AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : घाटातून जाण्याऱ्या एसटीच्या मागे भाऊ थेट लटकला, अनेकांना तात्या विंचू आठवला, हा घाटातला थरार पाहाच

तात्या विंचू जसा एसटीच्या मागे लटकून श्रीरापूरहून मुंबईला जातो तसाच एक तरुण आपल्याला लाल परी एसटीच्या मागे लटकून घाटातून  प्रवास करतोय तेही पडत्या पावसात.

Video : घाटातून जाण्याऱ्या एसटीच्या मागे भाऊ थेट लटकला, अनेकांना तात्या विंचू आठवला, हा घाटातला थरार पाहाच
घाटातून जाण्याऱ्या एसटीच्या मागे भाऊ थेट लटकला, अनेकांना तात्या विंचू आठवला, हा घाटातला थरार पाहाचImage Credit source: tv9
| Updated on: Jul 10, 2022 | 11:18 PM
Share

सातारा : घाटातून जाणारी एसटी (ST Bus) हलका हलका पडणारा पाऊस हिरवेगार नटलेले डोंगर झाडी (Rain) हे वाचून तुमच्या डोळ्यासमोर पावसाळ्यातलं निसर्गरम्य वातावरणाचं घाटातलं अस्सल सौंदर्य (Nature beauti) उभा राहिलं असेल,  मात्र या घाटातच आज अेकांना थेट झापटेलाल चित्रपटातील तात्या विंचू आठवला. या घाटात झपाटलेल्या पिक्चर सारखा एक प्रकार बघायला मिळाला आहे. या पिक्चरचा संदर्भ देण्याचे कारण एवढंच आहे की तात्या विंचू जसा एसटीच्या मागे लटकून श्रीरापूरहून मुंबईला जातो तसाच एक तरुण आपल्याला लाल परी एसटीच्या मागे लटकून घाटातून  प्रवास करतोय तेही पडत्या पावसात. पाठीमागच्या वाहनातून कोणीतरी हा व्हिडिओ नीट शूट केला आणि टाकला इंटरनेटवर मग काय हा भाऊ रातोरात फेमस झाला ना…

तो व्हिडिओही पाहा

व्हिडिओत नेमकं काय दिसतंय?

हा व्हिडिओ बारकाईने पाहिला तर सुरुवातीला आपल्याला हा तरुण या एसटीला मागे लटकलेला दिसतोय. मात्र हे वाहन थोड पुढे गेल्यानंतर तिथे रस्त्यावरून काही तरुण धावताना दिसतात. हा तरुणही अकॅडमीतला असल्याने हे सर्वजण धावायला रस्त्यावरती आलेत. मात्र थकल्यानंतर एका तरुणाने खोडकरपणा करत थेट एसटीच्या मागची शिडीच पकडले. आणि त्याला लटकला. आता घाटाचा रस्ता असल्यामुळे एसटीचा स्पीडही तेवढा कमी आहे म्हणून जमलं. अन्यथा एसटीचा सहज हिसका बसला असता तर हा तरुण कुठल्या कुठे पडला असता याचा अंदाज ही लागला नसता. त्यामुळे आता प्रवासी यावर संताप व्यक्त करत आहेत.

हा नेमका प्रकार काय घडला?

साताऱ्यात पोगरवाडीला जाणाऱ्या घाटात एसटी बसच्या पाठीमागील बाजूस धोकादायक पद्धतीने लटकून तरुण प्रवास करत असलेला विडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका करिअर अकॅडमीचा हा युवक असून या अकॅडमीचे विध्यार्थी पोलीस आणि आर्मीचे प्रशिक्षण घेण्यासाठी या घाटातून आणि रस्त्यावर धावत असतात. भर पावसात रस्त्यावर हे युवक अत्यंत धोकादायक पद्धतीने धावत असताना अपघात होण्याची शक्यता निर्माण होत आहे. अशा हुल्लडबाज विद्यार्थ्यांवर शिक्षकांचे लक्ष नसल्यानेच हे धोकादायक उद्योग हे विध्यार्थी करत आहेत. संबंधित विद्यार्थ्यांचा हात निसटून अपघात झाल्यास याला कोण? असा सवाल आता प्रवाशांकडून विचारण्यात येत आहे. तसेच अशा विद्यार्थ्यांवर योग्यवेळी कारवाई केली तरच आशा प्रकारांना आळा बसेल, अशीही मागणी प्रवाशी करत आहेत.

मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले...
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा.....
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे.
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट.