“भ्रष्टाचार केला असेल तर मी माझ्या मिश्या आणि भुवया काढून टाकेन”; उदयनराजे यांनी कुणाला ठणकावून सांगितलं

| Updated on: Mar 23, 2023 | 10:17 PM

कुणालाही नाव ठेवायला फारसी अक्कल लागत नाही जो कामे करतो त्यालाच ठेचा लागतात. त्यामुळे विरोधकांकडे टीका करण्याशिवाय काहीही उरलेले नाही असंही त्यांनी विरोधकांना उत्तर देताना त्यांनी सुनावले आहे.

भ्रष्टाचार केला असेल तर मी माझ्या मिश्या आणि भुवया काढून टाकेन; उदयनराजे यांनी कुणाला ठणकावून सांगितलं
Follow us on

सातारा : साताऱ्याचे उदयनराजे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. आताही त्यांच्यावर ज्यांनी ज्यांनी टीका केली आहे. त्यांना त्यांनी थेट समोर येऊन दाखवा असा इशाराच दिला आहे. त्यामुळे आता साताऱ्याचे राजकारण तापले असल्याचे दिसून येत आहे. खासदार उदयनराजे भोसले यांनी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर जोरदार टीका केली आहे. भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्यांनी एकदा समोरासमोर येऊन भ्रष्टाचार कुठे केला याचा पुरावा द्यावा अशा शब्दात त्यांनी ठणकावून सांगितले आहे. भ्रष्टाचार केला असेल तर मी माझ्या मिश्या आणि भुवया काढून टाकेन असा शब्दातही त्यांनी शिवेंद्रराजे यांना इशारा दिला आहे.

नगर विकास आघाडीने त्यांच्या काळात मोठा भ्रष्टाचार केला असल्याची टीका खासदार उदयनराजे यांनी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे.

द्वेषापोटी काही लोकांचा टीका करणे हा धर्म असेल पण मी कोणावरही टीका करणारा नाही अशा शब्दात त्यांनी शिवेंद्रराजे यांना सुनावरले आहे.

जे कोणी कुमकुवत बुद्धीचे आहेत ते आमच्यावर टीका करत आहेत. ज्यावेळेस विरोधकांच्या हातात नगरपालिका पालकमंत्री पद आमदारकी या आधी असूनदेखील सातारकरांचा विकास का झाला नाही असा सवालही त्यांनी शिवेंद्रराजे यांनी केला आहे.

आम्ही जर भ्रष्टाचार केला असेल तर समोर येऊन दाखवा. आम्ही जर भ्रष्टाचार केला असता तर सातारा शहरात एवढी विकास कामे झाली नसती असा विश्वासही त्यांनी यावेळी बोलून दाखवला आहे.

विरोधकांच्या मनात, हृदयात,वस्तुस्थितीत जर भ्रष्टाचारच आहे त्यांना उत्तर देणे मी उचित समजत नाही असा टोलाही त्यांनी लगावला आहे. आम्ही जर भ्रष्टाचार केला असेल तर एकदाच समोरासमोर या आणि तो भ्रष्टाचार दाखवून द्या अशा शब्दात त्यांनी विरोधकांना सुनावले आहे.

ज्यावेळेस तुमच्या हाती सत्ता होती त्यावेळेस का विकास कामे झाली नाहीत. आमची सत्ता येण्याआधी त्या काळात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्यामुळेच सातारा शहरातील विकास कामे रखडली होती अशी टीकाही त्यांनी यावेळी केली आहे.

आम्ही जो जाहीरनामा दिला होता त्याला आम्ही वचननामा म्हणतो तो पाच वर्षात मार्गी लावलेला आहे. लोकांचे हित हा माझा स्वार्थ आहे. तुमच्यासारखी आम्ही उगीच स्वतःची पाठ थोपटून घेत नाही असा शब्दात त्यांनी टीका करणाऱ्यांचा समाचार घेतला आहे.

कुणालाही नाव ठेवायला फारसी अक्कल लागत नाही जो कामे करतो त्यालाच ठेचा लागतात. त्यामुळे विरोधकांकडे टीका करण्याशिवाय काहीही उरलेले नाही असंही त्यांनी विरोधकांना उत्तर देताना त्यांनी सुनावले आहे.