AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Satara Ambeghar Landslide : चिमुकल्याला कडेवर घेऊन चितेवर ठेवलं, एकाच चितेवर 6 जणांना अग्नी, कृष्णा-कोयना गहिवरल्या

एकाच कुटुंबातील 6 जणांवर आज अंत्यसंस्कार करण्यात आले. ढिगाऱ्याखालून मृतदेह काढण्यात आल्यानंतर जागेवरच शवविच्छेदन करण्यात आलं. त्यानंतर एकाच चितेवर हे मृतदेह ठेवून अग्नी देण्यात आला.

Satara Ambeghar Landslide : चिमुकल्याला कडेवर घेऊन चितेवर ठेवलं, एकाच चितेवर 6 जणांना अग्नी,  कृष्णा-कोयना गहिवरल्या
Ambeghar Satara funeral
| Edited By: | Updated on: Jul 25, 2021 | 8:15 PM
Share

सातारा : सातारच्या पाटण तालुक्यातील आंबेघरमधील कोळेकर कुटुंबावर काळानं घाला घातला आणि अख्खं कुटुंब संपलं. दरड कोसळून आंबेघरमध्ये 14 ते 16 लोक ढिगाऱ्याखाली दबले होते. या ढिगाऱ्याखालून आतापर्यंत 9 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. मृतांमध्ये कोळेकर कुटुंबातील 6 जणांचा समावेश होता. या एकाच कुटुंबातील 6 जणांवर आज अंत्यसंस्कार करण्यात आले. ढिगाऱ्याखालून मृतदेह काढण्यात आल्यानंतर जागेवरच शवविच्छेदन करण्यात आलं. त्यानंतर एकाच चितेवर हे मृतदेह ठेवून अग्नी देण्यात आला. चिमुकल्याचा मृतदेह पाहून उपस्थित नागरिकांना अश्रू रोखणं कठीण झालं. (Satara Ambeghar Landslide Funeral for 6 members of Kolekar family at Ambeghar in Satara)

आंबेघर हा एक पाडा आहे. या गावात 8 घरं होती. यापैकी 4 घरांवर दरड कोसळून या घरातील 14 ते 16 लोक दबले आहेत. दुर्घटनेला 35 तास होऊन गेले मात्र मदत आणि बचावकार्य सुरु झालं नाही. आसपासच्या गावातील नागरिकांनी या गावात धाव घेऊन बचावकार्य सुरु केलं.

तीन भाऊ आणि त्यांचं कुटुंब दबलं

उत्तम कोळेकर यांचं कुटुंब चिखलात दबलं आहे. उत्तम कोळेकर आणि त्यांच्या तीन भावांचं घर मलब्याखाली दबलं. यामध्ये तीन भाऊ, त्यांच्या पत्नी आणि पाहुणे असा समावेश आहे. कोळेकर कुटुंबातील मुली पुणे आणि मुंबईला होत्या, त्या आज पाटणमधून टीव्ही 9 मराठीच्या प्रतिनिधींसोबत चालत आंबेघरमध्ये पोहोचल्या.

35 तासांनी दोन म्हशी

आंबेघरमधील एका घराच्या मागे गोटा होता. त्यावर दरड कोसळून दोन म्हशी दबल्या गेल्या. जवळपास 35 तासांनी या दोन म्हशी बाहेर काढल्या. या म्हशी गाळात रुतल्या होत्या. गोठ्याची उरलेली भिंत पाडून या म्हशींना आधी श्वासोश्वासाची व्यवस्था करण्यात आली. त्यानंतर गाळात रुतलेल्या म्हशी गावकऱ्यांनी कशाबशा हलवल्या. यंत्रणा नसल्याने गावकरी हाताने चिखल काढत आहेत.

नेमकं काय घडलं?

रायगडमधील तळीये गावात दरड कोसळल्याची घटना घडली असताना, तसाच प्रकार साताऱ्यातील पाटण तालुक्यात घडला. आंबेघर या गावात दरड कोसळून जवळपास 15 लोक ढिगाऱ्याखाली दबले. 23 जुलैला दुपारी हा प्रकार समोर आला. गुरुवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडल्याचं सांगण्यात येत आहे. आंबेघर येथील काही घरे या मातीच्या ढिगाऱ्याखाली गेली आहेत. या घटनेची माहिती समजताच काही ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले.

साताऱ्याच्या आंबेघरमध्ये 35 तासानंतरही मदत मिळालेली नव्हती. अनेक लोकं मदतीविना होते. घटनेला 35 तास उलटूनही त्यांच्यापर्यंत मदत मिळाली नव्हती. स्थानिक लोकांच्या मदतीने बचावकार्य सुरु होतं.. टीव्ही 9 ची टीम तिथे पोहोचली आहे. तिथे गेल्यानंतर प्रशासनाची टीम पोहोचली नसल्याचं समोर आलं. प्रशासन जरी पोहोचलं नसलं तरी स्थानिकांनी बचावकार्य सुरु ठेवलं आहे. लवकरात लवकर मदत पोहोचती आहे, असं उत्तर सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिलं.

संबंधित बातम्या :

Satara | देवरुखवाडीवर दरड कोसळून 5 घर मातीच्या ढिगाऱ्यात, 27 नागरिक सुखरुप बाहेर

Satara Landslide: साताऱ्यात आंबेघर गावात दरड कोसळली, 12 जणांचा मृत्यू

Funeral for 6 members of Kolekar family at Ambeghar in Satara, mourning for the entire village

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.