Eknath Shinde-Shivendrraje: शिवेंद्रराजेंनी घेतली एकनाथ शिंदेंची अचानक भेट, अवघ्या 24 तासांत झाला मोठा निर्णय
Eknath Shinde-Shivendrraje: सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दरे गावी भेट घेतली. ३० मिनिटं दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. अनेक राजकीय विषयांवरही खलबतं झाली. त्यानंतर अघव्या 24 तासांत मोठा निर्णय झाला.

Eknath Shinde-Shivendrraje: सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दरे गावी भेट घेतली. ३० मिनिटं दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. अनेक राजकीय विषयांवरही खलबतं झाली. त्यानंतर अघव्या 24 तासांत मोठा निर्णय झाला. सातारा शहरातील पोवई नाका येथील शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांचा 25 फूट उंच पुतळा उभारण्यासाठी शिंदेंकडून 5 कोटी 75 लाख रुपयांचा निधी मंजूर नगरविकास विभागाने ‘नगरपरिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान’ योजनेतून अवघ्या 24 तासांत निधी मंजुरीचा शासन निर्णय काढला. पुतळ्यासाठी 15 फूट उंच चबुतरा आणि त्यावर 25 फूट उंच पुतळा उभारला जाणार. त्यामुळे पुतळ्याची एकूण उंची 40 फूट असेल.
शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी घेतली भेट
पोवई नाक्यावरील शिवतीर्थ येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा 25 फुटी पुतळा आणि शिवतीर्थ परिसर विकासासाठी निधी मिळावा, यासाठी बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. बैठकीला सातारा येथील नगराध्यक्ष अमोल मोहिते, माजी उपनगराध्यक्ष आणि भाजप गटनेते अविनाश कदम, नगरसेवक फिरोज पठाण हे उपस्थित होते.
24 तासांत निधी मंजूर
सातारा नगरपालिकेने नगरविकास विभागाकडे शिवतीर्थ विकास परिसराच्या विकास आराखडा पाठवला होता. उपमुख्यमंत्री शिंदे हे दरी गावी मुक्कामी आल्याचे समजल्यावर शिवेंद्रराजे सायंकाळी साताऱ्यातून तातडीने दरेगावी आले. दरेगावी शिंदे यांच्या निवासस्थानी त्यांनी भेट दिली. त्यावेळी छत्रपती शिवरायांचा 25 फुटी पुतळा तसेच त्यासाठीचा 15 फुटांचा चबुतरा उभारणी अशी आवश्यक कामे पूर्ण कण्यासाठी नगरविकास विभागाकडून त्वरित निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी मंत्री भोसले यांनी शिंदेंकडे केली. शिंदे यांनी तात्काळ मंत्रालयातील संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क केला. निधी उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर अवघ्या 24 तासांच्या आतामध्ये निधी मंजूरीचा शासन निर्णय झाला.
कसा असेल पुतळा
शिवतीर्थ येथे तोफेवर हात ठेवलेला शिवपुतळा असेल. हा पुतळा 25 फुटांचा असेल. हा नवीन पुतळा भारताचे सुप्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांचे सुपुत्र अनिल सुतार यांनी साकारलेला आहे. चबुतऱ्याची उंची 15 फूट आणि 25 फुटी पुतळा अशी एकूण 40 फूट उंची असलेला शिवरायांचा पुतळा लवकर उभारण्यात येईल, असे शिवेंद्रसिंहराजे यांनी स्पष्ट केले.