AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MNS | मनसेची मोठी राजकीय खेळी, लोकसभा निवडणुकीआधी बारामतीत हालचाली

महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय होईल, याचा काहीच भरोसा नाही. कोणता राजकीय नेता किंवा पक्ष कोणासोबत जावून हातमिळवणी करेल, हे आपल्या हातात नाही. असं असताना बारामतीत आज महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. मनसेने बारामतीत नवी सुरुवात केलीय.

MNS | मनसेची मोठी राजकीय खेळी, लोकसभा निवडणुकीआधी बारामतीत हालचाली
raj thackerayImage Credit source: tv9 marathi
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Oct 19, 2023 | 8:46 PM
Share

बारामती | 19 ऑक्टोबर 2023 : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे पक्ष चांगलाच कामाला लागला आहे. मनसेकडून पुणे जिल्ह्यात जोरदार तयारी सुरु आहे. विशेष म्हणजे मनसेने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामतीत मध्यवर्ती शाखेचं उद्घाटन केलंय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे स्वत: या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी आले. बारामती लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा बालेकिल्ला आहे. या मतदारसंघात सध्या राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे या खासदार आहेत. बारामती मतदारसंघ हा शरद पवारांचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे भाजपसह मनसेलाही या मतदारसंघात आपलं वर्चवस्व निर्माण करायचं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेत्यांचं मानसिक खच्चीकरण करायचं असेल तर शरद पवार यांच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीचा पराभव करायचा, असा भाजपचा मानस आहे. त्यामुळे भाजपकडून सातत्याने इथे प्रयत्न केले जात आहेत. यावेळीदेखील भाजपकडून तसे प्रयत्न केले जात आहेत. पण आता मनसेने देखील बारामती लोकसभा मतदारसंघात मध्यवर्ती शाखा सुरु केल्याने नवा ट्विस्ट निर्माण झालाय.

राज ठाकरेंना बारामतीत भेटले ‘अजित पवार’

मनसेकडून लोकसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात झालीय. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या हस्ते बारामती लोकसभा मतदारसंघाच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन पार पडले. मनसे नेते वसंत मोरेंवर बारामती लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आलीय. बारामती लोकसभा मतदारसंघावर भाजपाठोपाठ मनसेचंही विशेष लक्ष असल्याचं या निमित्ताने स्पष्ट झालंय. यावेळी राज ठाकरे यांनी बारामतीत आपल्याला अजित पवार सापडल्याचं मिश्किल वक्तव्य केलं.

“आजचा कार्यक्रम फक्त कार्यलयाच्या उद्घाटनाचा आहे. वसंत मोरे अतिशय शिस्तबद्ध आहेत. बारामतीमध्ये अजित पवार सापडावा, मला माहिती नाही आमच्याकडे पण अजित पवार आहे. पण आयुष्यात मला कधी काका म्हणू नको”, असं मिश्किल वक्तव्य राज ठाकरे यांनी एका पदाधिकाऱ्याला उद्देशून केलं.

‘…पण आयुष्यात मला कधी काका म्हणून नको’

“महापालिकेच्या निवडणुका कधी होतील, मला माहिती नाही. या निवडणुका 2025 मध्ये होतील असं वाटतंय. देशात आणि राज्यात काय चालू आहे, काही कळत नाही. राजकारणाचा विचका करून टाकला आहे. आमच्याकडे पण अजित पवार आहेत. मला कळेना हल्ली काय ते कुठल्याही पक्षात जातात, पण आयुष्यात मला कधी काका म्हणून नको”, असं राज ठाकरे अजित पवार नावाच्या पदाधिकाऱ्याला उद्देशून म्हणाले.

“मार्च-एप्रिलमध्ये लोकसभा निवडणुका लागतील. त्याच्या तयारीला लागा. राज्यात जो राजकारणाचा विचका केला आहे त्याच्यातून महाराष्ट्राला बाहेर काढुया”, असं आवाहन राज ठाकरे यांनी यावेळी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना केलं.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?