AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

यांच्या कलेचे विभत्स रूप समाजासमोर येतेय, नृत्यांगना माधुरी पवार यांनी सुनावलं

समाजकारण हे मला पहिल्यापासूनच आवडतं. कलाकारांसाठी जनता हा पक्ष आहे.

यांच्या कलेचे विभत्स रूप समाजासमोर येतेय, नृत्यांगना माधुरी पवार यांनी सुनावलं
माधुरी पवार, नृत्यांगना
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: Dec 29, 2022 | 9:36 PM
Share

सातारा : प्रसिद्ध नृत्यांगना आणि अभिनेत्री माधुरी पवार यांनी टीव्ही ९ मराठीशी संवाद साधला. कधीही एखाद्या कलाकाराने दुसऱ्या कलाकारावर आरोप करू नयेत. मात्र मी अशी पहिल्यांदाच प्रतिक्रिया देतेय. गौतमी पाटील हे एकच नाव नाही. अशी वेगवेगळी तीन ते चार नावे आहेत. याच्यामुळे कलेचे विभत्स रूप समाजासमोर येत आहे. तुमच्या कलेचा रिस्पेक्ट तुम्ही किती ठेवता यावर सर्व काही आहे, असं मत माधुरी पवार यांनी व्यक्त केलं. अशा प्रकारांमुळे आताच्या मुलींना नृत्याचे धडे द्यायचे का नाही, हा प्रश्न उपस्थित होऊ लागलाय. हे असं का होतंय, याची कारणे मी द्यायची गरज नाही. प्रेक्षकांना सर्व माहीत आहे. एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी मी बाहेर देशात असताना हे प्रकरण चर्चेत आलं. मात्र ज्यावेळी मी पाहिलं त्यावेळेस मी समजू शकते की एखाद्या वेळेस हे चुकू शकत. मात्र हे वारंवार होत असेल तर याला चूक म्हणता येत नाही, असंही माधुरी पवार यांनी सुनावलं.

कलाकाराने कधीही आपल्या कलेचा रिस्पेक्ट ठेवून आपली कला सादर करावी. लावणीचा दर्जा खूप मोठा आहे. मी त्याची धूळसुद्धा नाही. प्रेक्षकाच्या भावना समजून करमणूक केली पाहिजे. तुम्ही काहीही हातवारे केले म्हणजे करमणूक होत नाही, असं मत माधुरी पवार यांनी व्यक्त केलं.

सोशल मीडियामुळे आता घाणेरडी गोष्ट लवकर पसरते. अशा गोष्टी थांबवण्यासाठी सर्वांची जबाबदारी आहे की अशा गोष्टींना बंदी घालावी. एखादी गोष्ट चुकीची करून परत माफी मागायची आणि पुन्हा पुन्हा तीच चूक करायची म्हणजे हा गुन्हा आहे. हे प्रेक्षकांच्या लक्षात आले पाहिजे.

समाजकारण हे मला पहिल्यापासूनच आवडतं. कलाकारांसाठी जनता हा पक्ष आहे. सध्या तरी कोणत्याही पक्षाचे मी समर्थन करू शकत नाही. कारण प्रत्येक जण मला त्यांच्या कार्यक्रमासाठी बोलावत असतो. सध्या तरी कोणत्याही पक्षात जाण्याची नियोजित नाही. पण यापुढील काळात चांगले समाजकारण, राजकारण करण्याची इच्छा आहे, असंही माधुरी पवार यांनी सांगितलं.

Follow Us
जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
Manoj Jarange Hunger Strike | जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर...
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर तीव्र आंदोलन, असं काय घडलं?
मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार की नाही? शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत...
मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार की नाही? शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत नेमकं काय घडलं?
तोडगा निघणार? मनोज जरांगेंना भेटण्यापूर्वी शिष्टमंडळाची अभ्यासक...
तोडगा निघणार? मनोज जरांगेंना भेटण्यापूर्वी शिष्टमंडळाची अभ्यासकांसोबत सविस्तर चर्चा
भिवंडी पालिकेत महत्त्वाची बैठक, नगरसेविका कँडी क्रश खेळण्यात मग्न
भिवंडी पालिकेत महत्त्वाची बैठक, नगरसेविका कँडी क्रश खेळण्यात मग्न
36 Jilhe 50 Batmya | 36 जिल्ह्यांतील 50 महत्त्वाच्या बातम्या;
36 जिल्ह्यांतील 50 महत्त्वाच्या बातम्या; मराठा आंदोलनासह राज्यात मोठ्या घडामोडी, जाणून घ्या एका क्लिकवर
दादांच्या जाण्याचं दुःख माझ्यापेक्षा जास्त कुणाला असणार- सुनेत्रा पवार
दादांच्या जाण्याचं दुःख माझ्यापेक्षा जास्त कुणाला असणार' सुप्रिया सुळेंचे नाव घेत सुनेत्रा पवार म्हणाल्या...
बोरीवलीतील दहीहंडी महोत्सवासाठी जय्यत तयारी; सेलिब्रिटी आणि राजकीय...
बोरीवलीतील दहीहंडी महोत्सवासाठी जय्यत तयारी; सेलिब्रिटी आणि राजकीय नेत्यांची असणार मांदियाळी
ठाण्यातील संकल्प प्रतिष्ठानच्या २१व्या दहीहंडी उत्सवाची तयारी सरु
आमदार रवींद्र फाटक यांनी केली ठाण्यातील २१व्या संकल्प प्रतिष्ठान दहीहंडी महोत्सवाची घोषणा
विद्यानंद बापट यांच्या डीजेविरोधी भूमिकेला पालकांचा पाठिंबा;
विद्यानंद बापट यांच्या डीजेविरोधी भूमिकेला पालकांचा पाठिंबा; हल्ल्याचा निषेध करत केली मोठी मागणी