मला कुणाची चिठ्ठ्या देण्याची हिंमत आहे का? अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांना डिवचलं, साताऱ्यात अजित पवार यांची तूफान फटकेबाजी

सातारा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सारख्या चिठ्ठ्या घेऊन वाचून दाखवतात म्हणत अजित पवार यांनी मला कुणी चिठ्ठ्या द्यायचे धाडस करेल का ? असा सवाल उपस्थित अजित पवार यांनी तूफान फटकेबाजी केली आहे. साताऱ्या दौऱ्यावर असतांना अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्या शेती करण्यावरही भाष्य केलं आहे. त्यामध्ये एकनाथ शिंदे काही झालं की 2 ते 3 […]

मला कुणाची चिठ्ठ्या देण्याची हिंमत आहे का? अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांना डिवचलं, साताऱ्यात अजित पवार यांची तूफान फटकेबाजी
Image Credit source: TV9 Network
Follow us
| Updated on: May 08, 2023 | 3:57 PM

सातारा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सारख्या चिठ्ठ्या घेऊन वाचून दाखवतात म्हणत अजित पवार यांनी मला कुणी चिठ्ठ्या द्यायचे धाडस करेल का ? असा सवाल उपस्थित अजित पवार यांनी तूफान फटकेबाजी केली आहे. साताऱ्या दौऱ्यावर असतांना अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्या शेती करण्यावरही भाष्य केलं आहे. त्यामध्ये एकनाथ शिंदे काही झालं की 2 ते 3 दिवस इथं येऊन राहतात. आणि सारखं स्ट्रॉबेरीकडे पाहता, स्ट्रॉबेरीकडे बघून कुठं शेती होती का ? असं म्हणत विरोधी पक्षेनेते अजित पवार यांनी तूफान फटकेबाजी केली आहे. शेतकऱ्यांना मदत अद्यापही न मिळाल्याने अजित पवार यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. एकूणच साताऱ्यातून अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधत टोलेबाजी केली आहे.

अजित पवार म्हणाले, एकनाथ शिंदे यांना लोकं चिठ्ठ्या देतात आणि ते वाचतात. पॉइंट काढून दिले, छोटी चिठ्ठी दिली ते ठीक आहे. पण सारखं वाचून दाखवतात. मला कुणी चिठ्ठ्या द्यायचे धाडस करणार नाही म्हणत अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला.

तर दुसरीकडे एकनाथ शिंदे हे 2 ते 3 दिवस साताऱ्यात येऊन राहतात. त्यामध्ये येऊन झाडं बघतात. कधी स्ट्रॉबेरी बघतात. हे बघून कुठं शेती होती का. आणि दुसरीकडे 65 फाइल काढल्या म्हणे. अहो तीन-तीन हजार फाइल्स पडून आहेत. याच्यामध्ये राज्याचे नुकसान होत आहे.

हे सुद्धा वाचा

मला वाटलं होतं साताऱ्याचा माणूस आहे. ठाण्यात जाऊन राहतात. पण काही खरं नाही. राज्याचे नुकसान होत आहे. बेरोजगारांना नोकऱ्या मिळत नाही. दीड दोन लाख लोकांना नोकऱ्या मिळणारे प्रकल्प बाहेर गेले, एक प्रकल्प आणायची धमक यांच्यात नाही असा आरोपही अजित पवार यांनी गेला.

काही दिवसांपूर्वी एक गाजर दाखवलं. म्हणे 75 हजार शासकीय नोकऱ्या आणणार. मुला मुलींनी नोकरीला लावणार आहे. त्याचे काय झाले. कुणी मंत्रालयात बसायला तयार नाही. एप्रिल मे मध्ये पाऊस पडलेला कधी बघितलाय का? असाही सवाल उपस्थित केला आहे.

अवकाळी पाऊस आला, काही ठिकाणी नद्यांना पुर आला, फळबाग आणि बारमाही पीकाचे नुकसान झाले आहे. पंचनामा करणार म्हणताय अहो कधी करणार हे तरी सांगा. सगळं करतोय म्हणताय काही करत ढिम्म सरकार आहे. आमदार निधी आम्ही वाढवला.

महाराष्ट्र सरकारचा आर्थिक पाहणी अहवाल आला. त्यामध्ये महाराष्ट्र सरकारची पिछे हाट होत आहे. जनतेच्या पैशातून सरकारची जाहिरात केली जात आहे. जाहिरातीवर करोडो रुपयांची जाहिरात केली जात आहे. लोकांना बघायची नाही तरी म्हणताय बघायलाच पाहिजे. यशवंतराव चव्हाण साहेबांनी जी शिस्त लावली जात होती ती मोडून काढत आहे.

रयत शिक्षण संस्थेत आमची मक्तेदारी नाही पण तुमच्याकडे जी संस्था आहे त्याकडे बघा. इथला मंत्री फक्त भाषणात शिव्या दिल्या म्हणजे झाले आहे. आमचे सरकार असतं तर आमदारांना 7 कोटी रुपयांचा निधी दिला असता. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रसिद्धीचा मोह असल्याची टीकाही अजित पवार यांनी केली आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.