शहीद जवान प्रथमेश पवार यांना साश्रूनयनांनी अखेरचा निरोप

| Updated on: May 23, 2022 | 3:26 PM

प्रथमेश यांच्या घरी डेरेवाडी येथे घरासमोर पार्थिव आणल्यानंतर प्रथमेश यांच्‍या आई राजश्री पवार यांनी हंबरडा फोडला अन् उपस्थित हेलावून गेले. त्यावेळी रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी गर्दी केली होती. “अमर रहे, अमर रहे.. प्रथमेश पवार अमर रहे", च्या घोषणा यावेळी देण्‍यात आल्‍या. संपूर्ण परिसर साश्रूनयनांनी गलबलून गेला.

शहीद जवान प्रथमेश पवार यांना साश्रूनयनांनी अखेरचा निरोप
शहीद जवान प्रथमेश पवार यांना अखेरचा निरोप
Image Credit source: tv9
Follow us on

बामणोली तर्फ कुडाळ (सातारा) : सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील बामणोली तर्फ कुडाळ येथील जवान प्रथमेश संजय पवार (वय 22) (Jawan Prathamesh Sanjay Pawar) हे जम्मू-काश्‍मीरमध्ये कर्तव्य बजावत असताना हुतात्मा झाले होते. त्यांना आज साश्रूनयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला. आज सकाळी साडेदहाच्या सुमारस येथील दत्तमंदिरानजीक मोकळ्या पटांगणावर शोकाकूल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार (Funeral)करण्यात आले. शहिद जवान प्रथमेश यांना अखेरचा निरोप देण्यासाठी कुटुंबीय, मित्रपरिवारासह, संपूर्ण जावळी तालुक्यासह जिल्ह्यातून हजारो लोक येथे आले होते. त्यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या पार्थिवास पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. जवान प्रथमेश संजय पवार हे सीमा सुरक्षा दलात (Border Security Force)तीन महिन्यांपूर्वीच भरती झाले होते. यावेळी “अमर रहे, अमर रहे.. प्रथमेश पवार अमर रहे”च्या घोषणांनी परिसर दणाणून निघाला होता.

सीमा सुरक्षा दलात तीन महिन्यांपूर्वीच भरती झालेले जवान प्रथमेश संजय पवार यांना जम्मू-काश्‍मीर मध्ये कर्तव्य बजावत असताना विरमरण आले होते. जम्मू-काश्‍मीरमध्ये अतिरेक्यांच्या चकमकीत त्यांना हुतात्म आले होते. त्यानंतर आज त्यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले. सकाळी 10 वाजता प्रथमेश यांच्या पार्थिवाला पवार यांचे छोटे बंधू आदित्य पवार याने मुखाग्नी दिला. तर अमर जवान प्रथमेश यांचे पार्थिव आज गावात येणार असल्याने पंचक्रोशीतील नागरिक आधीच बामणोली तर्फ कुडाळमध्ये पोहचले होते.

हे सुद्धा वाचा

तर शहिद प्रथमेश पवार यांचे पार्थिव गावात आल्यावर संपूर्ण गाव गहिवरून गेला होता. कुडाळ येथून सकाळी आठ वाजता अंत्ययात्रेला प्रारंभ झाला. प्रथमेश यांच्या घरी डेरेवाडी येथे घरासमोर पार्थिव आणल्यानंतर प्रथमेश यांच्‍या आई राजश्री पवार यांनी हंबरडा फोडला अन् उपस्थित हेलावून गेले. त्यावेळी रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी गर्दी केली होती. “अमर रहे, अमर रहे.. प्रथमेश पवार अमर रहे”, च्या घोषणा यावेळी देण्‍यात आल्‍या. संपूर्ण परिसर साश्रूनयनांनी गलबलून गेला.