Phaltan Doctor Death case : महिला डॉक्टरला त्रास देणाऱ्या PSI बदनेचे धक्कादाक कारनामे, अख्खी कुंडलीच आली समोर
सातारा जिल्ह्यातील फलटण येथे महिला डॉक्टरच्या आत्महत्येने खळबळ उडाली आहे. सुसाईड नोटमध्ये PSI गोपाल बदने आणि प्रशांत बनकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मुख्यमंत्र्यांनी बदनेला निलंबित करण्याचे आदेश दिले. प्रशांत बनकरला अटक झाली असून, फरार बदनेचा शोध सुरु आहे. बदनेच्या इतर महिलांवरील अत्याचाराचे प्रकारही उघड होत आहेत.

सातारा जिल्ह्यातील फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील काम करणाऱ्या महिला डॉक्टरने तिचं आयुष्य (Phaltan Doctor Death case ) संपवल्याने अख्खं राज्य हादरलं. एका हॉटेलच्या खोलीत आत्महत्या करण्यापूर्वी त्या डॉक्टरने हातावर एक सुसाईड नोट लिहीत मृत्यूसाठी जबाबादार असणाऱ्या दोघांची नावं लिहीली. यामुळे प्रचंड खळबळ माजली असून राज्यातील वातावरण प्रचंड तापलं आहे. डॉक्टर तरूणीने ज्यांच्यावर आरोप केलेत त्यापैकी एक म्हणजे फलटणमधील PSI गोपाल बदने ( PSI Gopal Badane ) तर दुसरा आरोपी हा प्रशांत बनकर , जो त्या तरूणीच्या घरमालकाचा मुलगा असल्याची माहिती समोर आली आहे.
तरूणीच्या आत्महत्येची बातमी उघड होताच, कालपासून दोन्ही आरोपी फरार झआले. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर पोलसांची अनेक पथकं शोधासाठी पाठवण्यात आली होती. अखेर आज पहाटे एक आरोपी प्रशांत बनकर याला पोलिसांनी पुण्यातील फार्महाऊसमधून अटक केली. सध्या तो फलटण पोलिस स्टेशनमधील गजाआड आहे. मात्र PSI बदने हा अजूनही फरार असून पोलिसांकडून त्याचा कसून शोध घेतला जात आहे. दरम्यान काल ही घटना उघडकीस आल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य महिला आयोगाने या आत्महत्येच्या गंभीर प्रकरणाची दखल घेतली. संबंधित पोलिस अधिकारी बदने यालाल तातडीने निलंबित करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी लगेच दिले.
आता याप्रकरणात नवनवे अपडेट्स, माहिती समोर येत असून महिला डॉक्टरने ज्या PSI बदनेवर अत्याचाराचे आरोप केलेत, त्याचे नवे कारनामे, त्याची वाईट, किळसवाणी कृत्यं ही देखील समोर येऊ लागली आहेत.
PSI बदनेचे धक्कादाक कारनामे, महिलांशी घाणेरडं वागण, कुंडली समोर
महिला डॉक्टरने आत्महत्या करण्यापूर्वी तिच्या हातावर एक सुसाईड नोट लिहीली होती. माझ्या मृत्यूसाठी PSI गोपाल बदने हा जबाबदार आहे, त्याने 4 वेळा माझ्यावर अत्याचार केला. तसेच, प्रशांत बनकर यानेही गेल्या चार महिन्यांपासून माझा शारीरिक आणि मानसिक छळ केला असं महिला डॉक्टरने तिच्या नोटमध्ये लिहीलं होतं. याच PSI गोपाल बदनेचे इतरही अनेक कारनामे आता उघड होऊ लागले आहेत.
त्याने फक्त मृत महिला डॉक्टरलाच नव्हे तर काही इतर महिलांनाही त्रास दिला, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. PSI बदने हा अनेकदा महिलांची छेड काढायचा, एवढंच नव्हे तर त्यांना डोळाही मारायचा असाही धक्कादायक खुलासा झाला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फलटण उपजिल्हा रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांनी बदाने याच्याविरोधात अनेक तक्रारी होत्या, तो महिलांची छेड काढायचा, त्यांना पाहून डोळाही मारायचा आणि तक्रार करायला गेलं तर उलट त्यांच्याकडूनच बदने पैसे मागायचा असा दावा काही महिलांनी केला आहे. एवढंच नव्हे तर एका महिलेने असाही आरोप केला की तिची भाची तक्रार करायला गेली असता, बदाने याने तिच्या नवऱ्यासमोरच तिला डोळा मारला आणि तिच्याकडे पैसे मागितले. पण तिने पैसे दिले नाहीत, ते पाहून त्याने तक्रारच नोंदवून घेतली नाही. महिलांचे हे दावे, आरोप आणि दिलेल्या साक्षी यामुळे याप्रकरणाला आणखीनच गंभीर वळण मिळालं असून बदने याच्या वागणुकीविषयी प्रश्न उपस्थित होत आहेत.
कोण आहे PSI बदने ?
महिला डॉक्टरने सुसाईड नोटमध्ये ज्या PSI बदने वर आरोप केले तो कोण आहे ते जाणून घेऊया.
– गोपाल बदने हा गेल्या 2 वर्षांपासून फलटण पोलीस ठाण्यात कार्यरत आहे.
– याआधी तो फलटण तालुक्यातील बरड पोलीस ठाण्यात कर्तव्यावर होता.
– बदने हा मूळचा बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील चांदापूर गावचा रहिवासी असल्याचे समजते.
– गोपाल बदने हा विवाहीत आहे.
Phaltan Doctor death case : महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट, प्रशांत बनकरला अखेर अटक
बदनेचं शेवटचं लोकेशन कुठे ?
डॉक्टरच्या आत्महत्येनंतर तिच्या सुसाईड नोटमध्ये नाव असलेला PSI बदने आणि प्रशांत बनकर हे दोघेही आरोपी फरार होते. पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करत शोधासाठी पथके पाठवली. गोपाल बदने याला तत्काळ निलंबित करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. बऱ्याच शोधानंतर पोलिसांनी आज पहाटे एक आरोपी प्रशांत बनकर याला अटक केली. तो पुण्यात त्याच्या मित्राच्या फार्महाऊसवर लपला होता, पोलिसांनी तेथे जाऊन त्याला बेड्या ठोकल्या . पण PSI बदने अजूनही फरार असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू असून त्याचे मोबाईलचे शेवटचे लोकेशन पंढरपूर परिसरात आढळले होते. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गोपाळ बदनेचं शेवटचं लोकेशन पंढरपूरजवळ सापडलं असून, त्यानंतर मोबाईल स्विच ऑफ करण्यात आला. त्यामुळे तो त्याच भागात नातेवाईक किंवा मित्रांकडे सुरक्षित जागी लपल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.पोलिसांकडून विविध ठिकाणी त्याचा शोध घेतला जात आहे.
