AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Neelam Gorhe | ललित पाटील प्रकरणावरुन नीलम गोऱ्हे यांचा थेट उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा

ललित पाटील प्रकरणावरुन नीलम गोऱ्हे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. त्यांनी संजय राऊत यांच्यावरही टीका केलीय. नीलम गोऱ्हे अनेक वर्ष शिवसेनेत काम करत आहेत. त्यामुळे त्यांच्या या टीकेला जास्त गंभीरतेने पाहिलं जात आहे.

Neelam Gorhe | ललित पाटील प्रकरणावरुन नीलम गोऱ्हे यांचा थेट उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा
| Updated on: Oct 19, 2023 | 9:24 PM
Share

नाशिक | 19 ऑक्टोबर 2023 : ललित पाटील ड्रग्स प्रकरणी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह खासदार संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. “ललित पाटील याने शिवसेनेचा राजीनामा दिलेला नाही. आपल्या पक्षातील लोकं काय धंदा करतात हे बघणं उद्धव ठाकरेंसोबतच सर्वज्ञानी संजय राऊत यांचीही जबाबदारी आहे”, असा टोला नीलम गोऱ्हे यांनी लगावला आहे. ड्रग्ज प्रकरणाचा तपास SIT किंवा CID कडे द्यावा, अशी सूचना नीलम गोऱ्हे यांनी सरकारला दिली. या तपासात आरोग्य, वैद्यकीय अभ्यास असलेल्या IPS अधिकाऱ्यांचा समावेश करण्याचीही मागणी नीलम गोऱ्हे यांनी केली.

“आपल्या पक्षात कशी माणसे येतात? ते काय धंदा करतायत? ही उद्धव ठाकरेंची जशी जबाबदारी होती तशी अत्यंत न्यायी, अभ्यासू झुंजार नेते संपर्क प्रमुख संजय राऊत यांची होती. त्यांनी या माणसाला तपासले का नाही? निगराणी करण्याची जबाबदारी त्यांची नाही का? आपल्या पक्षात दिव्याखाली अंधार. 2016 साली पक्षात गेला होता तो बाहेर कधी गेला? दुसऱ्या पक्षात तो काम करायला लागला का? त्याने पक्ष सोडला नाही, राजीनामा दिलेला नाही. हे राजकारण योग्य नाही”, अशी टीका नीलम गोऱ्हे यांनी केली.

“ड्रग्स प्रकरणात पोलिसांसोबत अन्न आणि औषध प्रशासन विभागही तेवढेच जबाबदार आहेत. एवढा बेकायदेशीर ड्रग्स कारखाना सुरू असतांना FDA ने दुर्लक्ष का केले? अन्न आणि औषध मंत्र्यांनी याची दखल घ्यावी”, असं नीलम गोऱ्हे म्हणाल्या.

नीलम गोऱ्हे काय-काय म्हणाल्या?

“ड्रग्सचे पुणे, नाशिक, मुंबईत धागेदोरे आहेत. अशाप्रकारच्या धंद्यांना कोणाचा आश्रय? यांना प्लॅटफॉर्म कशामुळे मिळतो? 2016 साली पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली प्रवेश केला. फोटोत उद्धव ठाकरे, दादा भुसे दिसतायत. यासंदर्भात तांत्रिक आर्थिक पुरावे पोलिसांनी तपासावे, भुसे यांनी माझा संबंध नाही सांगितलंय. ललितचे आर्थिक संबंध कोणा कोणासोबत होते? फोनवरून वगैरे कोणाशी संभाषण झाले? याची चौकशी व्हायला हवी”, असं नीलम गोऱ्हे म्हणाल्या.

“केंद्राने आरोग्य विभागामार्फत एक योजना केली होती की कोणता पेशंट कधी आला आणि कधी डिस्चार्ज झाला त्याची नोंद वेबसाईटमध्ये करायची. पण ससूनमध्ये ती यंत्रणा बंद होती. बाकी रूग्णालयातही सहा महिन्यांपासून ती बंद होती. ती सुरू करायला हवी. ड्रग्ज कारखाना बेकायदेशीर चालतो. त्यासाठी लागणाऱ्या औषधी पदार्थ लागतात त्यांना मुबलक परवानगी कशी देण्यात येते? एक दोन प्रक्रिया करून त्याचे अमली पदार्थात रूपांतरण करण्यात येते”, असं मत नीलम गोऱ्हे यांनी मांडलं.

“अमोनियम नायट्रेटचा मागे विषय झाला होता तेव्हा त्याचे नियमन करा, असे मी मागेच सांगितले होते. एवढा बेकायदेशीर कारखाना सुरू असतांना FDA ने कधी तिथे पाहणी केली होती का? तपासणी केली होती का? लायसन्स काय, निर्मिती काय, त्यांनी दुर्लक्ष केले का? पोलिसांसोबत तेही तेवढेच जबाबदार आहेत. अन्न आणि औषध पुरवठा मंत्रीही याची दखल घेतील असे वाटते”, असं नीलम गोऱ्हे म्हणाल्या.

“या तपासात आरोग्य, वैद्यकीय तज्ज्ञांच्या सहभाग आवश्यक आहे. महाराष्ट्रात काही IPS अधिकारी आहेत, जे वैद्यकीय पदवीधर आहेत. वेळ पडल्यास हा तपास SIT किंवा CID कडे द्यावा, अशा सरकारला सूचना आहेत. सर्व पक्षांना विनंती करते की, याबाबत पुरावे असतील तर पोलीस महासंचालक, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा त्यांच्यावर विश्वास नसेल तर उच्च न्यायालयात द्यावे”, अशी सूचना नीलम गोऱ्हे यांनी दिली.

साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.