AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Supriya Sule यांचा भर कार्यक्रमात गौप्यस्फोट, अजित पवार गटाचा वकील सदानंद सुळे यांचा वर्गमित्र?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटाची आता केंद्रीय निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टात कायदेशीर लढाई सुरु आहे. या लढाईदरम्यान सुप्रिया सुळे यांनी साताऱ्यात जाहीर कार्यक्रमात एक गौप्यस्फोट केलाय. या गौप्यस्फोटावर त्यांनी आपली सविस्तर भूमिका देखील मांडलीय.

Supriya Sule यांचा भर कार्यक्रमात गौप्यस्फोट, अजित पवार गटाचा वकील सदानंद सुळे यांचा वर्गमित्र?
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Oct 19, 2023 | 10:38 PM
Share

सातारा | 19 ऑक्टोबर 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांची साताऱ्यात आज जाहीर सभा झाली. यावेळी सुप्रिया सुळे यांनी जोरदार फटकेबाजी केली. त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटावर टीका केली. यासोबतच त्यांनी भाजपवरही निशाणा साधला. विशेष म्हणजे त्यांनी यावेळी जाहीर कार्यक्रमात मिश्किल पद्धतीत एक गौप्यस्फोट केला. अजित पवार यांच्या गटाची बाजू सुप्रीम कोर्टात खंबीरपणे मांडणारा एक वकील हे सुप्रिया सुळे यांचे पती सदानंद सुळे यांचे वर्गमित्र आहेत, असा गौप्यस्फोट सुप्रिया सुळे यांनी केला. यावेळी त्यांनी मिश्किल पद्धतीने अजित पवार गटावर निशाणा साधला.

“मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किंवा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला जे सोडून गेले त्यांच्याविरोधात काहीही बोलणार नाही. याचं कारण असंय की, ते जे कृती करत आहेत ती त्यांची कृती नाहीच. ही जी अदृश्य, दिल्लीची महाशक्ती आहे, ती महाशक्ती आणि अदृश्य शक्ती ही महाराष्ट्राच्या विरोधात कटकारस्थान रचत आहे. अदृश्य शक्तीने शिवसेनेची काय अवस्था केली ते आपल्या सर्वांना माहिती आहे. माझ्यासाठी एकच शिवसेना आहे आणि त्याचे अध्यक्ष उद्धव ठाकरेच आहेत. तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं आहे”, असं सु्प्रिया सुळे म्हणाल्या.

‘त्यांना माझ्या नवऱ्याचा वर्गमित्रच वकील म्हणून मिळाला’

“राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक गट वेगळा झालाय. आता लढाई सुप्रीम कोर्टात सुरु आहे. खूप मजा येत आहे. मी कधी सुप्रीम कोर्टात गेली नव्हती. या निमित्ताने जायला मिळालं, नवीन काहीतरी शिकायला मिळालं. गंमतीची भाग म्हणजे समोरचा त्यांच्या बाजूचा वकील हा सदानंद सुळे यांचा वर्गमित्र निघाला. तुम्हाला एवढ्या मोठ्या देशात दुसरा वकील मिळाला नाही? एवढ्या मोठ्या देशात वकील मिळू नये? तो माझ्या नवऱ्याचा वर्गमित्रच मिळाला. पण आपलं काही सेटिंगबेटिंग नाही. मी त्याला म्हटलं बाबा रे तू तुझं क्लाईंटचं काम कर. कोर्टमध्ये आपण ताकदीने लढू. संध्याकाळी तू आणि सदानंद काय टाईमपास करायचा तो करा”, असं सुप्रिया सुळे मिश्किलपणे म्हणाल्या.

“निवडणूक आयोगाच्या सुनावणीला शरद पवार स्वत: गेले होते. मला गंमत अशी वाटली, ज्यांना पक्ष हवाय त्यांचं कोणीच नव्हतं. ज्यांनी पक्षाला जन्म दिला तो तिथे मात्र पाच तास बसून होता. लक्षात ठेवा मी एक आई आहे. दहा मुलं रडली तरी आपल्या मुलाचा सूर आईला माहिती असतो. तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शरद पवारांचं नातं आहे. कुणीही काहीही काढू द्या किंवा अदृश्य शक्ती येऊद्या. त्याचा मायबाप एकच आहे, त्याचं नाव शरद पवार आहे”, असं सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या.

Follow Us
अखेर दिशा सालियन मृत्यू प्रकरणात CBI FIR दाखल; संशयितांच्या यादीत...
अखेर दिशा सालियन मृत्यू प्रकरणात CBI FIR दाखल; संशयितांच्या यादीत मोठी नावे
परत येईन की नाही, माहीत नाही; मी... मनोज जरांगे अचानक असं का म्हणाले?
परत येईन की नाही, माहीत नाही; मी... मनोज जरांगे अचानक असं का म्हणाले?
Ganeshotsav 2026 : नाशिकमध्ये 27 हजार रुपये किलोचा गोल्डन मोदक चर्चेत,
Ganeshotsav 2026 : नाशिकमध्ये 27 हजार रुपये किलोचा गोल्डन मोदक चर्चेत, खास काय?
मंत्री पंकजा मुंडे यांच्या घरी बाप्पाचे आगमन, छगन भुजबळांनी घेतले अंजी
Ganpati Bappa Morya | मंत्री पंकजा मुंडे यांच्या घरी बाप्पाचे आगमन, छगन भुजबळांनी घेतले अंजीरवाडी मंडळात दर्शन
गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील ...
Sanjay Raut | गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील हुकूमशाही...
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली..
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली बाप्पांची मूर्ती
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव...
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव शंकर थीम ठरतेय आकर्षण
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश,
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश, ट्वीट करत दिल्या शुभेच्छा
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित