कोटी रुपये अन्य कामांसाठीच खर्च करण्यात आल्याची धक्कादायक माहिती अहवालात आहे. फक्त 2 कोटी 75 लाख रुपये उद्देशांसाठी खर्च करण्यात आले असून उर्वरित रक्कम अन्य प्रशाकीय कामांवर खर्च झाल्याचं सचिव किशोर राजे निंबाळकर यांच्या प्राथमित तपासात निष्पन्न झालं आहे.

सरकारला पूर्णपणे अंधारात ठेवून पैसा अन्यत्र वळवल्याचं समोर येत आहे. निंबाळकरांनी मंत्रिमंडळात माहिती देताच मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले.

दरम्यान, एमडी डी. आर. परिहार यांच्याकडून सारथी संस्थेत आर्थिक अनियमितता झाल्याचा आरोप केला जात आहे. परिहार हे सेवानिवृत्त शासकीय कर्मचारी असून त्यांना प्रशासकीय आणि वित्तीय अधिकारांचा वापर करता येत नसताना त्यांनी तो केल्याचा आरोप होत आहे. मंत्रिमंडळाच्या उपसमितीला वाटलं म्हणून डी. आर. परिहार यांची झालेली नियुक्तीही नियमबाह्य असल्याचं निष्पन्न झालं आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील त्यावेळी मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष होते.

खासदार संभाजीराजे भोसले यांनी सारथी संस्थेच्या स्वायत्ततेबाबत प्रश्न उपस्थित करत उपोषण केले होते. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी  संभाजीराजेंना कारवाईचं आश्वासन दिलं होतं.

सारथी संस्थेचा कार्यभार असणाऱ्या ओबीसी मंत्रालयाचे सचिव जे. पी. गुप्ता यांची उचलबांगडी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नव्या नेमणुकीपर्यंत सारथीचा अतिरिक्त भार पुनर्वसन मंत्रालयाचे सचिव किशोर निंबाळकर यांच्याकडे देण्यात आला आहे. Sarathi Irrugelurities Report

संबंधित बातम्या :

गुप्ताला अन्यत्र हलवलं नाही, तर पुढचा दौरा मुंबईचा : संभाजीराजेंचा इशारा

छत्रपती संभाजीराजेंचे उपोषण मागे

संभाजीराजेंचं उपोषण मागे, ‘सारथी’साठीचा राजेंचा लढा यशस्वी

Published On - 12:20 pm, Thu, 30 January 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI