बोलघेवड्या गृहराज्यमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा, मुख्यमंत्री पिजऱ्यातून बाहेर यायला तयार नाहीत-सदाभाऊ खोत

शंभुराज देसाई हे बोलघेवडे गृहराज्यमंत्री असून मुख्यमंत्र्यानी त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी कराड येथे केली आहे.

बोलघेवड्या गृहराज्यमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा, मुख्यमंत्री पिजऱ्यातून बाहेर यायला तयार नाहीत-सदाभाऊ खोत
सदाभाऊ खोत
Follow us
| Updated on: Jan 21, 2022 | 4:26 PM

सातारा : गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारवर (Mahavikas Aghadi) सदाभाऊ खोत तुटून पडत आहेत. आझाद मैदानातील एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनातही (St worker Strike) तेच दिसून आलं. आता गर्भवती वनगकर्मचारी महिलेवरील हल्ल्याप्रकरणी सदाभाऊ खोत यांनी जोरदार टीका केली आहे. यावेळी त्यांनी राज्याचे गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई (Shambhuraj Desai) यांना टार्गेट केले आहे. शंभुराज देसाई हे बोलघेवडे गृहराज्यमंत्री असून मुख्यमंत्र्यानी त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी कराड येथे केली आहे. सातारा तालुक्यातील पळसवडे येथील गर्भवती वनकर्मचारी महिलेवर हल्ला प्रकरणावरून ते बोलत होते. साताऱ्यातील गुन्हेगारी वाढत असताना गृहराज्यमंत्री जिल्ह्यात करतात काय? असा सवाल केला आहे. तसेच शंभूराज देसाई आभाळात वार केल्यासारखे बोलतात असेही ते म्हणाले आहेत.

मुख्यमंत्री पिंजऱ्यातून बाहेर पडायला तयार नाहीत

कराड तालुक्यात दोन महिन्यात दुसऱ्यादा बिबट्याने लहान मुलांवर हल्ला केल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. मागील महिन्यात बिबट्याने ऊसतोड मजूर वडीलासोबत चाललेल्या पाच वर्षीय मुलावर हल्ला करुन ठार केले होते. गुरुवारी बिबट्याने हल्ला केलेल्या किरपे येथील राज धनंजय देवकर यांची कराडच्या कृष्णा रुग्णालयात जाऊन माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी भेट घेतली. हिमतीने मुलाला वाचवणाऱ्या वडील धनंजय देवकर यांचा सत्कार केला. यावेळी खोत यांनी वनखात्याच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केला. वनखात्याचा कारभार सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे. ते पिंजऱ्यातून बाहेर निघत नाहीत. मात्र पिंजऱ्यातले प्राणी माणसात येऊ लागले आहेत, अशी टीका खोत यांनी केली. या मुलाला योग्य मदत द्यावी, अशीही मागणी त्यानी केली.

राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून मुख्यमंत्र्यांच्या बाहेर न पडण्यावरून सतत टीका होत आहे, भाजप वारंवार यावरून महाविकास आघाडीला घेरण्याचा प्रयत्न करत आहे. गेल्या अधिवेशनावेळीही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांनी जबाबदारी वाटून द्यावी असा सल्ला दिलेला, तर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तर मुख्यमंत्रीपदाचा चार्ज रश्मी ठाकरेंकडे द्यावा, असा टोला महाविकास आघाडीला लावला होता. काही दिवसांपू्र्वीच मोदींसोबतच्या बैठकीला मुख्यमंत्री उपस्थित राहिले नाहीत, त्यावरूनही बराच पोलिटिकल राडा झाला. आता पुन्हा सदाभाऊंनीही मुख्यमंत्री पिंजऱ्यातून बाहेर पडायला तयार नाहीत, असे म्हणत चिमटे काढले आहेत.

Why I Killed Gandhi: तो सिनेमा नक्कीच निषेधार्ह; जयंत पाटलांचा आव्हाडांच्या सूरात सूर

Why I Killed Gandhi: भाजपवाले कधीपासून गांधीवादी झाले?; शरद पवारांचा बोचरा सवाल

PHOTO: भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या मुलीचा विवाहसोहळा थाटात, दिग्गज राजकीय नेते अन् कलाकारांची उपस्थिती

Non Stop LIVE Update
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.