AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

साताऱ्यात कोरोनाचा विळखा वाढला, कराडमध्ये 5 नवे रुग्ण

कराडमध्ये आज पुन्हा 5 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत (Satara Corona Update). त्यामुळे कराड तालुक्यातील कोरोनाबाधितांचा आकडा आता 30 वर पोहोचला आहे.

साताऱ्यात कोरोनाचा विळखा वाढला, कराडमध्ये 5 नवे रुग्ण
| Updated on: Apr 28, 2020 | 4:52 PM
Share

सातारा : सातारा जिल्ह्यात कराड तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट ठरत आहे (Satara Corona Update). कराडमध्ये आज पुन्हा 5 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे कराड तालुक्यातील कोरोनाबाधितांचा आकडा आता 30 वर पोहोचला आहे. कराडमधील या नव्या रुग्णांमुळे सातारा जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 41 वर पोहोचला आहे, अशी माहिती सातारा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.आमोद गडीकर यांनी दिली (Satara Corona Update).

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत चालला आहे. मुंबई आणि पुणे शहरात कोरोनाने थैमान घातलं आहे. या दोन शहरांपाठोपाठ आता हा कोरोना राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येदेखील फोफावत चालला आहे. सातारा जिल्ह्यात कोरोनाचं संकंट वाढत चाललं आहे. सातारा जिल्ह्यातील कराडमध्ये रोज नवे कोरोनाबाधित आढळत असल्याची माहिती समोर येत आहे. कराडमध्ये 25 एप्रिल रोजी तब्बल 12 रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती.

दरम्यान, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासन प्रचंड मेहनत घेत आहे. कराडमध्ये ज्या भागांमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत तो परिसर खबरदारी म्हणून पूर्णपणे सील करण्यात आला आहे. कराड वगळता साताऱ्यातील इतर भागांमध्येही कोरानाचे काही रुग्ण आढळले आहेत. त्या भागांमध्येही संचारबंदी कडक करण्यात आली आहे. बाधितांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध प्रशासन घेत आहे आणि संशयितांना क्वारंटाईन केलं जात आहे.

राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढताच

राज्यात आज (28 एप्रिल) मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद या प्रमुख शहरांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. त्यासोबत वसई-विरार, पालघर, कल्याण डोंबिवली या ठिकाणीही नवीन कोरोना रुग्ण आढळले आहे.

मुंबईत कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. मुंबईतील झोपडपट्टी परिसरात कोरोनाने शिरकाव केला आहे. त्यामुळे मुंबईत कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसत आहे. आज मुंबईतील विक्रोळी टागोर नगर परिसरात 8 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. विक्रोळी परिसरातील वीटी बेकरी परिसरात हे रुग्ण सापडले आहेत. यामुळे 60 जणांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने शंभरी ओलांडली आहे. आजच्या दिवसात आणखी दहा रुग्णांना ‘कोरोना’ची लागण झाली आहे. विशेष म्हणजे या दहा जणांपैकी 9 रुग्ण एकट्या रुपीनगर भागातील आहेत. यामध्ये रुपीनगर भागातील सहा पुरुष आणि तीन महिला अशा नऊ रुग्णांचा समावेश आहे.

राज्यातील कोरोना रुग्णांची आकडेवारी :

Edit
जिल्हा रुग्ण बरे मृत्यू
मुंबई 5776 374 219
पुणे (शहर+ग्रामीण) 1027 125 77
पिंपरी चिंचवड मनपा 72 3
ठाणे (शहर+ग्रामीण) 335 36 6
नवी मुंबई मनपा 135 3
कल्याण डोंबिवली मनपा 145 3
उल्हासनगर मनपा 2
भिवंडी निजामपूर मनपा 14
मीरा भाईंदर मनपा 121 2
पालघर 25 1 1
वसई विरार मनपा 121 3
रायगड 18 5 1
पनवेल मनपा 43 1
नाशिक (शहर +ग्रामीण) 23 2
मालेगाव मनपा 123 12
अहमदनगर (शहर+ग्रामीण) 42 16 2
धुळे 65 3
जळगाव 18 1 4
नंदूरबार 11 1
सोलापूर 65 5
सातारा 29 3 2
कोल्हापूर 11 2
सांगली 27 27 1
सिंधुदुर्ग 1 1
रत्नागिरी 8 2 1
औरंगाबाद 52 14 6
जालना 2
हिंगोली 8 1
परभणी 1
लातूर 10 8 1
उस्मानाबाद 3 3
बीड 1
नांदेड 3
अकोला 29 1 1
अमरावती 22 7
यवतमाळ 62 8
बुलडाणा 21 8 1
वाशिम 1 1
नागपूर 127 12 1
भंडारा 1
गोंदिया 1 1
चंद्रपूर 2 1
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु) 25 2
एकूण 8590 1282 369

संबंधित बातम्या :

Maharashtra Corona Update | महाराष्ट्राला कोरोनाचा विळखा आणखी घट्ट, राज्यात कुठे किती नवे रुग्ण?

पिंपरी चिंचवडमध्ये शंभरीपार कोरोनाग्रस्त, रुपीनगरमध्ये 9 नवे रुग्ण, कोणत्या प्रभागात किती?

मालेगावात आणखी 36 कोरोना पॉझिटिव्ह सापडले, 9 वर्षाच्या मुलाचाही समावेश

नागपूरचे हॉटस्पॉट ठरलेल्या सतरंजीपुरात 450 जण क्वारंटाईन, कोरोनाबाधितांचा आकडा वाढताच

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.