सातारा डॉक्टर महिला प्रकरणाची धग थेट दिल्लीत, सर्वात मोठी माहिती समोर!
सातारा महिला डॉक्टर प्रकरण आता थेट दिल्लीत पोहोचले आहे. या प्रकरणातील दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांची चौकशी केली जात आहे.

साताऱ्यातील फलटणमधील डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरण आता वेगळ्या वळणावर पोहोचले आहे. या प्रकरणातील दोन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांची चौकशी केली जात आहे. देशभरातून डॉक्टर महिलेला न्याय मिळवून देण्याची मागणी केली जात आहे. आता हे प्रकरण थेट दिल्लीमध्ये पोहोचले आहे. दिल्लीत नेमकं काय घडत आहे? चला जाणून घेऊया…
नेमकं काय घडतंय?
सातारा जिल्ह्यातील फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात काम करणाऱ्या महिला डॉक्टरला न्याय मिळवून देण्यासाठी दिल्लीतील युवा काँग्रेस एकत्र जमले आहेत. त्यांनी युवा काँग्रेस ऑफिसच्या परिसरात आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे. हे आंदोलन आता एका वेगळ्या वळणावर पोहोचले आहेत. पोलीस आंदोलनस्थळी पोहोचले असून आंदोलन शांत करण्याचा प्रयत्न करत आहेत.
वाचा: अनाया बांगरचा मोठा निर्णय, शस्त्रक्रियेच्या 3 महिन्यांनंतर पुन्हा जुन्या गोष्टींकडे वळली
आंदोलक आक्रमक
दरम्यान, युवा काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुतळा देखील जाळण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, पोलिसांनी त्यांना रोखले आहे. आंदोलकांनी आरोप केला आहे की या प्रकरणात कोणतीही कारवाई होताना दिसत नाही आहे. महाराष्ट्र सरकार कारवाई करण्यास घाबरत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. तसेच आंदोलक पोलिसांनी लावलेल्या बॅरिगेटवर चढून घोषणा बाजी करताना दिसत आहेत. न्याय द्या, न्याय द्या… डॉक्टर संपदा मुंडे यांना न्याय द्या अशी घोषणाबाजी करताना दिसत आहेत. आंदोलकांनी महाराष्ट्र सरकारचा निषेद केला जात आहे.
काय आहे प्रकरण?
सातारा जिल्ह्यातील फलटणमध्ये एका महिला डॉक्टरने आत्महत्या केली. या महिला डॉक्टरने हॉटेलच्या खोलीमध्ये स्वत:ला संपवले. समोर आलेल्या माहितीनुसार, प्रशांत बनकर यांच्या घरातील वरच्या मजल्यावर डॉक्टर महिला राहत होती. पण अचानक तिच्या घराला कुलूप लावण्यात आले. तसेच तरुणी आणि प्रशांत बनकर यांच्यमध्ये देखील वाद झाला होता. प्रशांत बनकरला राग अनावर झाला. त्याने या वादानंतर तू आमच्या इथे राहायचं नाही आणि यायचं नाही असे सांगितले जात आहे. अशा परिस्थितीमध्ये कुठे जायचं म्हणून तरुणी डॉक्टरने लॉजवर राहण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर तिने हे टोकाचे पाऊल उचलले. सुसाईट नोटमध्ये तरुणीने PSI गोपाल बदने आणि प्रशांत बनकर यांचा उल्लेख केला होता. दोघांनाही पोलिसांनी अटक केली असून तपास सुरु आहे.
